Login

धागे मैत्रीचे...भाग 4 अंतिम

Dhage maitriche


धागे मैत्रीचे...भाग 4 अंतिम

"तू मला काहीतरी सांगणार होतीस ना? सांग ना तुला कुणीतरी आवडलं का?"


"नाही कार्तिक असं काहीच नाहीये."


"असेल तर सांग ना आपण दोघे एकाच मंडपात लग्न करूया."

"नाही कार्तिक ते पॉसिबल नाहीये."

"का काय झालं?"

"काही नाही.."

"अगं सांग ना काय झालं?"

"त्याचं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे."

"तुला न कळली माझी प्रीत
  मी समर्पित झाले तुजला...
माझे मन माझे राहिले नाही
का कधी कळले नाही तुजला..."
 


"काय? तो जोरात किंचाळला.

"त्याचं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे पण तू तुझ्या प्रेमाबद्दल बोललीस का त्याच्याजवळ?"

"नाही.. नाही बोलली मी. तशी गरज वाटली नाही."

"सांगायचं होतं ना तुझ्या मनातलं, बोलायला हवं होतं. काही हरकत नाही  मी आहे ना तुझा कार्तिक मी तुझ्यासाठी छानसा मुलगा शोधून देईल. चल मी येतो मला सायलीला भेटायला जायचं आहे. तू येणार आहेस का?"


"नाही आत्ता नको मी नंतर येते तु जा."


निमिषाचं कार्तिकवर खूप प्रेम होतं पण ती तिच्या मनातलं कार्तिक जवळ काहीच बोलू शकली नव्हती. सायली तिची बेस्ट फ्रेंड होती आणि कार्तिकही तिचा बेस्ट फ्रेंड होता. सायली कॅन्सरग्रस्त होती त्यामुळे निमिषाला तिला आयुष्यात कधीच दुखवायचं नव्हतं. दोघांनी एकमेकाला स्वीकारलं आणि दोघांचही थाटामाटात लग्न झालं.


तिला तो मैत्रीचा धागा तोडायचा नव्हता. तिने तिची मैत्री निभावली.


निमिषा परदेशी गेली आणि तिथेच वास्तव्य करू लागली. काही वर्ष जॉब करून तिने स्वतःचा बिझनेस उभा केला. एक मुलगी दत्तक घेतली आणि दोघीही सोबत आनंदाने राहू लागल्या. आर्वी जशी मोठी व्हायला लागली तिला खूप प्रश्न पडायला लागले. निमिषाला प्रश्न करून करून भंडावून सोडायची. जुनी अल्बम बघायची. एकदा बोलता बोलता निमिषा तिला सगळं सांगितलं होतं.

आज आर्वीच्या स्पर्शाने जुन्या जखमा कुरेडल्या गेल्या.  निमिषा पुन्हा त्या जुन्या आठवणीत रंगली. आर्वीने पुन्हा तिला आवाज दिला.

"काय झालाय का शांत झालीस?"


"काही नाही ग तुझ्या बोलण्याने पुन्हा ते जुने दिवस आठवले, पण खरं सांगू आर्वी त्यावेळची आमची मैत्री खूप स्ट्रॉंग होती आणि मी ती निभावली. पण आता तुला सांगू आता माझ्या आयुष्यात फक्त तू आहेस बाकी कुणीही नाही. मला माझ्या आयुष्यात पुन्हा नवीन एन्ट्री नको आहे ग.

"तू मला मी तुला.." अजून काहीही नकोय.