Login

धम्माल पुनर्जन्माची.....(भाग 5)

एकेक मैत्रिणीच्या आयुष्याचे पदर उलगडत असताना,त्यांच्या पुनर्जन्माबाबत सुद्धा त्या मनात काह??

मागील भागात आपण पाहिलं की भर पुण्यात ह्या सगळ्या प्रकट झाल्यावर काय धमाल झाली.प्रियाने घरी नेऊन त्यांचा थोडा मेक ओव्हर केलात्याबरोबर गोदा च्या आयुष्यात तिच्या बाबांच्या जाण्यामुळं अचानक वेगळं वळण आलं.पुढंच सगळं आयुष्य बदलून गेले.एक ठराविक चाकोरी आखलेले आयुष्य जगावे लागले.परंतु आपली राहिलेली इच्छा आपल्या नातवाच्या बायकोकडून पूर्ण करू  घेतली .आता पाहूया पुढे......







प्रांजल गोदावरीच्या सर्वात मोठ्या नातवाची बायको.घरात आलेली पहिली नातसुन.प्रांजलला पाहून सुमी एवढी आनंदी झाली की तिने गोदाला गच्च मिठी मारली.हि प्रांजल माझी विद्यार्थिनी.तुम्हाला माहित आहेच की ,मी पुसेगाव हायस्कुल मधून मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाले.त्या टुमदार गावातील अनेक गुणी विद्यार्थी आठवणीत आहेत त्यातील हि एक.तेव्हा माझ्या निवृत्तीला एक दोन वर्षच राहिलेली.एक दिवस हि प्रांजल तिच्या मावशी बरोबर शाळेत आली.नववी ला प्रवेश हवा म्हणून...मी तिची कसून चौकशी केली.पोर हुशार होती.आई बापाची गरिबी म्हणून मावशीने शिकायला आणली.लवकरच प्रांजल शाळेत रुळली.परंतु ती सतत उदास असे.एक दिवस मी शाळेत लवकर आले असता,प्रांजल एका कोपऱ्यात रडत होती.मला पाहताच गप्प झाली.मी तिला ऑफिस मध्ये बोलावलं,पाणी दिलं प्यायला.मग हळुवार चौकशी केली,मावशी त्रास देते का?तेव्हा म्हणाली,"मावशी आईसारखी माया करते बाई",पण...तिचे यजमान आणि जावा खूप अपमान करतात.माझ्यावरून तिला बोलतात.स्वतःला मुलं नाही अन दुसऱ्याच आणून ठेवलं...रडत रडत ती सांगत होती.बाई माझे आई बाबा खूप गरीब आहेत हो..मग मी तिला प्रेमाने जवळ घेतलं आणि सांगितलं प्रांजल बाळा...जर हे सगळ बदलायच असेल तर तुला शिक्षणाचं बळ पंखात भरलं पाहिजे.त्यानंतर दहावीत अख्ख्या तालुक्यात पहिली आलेली पोर...नंतर मी निवृत्त झाले.खरतर मला प्रांजलची जबाबदारी घ्यायची होती.पण देवाने लगेच बोलावलं...हो पाच मध्ये मीच याबाबत पहिला  नंबर लावला.











बोलताना सुमनच्या डोळ्यात पाणी थांबत नव्हतं.रंगुने हळूच इच्छा प्रकट केली आणि.....प्रांजलला तिच्या लाडक्या आज्जे सासूबाई दिसलाच ...बरोबर दिसल्या तिच्या प्रिय बाई...पाटील मॅडम...सुमन पाटील मॅडम तिच्या जीवनाला वळण देणाऱ्या.प्रांजल धावली बाईंकडे.नंतर खूप वेळ सगळे रडतच होते.यमू बोलली,"सुमे बस,किती रडवताय पोरीला?.सगळ्यानी पोटभर गप्पा मारल्या.एवढ्यात प्रांजलचा नवरा आत आला.सगळ्या अदृश्य झाल्या.प्रांजल!!रिपोर्ट आले,आपण टेस्ट ट्यूब बेबी करू शकतो...पुढच्या महिन्यात जाऊ डॉ.कडे.त्यांचे बोलणे ऐकून गोदाने मनात काहीतरी ठरवले.एवढ्यात संध्याकाळच्या आरतीची वेळ झाली.ते दोघे खाली गेले.या पाचही जणी झोपायच्या तयारीला लागल्या.रंगू म्हणाली,"ये,उद्या शनिवारवाड्यात आपण प्रकट भटकायचं बरं!मी मस्त जिन्स घालणार,आणि मी लॉंग स्कर्ट सुमन म्हणाली.









पहाटे पुन्हा या सगळ्या प्रांजलला भेटल्या.तिचा निरोप घेताना गोदा तिच्या कानात बोलली.त्याबरोबर प्रांजलने पैसे तिच्या हातावर ठेवले.एवढे कशाला???असू दे मजा करा.सगळ्या अदृश्य झाल्या.इकडे प्रिया जाम उत्साहात होती.शाळेला सुट्टी असूनही आम्ही आज मैत्रिणी भेटतो.असे आईला सांगितले.प्रिया पोहोचली....प्रियाचा डोळ्यावर विश्वास बसेना.यमू आज्जी?????मस्त पफ केलेले केस, छान वनपीस आणि गॉगल.प्रिया धावतच जवळ गेली.काय दिसताय ग!!!वॉव मस्तच....तशी गोदा म्हणाली,"तुझी आज्जी होतीच स्टाईल आयकॉन.शाळेत गुप्ते बाई किती रागवायच्या पण...यमू रोज नवी केशरचना करणारच.तेवढ्यात रंगू हसून म्हणाली,"हे काहीच नाही!!कॉलेजचं सांगू का????सांग ना ग आज्जी!!प्रिया डोळे मिचकावत म्हणाली.अरे हो!!हो!!!सांगते.सुमी हसली!!!यशवंत गुप्ते????????????????????











नाव एकताच यमू चिडली,????????????गपा ग!!!तेवढ्यात प्रिया ओरडली,थांबा!!गुप्ते आजोबा???????? अरे पण ते तर आजोबांचे जानी दोस्त होते!तीच तर गंमत आहे.आम्ही इंटर आर्ट्स ला आणि तुझे आजोबा इंटर सायन्स.गुप्ते जॅम फिदा होता हिच्यावर...पण यमू च्या बाबांनी मात्र तुझ्या आजोबांना निवडलं... प्रिया हसत म्हणाली काय???हो ना.काशी मात्र चिडली,"हि कॉलेज मधली गंमत आम्हाला नाही सांगितली".काशी अग या यमीने फटकावल असत ना   आम्हाला????????????तेवढ्या भेळ वाला दिसला.ये भेळ खाऊ चला!!हो ना सुलभी म्हणजे या प्रियाच्या आजीने गेले 10 वर्ष चमचमीत खाऊ दिलं नाही.गोदा हसून म्हणाली,"म्हणूनच तर तू एवढी जगलीस आणि आम्ही अडकलो ना तिकडं स्वर्गात...हं.भेळीवर ताव मारला,मग पाणीपुऱ्या खाल्ल्या ,चायनीज सुद्धा हादडले...तरी कुरकुर होतीच.किती बाई गाड्या!!काय हि गर्दी!!बघ की ??माणसं पार अंगाला खेटून चालतायत......











सगळ्या भटकत असताना दूरवर एका बाकावर तीनचार म्हातारे बसले होते.त्यांना पाहताच प्रिया ओरडली,"गुप्ते आजोबा!!!काय??????रंगू म्हणाली,"गुप्ते अजून इथंच आहे पृथ्वीवर?????हो !!!ते बघ की?? काशी पुढे झाली!!बघू ग???अरे हा टकला????????????तेव्हा रंगी म्हणाली,"अरे ,आता नव्वद पार झाला...तेव्हा तो अगदी देवानंद होता....कॉलेज मध्ये अनेक जणी मरायच्या त्याच्यावर...एवढं बोलत त्या पोहचल्या .प्रियाने हसून नमस्कार केला.या पाचही जणींची ओळख करून दिली.या माझ्या मैत्रिणी..गुप्ते आजोबा मात्र यमी कडेच पहात होते.......शेवटी ते बोललेच,"प्रिया,तुझी हि मैत्रीण ????अगदी तुझ्या पणजी सारखी दिसते ना.....यमूला ठसका लागला...चला ग पाणी पिऊ म्हणत हसतच सगळ्या पळत सुटल्या????????????????सगळ्या जणींनी धम्माल केली.संध्याकाळ झाली,प्रिया म्हणाली,"आज्जी चल आता घरी.तेव्हा रंगू म्हणाली,"प्रिया,तुझ्याकडे शेवटी येणार आम्ही...तू जा हं बाळ.तेव्हा प्रिया निरोप घेऊन निघाली.मग रंगू सगळ्यांकडे वळत म्हणाली,"चला आज समाजसेविका रंगू च्या आयुष्याची एक बाजू जी पहायची राहिली ती ऐकू आणि माझ्या घरी जाऊ....











काय असले रंगुच्या आयुष्याची दुसरी बाजू????आता पुढे पुण्यात या मैत्रिणी आणखी काय धम्माल करतील???वाचू  पुढील भागात.....


0

🎭 Series Post

View all