सायली आणि निमिषाची खूप छान मैत्री झाली.
दोघींची मैत्री फुलायला लागली. त्या बहरलेल्या मैत्रीत त्याने प्रवेश केला.
दोघींची मैत्री फुलायला लागली. त्या बहरलेल्या मैत्रीत त्याने प्रवेश केला.
"हॅलो गर्ल्स."
"हाय कार्तिक." ( गेट जवळ धडकलेला हाच तो).
"आज बाहेर कुठेतरी फिरायला जाण्याचं प्लॅन बनवूया." कार्तिक खूप एक्सायटेड होता.
"चालेल, पण घरी काय सांगायचं." सायली थोडी सॅड झाली.
"चिल यार, सांगू काहीतरी बिनधास्त जीने का, टेन्शन नही लेने का." निमिषाने दुजोरा दिला आणि त्या तिघांचं प्लॅन सेट झाला.
घरी थापा मारून तिघेही मस्त एन्जॉय करून आले.
कॉलेजमध्ये
"तिघांची यारी, लय भारी."
सगळे त्यांच्या मैत्रीची मिसाल द्यायचे.
जेवढी मस्ती करायचे तेवढेच अभ्यासातही हुशार होते.
जेवढी मस्ती करायचे तेवढेच अभ्यासातही हुशार होते.
तिघेही वन बाय वन टॉपर असायचे.
हळूहळू तिघांचं त्रिकुट फुलायला लागलं.
छोट्यातली छोटी गोष्ट असो वा एखादा मोठा प्रॉब्लेम तिघेही एकमेकांशी शेअर करायचे.
त्यांच्या घरीही कुणालाही त्यांच्या मैत्रीबद्दल आक्षेप नव्हता.
तिघांची नुसती धमाल असायची.
गॅदरिंगमध्ये त्यांच्या डान्सने सगळ्यांना इम्प्रेस केलं होतं. कॉलेजमध्ये सगळ्या प्रोफेसरचे प्रिय विद्यार्थी होते.
तिघांची नुसती धमाल असायची.
गॅदरिंगमध्ये त्यांच्या डान्सने सगळ्यांना इम्प्रेस केलं होतं. कॉलेजमध्ये सगळ्या प्रोफेसरचे प्रिय विद्यार्थी होते.
बघता बघता कॉलेजचं पहिलं वर्ष संपलं.
निमिषाच्या मनात कार्तिकबद्दल प्रेम फुलायला लागलं.
ती त्याच्यावर प्रेम करायला लागली.
ती त्याच्यावर प्रेम करायला लागली.
कार्तिकच्या मनात काय आहे हे तिला जाणून घ्यायचं होतं पण त्याच्याजवळ काय आणि कसं बोलावं या गोंधळात तिचं मन गिरक्या घालत होतं.
दिवस सरकत गेले.
निमिषाने त्याला तिच्या मनातलं सांगायचं ठरवलं.
तिने त्याला मंदिरात बोलावलं, ती आज त्याला सगळं सांगणार होती.
पण अचानक त्याला एक कॉल आला आणि दोघेही धावत सुटले.
सायलीची तब्बेत बिघडली होती. चेकअप झालं, सगळ्या टेस्ट झाल्या आणि कॅन्सरचं निदान निघलं.
कार्तिक आणि निमिषा त्यांच्या पायाखालची जणू जमीनच सरकली.
या बातमीने सगळे हादरले.
कार्तिक आणि निमिषा त्यांच्या पायाखालची जणू जमीनच सरकली.
या बातमीने सगळे हादरले.
महिना उलटून गेला,
सायलीची ट्रीटमेंट सुरू होती,
एक दिवस निमिषा सायलीच्या घरी गेली. तिच्या रूममध्ये एन्ट्री करतच होती की तिला कार्तिक तिथे बसलेला दिसला.
त्यांचं बोलणं तिच्या कानावर पडलं.
त्यांचं बोलणं तिच्या कानावर पडलं.
"सायली मला तुला काही सांगायचं आहे. खर तर हे मी तुला खूप दिवसाआधी सांगणार होतो, पण तुझी तब्बेत खराब झाली आणि माझ्या मनातलं मनातच राहील."
"असं काय बोलायचं आहे तुला?"
"सायली मला तू आवडतेस, माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझ्या या अपूर्ण जीवनाला पूर्णत्व देशील. माझी अर्धांगिनी होशील?"
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा