मागील भागात आपण पाहिले की या पाचही मैत्रिणी काशीच्या घरी गेल्या.त्यावेळी काशीच्या जीवनातील अनेक अज्ञात पैलू समजले.त्याबरोबर तत्कालीन समाजात असलेल्या प्रथांमुळे होणारी घुसमट सुद्धा लक्षात आली.परंतु काशीची हि मूक वेदना पुढच्या पिढीपर्यंत पोहचलेली सुद्धा आपण पाहिले.मागील पिढ्यांच्या त्यागावर पुढील पिढ्यांचा भविष्यकाळ घडतो हेच खरे...आता या पंचकाला शाळेला भेट द्यायचीय.पाहू या पुढे काय होत?
सकाळी बरोबर चार वाजता शंख वाजला तशा सगळ्या दचकून जाग्या झाल्या.पाहतात तर काय??काशी केव्हाची उठलेली.ती हसत म्हणाली,"मरेपर्यंत हा नियम मोडला नाही ,महादेवाच्या देवळातील शंख वाजायच्या आधी माझी अंघोळ झालेली असे".सगळ्या खळखळून हसल्या.ये चला जरा फेरफटका मारुया. आजूबाजूला सगळे शिवार फिरून पाहिलं.झालेले अनेक बदल काही सुखावणारे तर काही बोचणारे.आता सगळ्यांना उत्सुकता होती हुजूरपागेच्या भेटीची.या पाचही मैत्रिणींची झालेली पहिली भेट...त्यानंतर फुलत गेलेली मैत्री अन या सगळ्याला साक्षीदार असलेली हुजूरपागा शाळा...पुण्यात 1925 च्या आसपास शालेय शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक मुलीचं स्वप्न असे ,हुजूरपागेत शिकायचं.हुजूरपागेची विद्यार्थिनी म्हणजे एक वेगळा आब आणि रुबाब होता.अगदी सरदार,इनामदारांच्या मुलींपासून तर गरीब घरातील मुलींना सारख्याच मायेने सुसंस्कृत बनवणारी हुजूरपागा म्हणजे पुण्याच्या शैक्षणिक शिरपेचात एक मानाचा तुरा.तर अश्या ह्या रम्य,नामांकित शाळेशी जोडलेल्या काही आठवणी आणि बदल पहायला सगळ्या उत्सुक होत्या.
यमुनाबाई ओरडल्या,"चला ग लवकर,आठवतंय ना पहिल्याच दिवशी रंगी उशिरा आलेली".तेव्हा रंगू हसून म्हणाली ,"चांगलंच आठवतंय.कसब्यातून येणाऱ्या मोजक्या मुलींत होते .पहिल्या दिवशी झालेला उशीर,त्यात माझी हुजूरपागेच्या तुलनेत गावंढळ भाषा किती घाबरलेले मी.पण गुप्ते बाईंनी सहज सामावून घेतले .मग सुमन बोलू लागली,"खरं सांगू का ?मला खूप दडपण आलेलं शाळेच.एवढ्या नामांकित शिक्षिका,हुशार विद्यार्थिनी.हे सगळं पाहूनच भीती वाटायची.हं....काशी म्हणाली.मला फक्त दोन वर्षच मिळाली की ग .पण तुम्ही विसरला नाहीत .आता रंगू चिडली,"बायांनो ,लवकर चला.नाहीतर शाळा सुटून जायची.सगळ्या जणी निघाल्या.
शाळेचे प्रवेशद्वार बदलले काय ??इमारती पण बघ ना किती वाढल्यात. आपण एक आण्याचा पेरू खायचो.आठवलं का????हो तर गोदा म्हणाली.तो पेरू आणि ती मैत्रीची चव अजून शिल्लक आहे.ये पण आपण तशा काही हुशार विद्यार्थिनी नव्हतो.मग मात्र सगळ्या हसल्या.नाहीतर काय???अगं गायन,नृत्य,चित्रकला आणि कशा कशात निपुण असलेल्या असंख्य विद्यार्थिनी होत्या.तुला ती सुषमा दातार आठवते का???झालं....यमुना चिडलीच. ती स्वतःला फारच शहाणी समजायची.हुशार होती ,त्यात वर्गप्रतिनिधी ना...एवढ्यात मुली येऊ लागल्या.अय्या!!!किती सुंदर गणवेश आहे बघ.नाहीतर आपण मेल्या नऊवारी नेसून यायचो शाळेत.असे रंगू म्हणताच सगळ्या हसायला लागल्या. गपा ग!!एकदाच धाडसाने पाचवारी नेसले तर...दादांनी थोबाड रंगवलं होत माझं.या मुली बघ.किती सुंदर मोकळा गणवेश.यमुना पुढे झाली,"ये ह्या इथे लेडी सुप्रिडेंन्ट बसायच्या.त्या यायच्या आधीच ओळीत उभे असायचो आपण.हे शाळेचे दिवस किती छान होते.तो वार्षिकोत्सव,सहली, वर्गातील वाचनाचे तास.....सगळ्या जणू पुन्हा बालपणात गेल्या.
तुला आठवत का रंगू????इंग्रजी पाचवीत तुझं लग्न लावायला निघालेले तुझे दादा.रंगू म्हणाली,"हो !ना,आत्याचा मुलगा म्हणे!!!मला इतका राग आलेला.तुला सांगते तीन दिवस घरी जेवले नाही.तेव्हा माघार घेतली त्यांनी.मराठीच्या बाई,गणिताचे सर,गायनाचे वर्ग सगळं सगळं आठवत होत.एवढ्यात स्कुटीवरून एक पंजाबी ड्रेस घातलेल्या बाई उतरल्या,मुली हसत जाऊन बाईंशी बोलायला लागल्या.हे मात्र डोळे विस्फारून पहातच राहिल्या या सगळ्या.सुमन म्हणाली सुद्धा,"आपण किती घाबरायचो बाईंशी बोलायला,शिक्षिका किती कडक असायच्या.ये पण तेवढी माया पण करायच्या ना....तेवढ्यात यांना यमुनेची पणती प्रिया दिसली.यमुने! अंग तुझी पुढची पिढी पण आहे ग शाळेत.किती मस्त ना.ये चला बाहेर तो पेरुवाला आहे का पाहू!!!
बाहेर आल्यावर पाहतात तर बोरं आणि पेरू विकणाऱ्या बरोबर अनेक पदार्थांची दुकान पाहिली.... किती मस्त ना!!!पोरी किती आनंदात शाळेत येतायत.नाहीतर आपल्या वेळी कितीतरी मुलींना शाळा दिसायचीसुद्धा नाही.तर काय ग!!आणि काय तर म्हणे गृहशास्त्र शिका!!अस्सा राग यायचा ना !घरकाम शिकायला शाळा कशाला हवी.मला तर किती मैदानी खेळ खेळावे वाटायचे..काशी भूतकाळात हरवत सगळं बोलत होती.ते ऐकूनच सगळ्या ओरडल्या,काय????अग पण शाळेत असताना कधीच बोलली नाहीस???असो.पण आपल्या वेळी पण शाळा मस्तच होती की ग!!!पुढच्या आयुष्यात आलेले चढ उतार सोसायच बळ देणारे संस्कार इथूनच तर मिळाले.सुमन बोलत असताना गोदा म्हणाली,"बाई वर्गातून बाहेर या!!!!आपण धम्माल करायला आलो ना....मग ?सगळ्या शाळेच्या इमारतीतून भरपूर हुंदडल्या,आपले वर्ग,मधले प्रसिद्ध कारंज, पाणी प्यायची जागा.....किती सुंदर क्षण होते.
सगळा दिवस शाळेत घालवला.आता कोणाकडे जाऊ या???आज कोणाकडे जायचं???गोदावरी पुढे होत म्हणाली,"चला,आज जोश्यांचा घरात डोकावू".मला किती वाटायचं ग सगळ्यांना बोलवावं. पण सासूबाईंची करडी शिस्त,यांचा भिक्षुकीचा फाटका संसार आणि माणसांची ती भुतावळ.... नाहीच जमलं कधी.मग मात्र रंगुने प्रश्न विचारला,"गोदा एक विचारू???त्या काळात मॅट्रिक झालेली तू,मग असे काय झाले??तुझं नोकरीच स्वप्न सोडून संसारात हरवलीस.... गोदा मंद हसली..चला जाऊया...जाताना सांगते .
काय असले गोदाच्या आयुष्याची कथा???वाचत रहा धम्माल पुनर्जन्माची....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा