Login

धम्माल पुनर्जन्माची अंतिम भाग (उत्तरार्ध)

आपल्या पंचकन्यांचा प्रवास आज तृप्त होऊन पूर्ण झाला.कसा ?
मागील भागात आपण पाहिले की,अखेर प्रिया व राहुलचे लग्न ठरले.आता या पाचही जणींना यमदूताला आपली अंतिम इच्छा सांगावी लागणार होती.आता पाहूया पुढे.......

पाचही मैत्रिणी एकत्र जमल्या,मैत्रिणींनो आधी आपण त्या त्या घरी जाऊ जिथे पुनर्जन्म घ्यायचा आहे.मग परत भेटू महादेवाच्या मंदिरात...असे म्हणून सगळ्या अंतर्धान पावल्या. श्रीरंगपूरकर आज एका समारंभासाठी एकत्र आले होते.वैदेही खूप आनंदात होती.आजोबांनी धाडसी निर्णय घेऊन तिचा पुन्हा विवाह केला होता.ती वरच्या खोलीत गेली,काशी आजीच्या फोटोसमोर दिवा लावायला.दिवा लावून ती वळणार एवढ्यात ...वैदेही!!बाळ मागे बघ.वैदेही मागे वळली.काशी आजी !! हो,बाळ.मीच तुझी पणजी आजी.वैदेही बाळ मला एक सांगायचं आहे.मला तुझ्या घरी यायचंय,खूप रंग असणार,गंध असणार छान आयुष्य जगायचंय.आई बाबा आणि भावंडांचे प्रेम अनुभवायचं.असे म्हणून काशीने तिला सगळे सांगितले आणि म्हणाली,"नाव लक्षात ठेव...माधवी.

इकडे प्रांजल डॉ .च्या दवाखान्यात होती.आज टेस्ट ट्यूब बेबी बाबत सगळं समजावलं होत.यश येईल का?मी आई होईल का?तिचे विचार चक्र चालू होते.एवढ्यात हाक आली,प्रांजल!तिने पाहिले पणजी सासूबाई!!गोदाने तिला हलकेच जवळ घेतले.तू काळजी करू नकोस हो!तुला एकदम दुप्पट आनंद मिळणार...त्यातली एक मी असेल...कमल.. प्रांजल खुदकन हसत दवाखान्यातून बाहेर पडली.

आज संजनाला कामावरून यायला जरा उशीर झालेला.विराज तिची वाट पहात होता.एवढ्यात हाक ऐकू आली,जवाईबापू!!विराज घाबरलाच.इकडे बघा.रंगू प्रकट झाली.त्याने रंगुला ओळखले.विराजराव मला खेळवायला तयार ना!!मी लाख तयार असेल आजी पण...संजूभाई??एवढ्यात संजना आत आली.तिने सगळं ऐकलं आणि लाजून विराजच्या खांद्यावर डोकं ठेवलं.रंगू आजी अंतर्धान..
डॉ. विभावरी पाटील...आज लंडनच्या दिशेने रवाना होणार होती.कुटुंब,देश सगळे सोडून.तिने आदराने सुमनच्या फोटोला नमस्कार केला.एवढ्यात सुमन तिला समोर दिसली.विभा!!मी येईल लवकरच...विभा इकडे तिकडे पाहू लागली कोणीच नव्हते.
राहुल झोपायला निघाला तेवढ्यात ,यमू आजी समोर आली.हे बघ राहुल प्लॅनिंग वगैरे मला माहित नाही.आम्ही सगळ्या एकत्र यायला हव्या..प्रियाला सांगितलय मी...राहुल दचकून उठला कोणीच नव्हते.

आता रात्रीचा प्रहर झाला.एवढ्यात महादेवाच्या मंदिरात सुमी,यमू,रंगू,गोदी आणि काही हजर झाल्या.यमदूत त्यांची वाटच पहात होता...सर्वजणी तयार होत्या पुनर्जन्म घेऊन धमाल करायला.यमदूत एकेकीच्या डोक्यावर हात ठेवत गेला...थोड्या वेळाने सगळे संपले...


इकडे ज्युनियर प्रियाने आपले काम चोख केले होते.सर्वांना गंगाधर शास्त्रींचे पत्र सर्वांना पोहोचले.सगळ्यांकडे गोड पऱ्या आल्या होत्या.....

सहा वर्षानंतर...हुजूरपागा....इयत्ता पहिली.बाई हजेरी घेत होत्या,माधवी कमल,रंगोली, सुमन,यमुनोत्री......एका नव्या धम्माल जीवनाची परत सुरुवात होत होती.


आज ही कथामालिका संपली.शेवटच्या भागातील उत्तर आधीच्या भागात असल्याने कदाचित नवीन वाचकांना ती समजणार नाहीत.त्यांनी ईरा वेबसाईट वर माझ्या प्रोफाइल वर कथा सुरुवातीपासून वाचावी.
प्रतिसादाबद्दल आभार

लेखक प्रशांत कुंजीर
0

🎭 Series Post

View all