आज सकाळी सकाळी लवकर उठून प्रिया जरा वैतागली होती.तेवढ्यात,प्रिया!
उठ लवकर,आज पणजीआजीचे श्राद्ध आहे ना!!आईची तिसरी हाक ऐकून
प्रिया उठून बसली.,”काय हे आईच!रविवारी पण झोपू देईना”.एवढ्यात प्रियाने
जीभ चावली. पटकन आवरायला प्रिया आत गेली.सुलभाताई म्हणजे प्रियाची
आजी आणि स्नेहा म्हणजे प्रियाची आई दोघी मिळून सकाळपासून स्वयंपाक
करत होत्या.सुलभाताई म्हणाल्या,”तुला सांगते स्नेहा,सासूबाई पुरणपोळी इतकी
सुंदर बनवायच्या.रेशमी आणि जिभेवर विरघळणाऱ्या.आजही यांना माझ्या
पोळ्या नाही आवडत.स्नेहा हसली,”आई अहो,तुम्ही सुद्धा सुंदर करता पुरणपोळी
असो...आवर आता नंदा येईल,काय???आत्तु येतेय?काय यार आजी आधी
सांगायचस ना!!!प्रिया बाहेर येत म्हणाली.एवढ्यात दारात गाडी थांबली.नंदा आत्तु
म्हणत प्रिया पळत बाहेर गेली.गुरुजी आले,सगळं साग्रसंगीत होत.अगदी यमुनाबाईंच्या
आवडीचं .प्रियाने पणजी आजीला नमस्कार केला आणि म्हणाली,”वॉव!आत्तु दागिने बघ
आणि नथ किती सुंदर आणि साडीतर व!!वा!!!असा सगळा सुखसोहळा चाललेला.एवढ्यात कावळा
ओरडला,सुलभाताईंनी घाई घाई कावळ्याला घास ठेवला.प्रिया हसत म्हणाली,”आजी काय हे
कावळा अँड ऑल”.गप ग खरच पूर्वजांचे आत्मे येतात बर....
हे सगळं ऐकून कावळ्याच्या रूपातील यमुनाबाई हसल्या,”गोदे, सुमे,काशे, रंगे या ग
पुरणपोळी अजून जमत नाही सुलभीला. थांबा थांबा गोंधळु नका!!!या वर उल्लेखित
पंचकाने आम्हाला एकाच वेळी पुण्यातच पुनर्जन्म हवा अशी अटच ठेवलेली स्वर्गात
आणि त्यांची शेवटची मैत्रीण यमुनाबाई नव्वद वर्ष जगून नुकत्याच स्वर्गात पोचलेल्या
तर आता यम आणि यांच्यात ठरलेल्या करार नुसार पुढचे आठ दिवस यांना पुण्यात फिरायला
मिळणार होत...यमुने आग वीस वर्षे अडकलो ना तुझ्यामुळं आम्ही.गोदा रागावत म्हणाली.
यमुनाबाई म्हणाल्या,अग गेले पंधरा वर्षे अंथरुणावर होते,सुलभी ने खूप केलं ग माझं.तुम्ही सगळ्या
माझ्यासाठी प्रत्यक्ष यमाशी भांडलात. तेव्हा काशी म्हणाली,तू आमच्यासाठी
हुजूरपागेत प्रत्यक्ष मुख्याध्यापिकेशी भांडलेलीस .यमाला काय घाबरायचं???
तसं पण एक बार आदमी मर जाता है ,तो डर खतम जानी।रंगे गप ग.आख्ख आयुष्य
आलवणात काढलस तू....एवढ्यात यमदूत प्रकट झाला.तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला
आठ दिवस पुण्यात फिरायला मिळेल.तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणालाही दिसू शकाल.
आठ दिवसांनी तुमचे आत्मे पुनर्जन्म घेतील.सुमी म्हणाली,”हो!पण पुण्यातच रे बाबा”.
यमदूत गेला.सगळ्याजणींनी आता रात्री आपापल्या घरी जायचं ठरवलं.उद्या आपण
शाळेत भेटू ग!!!म्हणजे हुजूरपागेत बर का.
तर अश्या ह्या आपल्या नायिका सत्तर वर्षांपूर्वीच्या पुण्यातील माहेरवाशिणी
यमी म्हणजे पूर्वीची राधा गोखले तर नंतर यमुनाबाई माधवराव कुलकर्णी
सुमी म्हणजे पूर्वीची जानकी देशमुख ,लग्नानंतर सुमन दिनकर पाटील सेवानिवृत्त शिक्षिका.
गोदी म्हणजे पूर्वीची कमल देसाई आणि लग्नानंतर गोदावरीबाई जोशी.काशी म्हणजे पूर्वीची
माधवी बर्वे नंतर काशीबाई श्रीरंगपूरकर ,पण बालविधवा.रंगी म्हणे रंगू जाधव कसब्यातून येणारी
एकमेव मुलगी.नंतर रंगुने खूप काम केलं सामाजिक क्षेत्रात.जिवंत असताना आपली मैत्री या पाचही
जणींनी जीवापाड जपली.देवाला त्या एकच मागणं मागत.पुढच्या जन्मी याच मैत्रिणी दे रे!!
तर आता हे मागणं मान्य करायची वेळ आली.पुढच्या आठ दिवसातील धमाल आणि या
आज्यानी केलेली कमाल जाणून घ्या पुढील भागात..
कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.कथेतील नाव सुद्धा.फक्त पुण्याची पार्श्वभूमी
असल्याने स्थळांची नावे खरी वापरली आहेत.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा