Login

धम्माल पुनर्जन्माची .....(भाग 9)

सुमनच्या पणती ची प्रेमकथा या मैत्रिणींमध्ये नात्याचा नवा गोफ कसा गुंफला जाईल ते पाहूया!!

मागील  भागात आपण सुमनचा शिक्षिका म्हणून प्रवास पाहिला, नवरा आणि सासूच्या भक्कम पाठिंब्यावर सुमनने केलेला हा प्रवास.त्याबद्दल सुमनच्या मनात असलेली कृतज्ञता आणि हा प्रवास सफल झाल्याचा अभिमान तिच्या डोळ्यांतून झळकत होता.त्या टुमदार बंगल्यात तिचे सुखी कुटुंब नांदत होते.आता पाहूया पुढे........





भांडणाचा आवाज ऐकून या पाचही मैत्रिणी थबकल्या. आत गेल्यावर पाहिलं तर सुमनची पणती प्रिया तिच्या बाबांशी भांडत होती...बाबा वहिनी डॉक्टर आहे हे तुम्हाला आधीच माहित होत ना?तिने स्पष्ट सांगितलेलं की मला मास्टर्स करायचं आहे.प्रिया!!गप्प रहा,प्रियाचे बाबा ओरडले,तेव्हा लाख सांगितलं असेल पण आता आमचं ऐकायला हवं.सुमन आजीच्या सासू एवढं माझं मन मोठं नाही असे समज.आता मात्र प्रिया चिडली.बाबा आज मी सुद्धा वैद्यकीय शिक्षण घेत आहे,उद्या माझ्या सासरचे असेच बोलू लागले तर???ते काही नाही दादा -वहिनी बाकी कोणी नसेल तरी मी तुमच्या बाजूने आहे.प्रिया ताडताड बोलत आत निघून गेली.आता या पाचही मैत्रिणी प्रियाच्या खोलीकडे वळाल्या,प्रिया सुमनच्या फोटोसमोर राहून रडत होती.आजी उद्या माझं लग्न झाल्यावर असच होईल का?तेव्हा रंगू म्हणाली,"झालं तरी तिथे सुद्धा कोणीतरी प्रिया असेलच की तुझ्या बाजूची".प्रिया आवाज ऐकून घाबरली,इकडे तिकडे पाहू लागली.प्रियाने रंगुला ओळखले,रंगू आजी????त त तं तू????आता रंगू सुद्धा बावरली.एवढ्यात सगळ्या जणी प्रकट झाल्या.प्रिया इथे बघ!!सुमनला पाहून प्रियाने आनंदाने उडीच मारली.आजी!!हे सगळं काय आहे????काशी पुढे होत म्हणाली हे बघ बाळा,विज्ञान किती पुढे गेलं तरी हे सगळं खरं आहे.प्रियाने सगळ्यांना नावानिशी ओळखलं.सुमन आजी पारायण करायची तुमच्या नावाची ,तुम्ही सगळ्या अगदी लहानपणापासून माझ्या डोक्यात फिट्ट आहात. आजी तू आता बाबांचा बंदोबस्त कर,उद्या राहुलने.......एवढे बोलून प्रियाने जीभ चावली.ओ हो!!!राहुल!!राहुल कोण ???शुउऊऊ आजी  बाबांना कळेल.राहुल कोण?फोटो दाखव?





प्रियाने लाजत फोटो दाखवला,यमु ने ओढलाच तो फोटो,ये ,हा राहुल दिगम्बर बर्वे ना?प्रिया आ वासून पहातच राहिली.सुमी ओरडली,प्रिया ,माझ्या आधी यमीला कस काय माहित झालं नाव?यमु ने सुमीच्या पाठीत गुद्दा मारला,गदडे, हा माझ्या नातजावई दिगंबर पंतांचा मुलगा.डॉक्टरकी शिकतो.गोदा पुढे झाली,छानच की,प्रिया आणि राहुल छान शोभतील.प्रियाचे डोळे मात्र भरून आले...आजी बाबा नाही तयार होणार.तुला माहितीय ना....मधू काका आणि......सुमन हा मधू कोण?याचा माझ्या प्रिया आणि राहुलशी काय संबंध??यमे लगेच तुझी प्रिया का???अग मधू म्हणजे मधुकर जोशी ,हिच्या बाबांचा सगळ्यात जवळचा मित्र पण....धंद्यात काहीतरी बिनसले....तेव्हापासून ...आलं लक्षात...जात आणि खानदान वगैरे वगैरे ....







या पाच जणी एकत्र आल्या,प्रिया काहीही काळजी करू नको!!आम्ही बरोबर धडा शिकवतो तुझ्या बाबांना!!!

काय करतील या मैत्रिणी?प्रियाचे बाबा होतील का तयार??राहुल आणि प्रियाला या मैत्रिणी भेटल्यावर काय धम्माल होईल???जाणून घेऊ पुढील भागात





वैयक्तिक अडचणीमुळे हा भाग थोडा लहान झाला आहे.वाचकांनी लोभ असू द्यावा!!!


0

🎭 Series Post

View all