"बरोबरच आहे म्हणा. अस ऐकलं आहे की ती स्वतः काही नोकरी करत नाही. तिचा नवरा पण तसाच. नसेल परवडत त्यांना असल चांगलं खायला."
" मग तु कशाला इतकं जवळ करते. अस का म्हणते दीदी."
" मी कुठं जास्त चिटकुन घेते. मी आपल काम करायला मदतीला बोलावते. मग त्यांची मदत पण होते. माझं काम पण कमी होत. मग काय त्यांना देते आपलं खायला. तेवढच त्यांना काहीतरी चांगलं खायला मिळेल."
" हो हे मात्र खरं हा. मदत तर हवीच. नाहीतर इतकं सगळं एकट्याने करायचं.हॅ हॅ हॅ " "
" या लोकांना खायला चांगलं दिलं की आपल्या फायद्याचं असतं. हॅ हॅ हॅ "
" हॅ हॅ हॅ "
" ही ही ही "
अस म्हणून त्या दोघी बहिणी हसत होत्या. त्यांचं बोलणं ऐकून तर किर्तीला कोणीतरी तिला चाबकाने फोडत असल्याचं वाटतं होत. हृदय तर रक्त बांबाळ झालं होतं. त्याचं हसणं तर जिव्हारी लागत होत. तिने तिचा राग गिळला. अक्षशः गिळला.
अस म्हणून त्या दोघी बहिणी हसत होत्या. त्यांचं बोलणं ऐकून तर किर्तीला कोणीतरी तिला चाबकाने फोडत असल्याचं वाटतं होत. हृदय तर रक्त बांबाळ झालं होतं. त्याचं हसणं तर जिव्हारी लागत होत. तिने तिचा राग गिळला. अक्षशः गिळला.
कारण ना ती जागा योग्य होती. तिचा राग व्यक्त करायला. नाही तो दिवस योग्य होता राग व्यक्त करायला. स्वतःला सावरलं. इतक्यात वहिनीची आई त्यांना बोलवायला आली.त्यांनी मग वहिनींना जेवायला बोलावलं. वाहिनींच बोलणं ऐकून तिची तिथं थांबण्याची इच्छा नव्हती.
त्या दिवशी नाइलाज स्तव तिला थांबावं लागलं होतं.त्या दिवशी सगळे होतें म्हणून कस बस तिने खाल्ल. घास तर घशाच्या खाली उतरत नव्हता. पण समोर सासरे सासू बाई आणि कल्पना वहिनीची आई वडील दोघं बसले होते. त्यांनी तिला आग्रह केला होता. जेव म्हणून.
तिला तर इच्छाच नव्हती जेवणाची. पण लोक लाजे खातीर ती कशी बशी जेवली. अमोघला घेउन तडक घरी आली. ना तिने त्यांना नंतरच आवरा आवरी करायला मदत केली. ना इतर कोणत काम करायला. कोणाची इच्छा होईल असा अपमान झाल्यावर एक क्षण देखील तिथं थांबण्याची ?
त्या दिवशी नंतर तिने कानाला खडा लावला होता. ती थोडी अलिप्त राहत होती. त्या कुटुंबा पासुन. गेल्या दोन तीन दिवसांत तिला कुणकुण लागली होती. घरात पुन्हा कोणता तरी कार्य क्रम होणार आहे. पण यावेळी ती सावध होती. कार्यक्रम होणार असल्याची चर्चा तिच्या कानावर येत होती. पण तिने त्या गोष्टी कडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं होतं.
त्या दिवशी पण सकाळीच वहिनी सांगून गेल्या होत्या. आज त्यांच्या घरी त्यांची बहीण तिचा नवरा मूल येणार आहेत. ते नुकतेच परदेशातून भारतात सुट्टी एन्जॉय करण्यासाठीं आले आहेत. तर आज तिच्याकडे वहिनीच्या माहेरचे येणार आहेत. तर कल्पना ने सकाळी आरती बाई कडे घराची चावी दिली होती. शिवाय किर्तीला थोडी मदत करायला पण सांगितल होत.
किर्ती पनीर ची भाजी आणि बिर्याणी छान बनवते तर तिलाच बनवायला सांगा अशी गळ पण घातली होती. अस म्हणा यला हरकत नाही की आरती बाईना तिच्या कडून स्वयंपाक करून घेण्याचा टास्क दिला होता. शिवाय दीदी फॉरेन हुन आली आहे तर तिने सगळ्यांना गिफ्ट पण आणलं आहे. हे देखील सांगितल होत. त्यामुळें आरती बाई आज विशेष अक्टिव होत्या. त्यांना त्या फॉरेन च्या गिफ्ट ची उत्सुकता होती. काय बर असेल?
म्हणून त्या सकाळ पासून किर्तीच्या मागे लागल्या होत्या. की चल जरा लवकर. पण किर्ती ने सपशेल दुर्लक्ष करायचं ठरवलं होत. आज तिच्या मैत्रिणीच्या कडे तिला जायचं होत.तिच्या मुलीचा वाढदिवस होता. ती त्याचीच तयारी करत होती. तिला अस तयार होताना बघून आरती बाई म्हणाल्या
" अग किर्ती कुठे निघालीस ? आपल्याला आज धनंजय कडे जायचं आहे ना जेवायला."
" आई मी आणि अमोघ नाही येत आहोत. तुम्ही पुढ व्हा."
" मग लवकर ये जाऊन. मग जाउ आपण."
" आई आम्हाला यायला उशीर होईल. कदाचित यायला जमणार नाही. त्यापेक्षा अस करा ना तुम्हीच जाऊन या जाऊ बाईंच्याकडे " ती मधाळ आवाजात म्हणाली.
" अग अस काय करते. तू आता कुठं जाणार आहेस तिथं नंतर जा. पण आता माझ्या सोबत चल."
" आई मला जमणार नाही यायला." ती स्पष्ट शब्दात म्हणाली.
" का? का नाही जमणार.? असं कुठं जायचं आहे. दोघांना.?" आरती बाईनी भुवया उंचावत विचारलं.
" ते रश्मी च्या मुलीचा वाढदिवस आहे. तर मी आणि अमोघ जाणार आहोत." किर्ती म्हणाली.
" वाढदिवस काय नेहमी होतात. तू नंतर कधी तरी जा किंवा मग अस कर, तु तिला गिफ्ट देउन भेटून लगेचच ये तिकडं." आरती बाई तिला आग्रह करत म्हणल्या.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा