सायली भावुक झाली. मनातून आनंद झाला, प्रेमाचे पाखरू भरारी घ्यायला सज्ज झाले. पण दुसऱ्याच क्षणी ते त्याच गतीने खाली आले.
तिचा उदास चेहरा बघून त्याने तिला पुन्हा विचारलं.
"काय झालं, तुला मी आवडत नाही.? तुला आवडलं नाही का मी तुला असं प्रपोज केलं ते."
"तू मला आवडतोस पण हे कसं शक्य आहे तुला तर सगळं माहीत आहे, माझं आयुष्य क्षणभंगुर आहे. कधी निसटून जाईल कळणार देखील नाही. मला माझ्यामुळे तुझं आयुष्य पणाला लावायचं नाही आहे."
"तू कितीही काळ माझ्यासोबत घालवला तरी चालेल. मला फक्त तू हवी आहेस. माझ्या जीवनात मला तू हवी आहेस."
सायलीने एकाही क्षणाचा विलंब न करता त्याला होकार दिला.
निमिषा तिथून कुणाशीही काहीही न बोलता परत गेली.
दुसऱ्या दिवशी कार्तिक कॉलेजमध्ये गेला.
त्याचे डोळे निमिषाला शोधत होते.
बराच वेळ त्याने कॉलेज अवतीभवती चकर केल्या पण त्याला ती दिसली नव्हती.
त्याने तिला कॉल केला पण तोही स्विच ऑफ सांगत होता.
असेच आठ दिवस निघून गेले. या आठ दिवसात कार्तिकने बऱ्याचदा निमिषाला फोन केला पण काहीच उपयोग झाला नव्हता.
असेच आठ दिवस निघून गेले. या आठ दिवसात कार्तिकने बऱ्याचदा निमिषाला फोन केला पण काहीच उपयोग झाला नव्हता.
एक दिवस सकाळी कार्तिक मंदिरात गेला आणि तिथे त्याचं लक्ष निमिषाकडे गेलं.
"निमिषा." त्याने तिला आवाज दिला.
तिने वळून बघितलं आणि लगेच डोळ्यातले अश्रू पुसले. तिथून उठून थोडं समोर जाऊन उभी राहिली.
"काय ग निमिषा कुठे होतीस? किती दिवसापासून तुझा फोन ट्राय करतोय. काय? असं मला न सांगता कुठे गेली होतीस, तुला माहिती आहे ना मला तुझ्याशिवाय राहवत नाही मग तरी का जातेस मला सोडून आणि मी बोललो होतो ना मला तुला काहीतरी सांगायचंय आणि तू पण बोलली होतीस की तुलाही मला काहीतरी सांगायचं चल बोल तुला मला काय सांगायचं आहे?"
मला तुला काहीच सांगायचं नाहीये, तू बोल तुला काय सांगायचं?"
"मला तुला खूप काही सांगायचंय, आपण इथे बसुया."
दोघेही बाकावर बसले.
"निमिषा मी खूप खूप खूप खूप खूप खूप खुश आहे आणि मला तुला हेच सगळं सांगायचं होतं. मी माझ्या मनातलं सायलीला सगळं सांगितलं आणि तिने मला होकार दिला आहे. सो आय एम सो हॅपी मी लवकरच तिच्याशी लग्न करणार आहे."
"काँग्रॅच्युलेशन काँग्रॅच्युलेशन कार्तिक.. तुमची दोघांची जोडी खूप छान आहे."
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा