Login

धम्माल पुनर्जन्माची.....(भाग 10)

दोन जुळणारी मने जोडायला या मैत्रिणींनी काय युक्ती केली,पाहूया आजच्या भागात

मागील भागात आपण पाहिले,की सुमनची पणती प्रिया आणि यमुना पण तो राहुल यांचं एकमेकांवर प्रेम आहे. हे कळल्यावर या पाच मैत्रिणी प्रचंड खूश झाल्या, कारण आता यारी दोस्ती नात्यात बदलणार होती. परंतु प्रिया मात्र प्रचंड नाराज आणि निराश होते. कारण पुण्याचे बाबा या गोष्टीला कधीही तयार होणार नाहीत. याची तिला खात्री होती. परंतु आपल्या पंचकोन यांनी प्रियाला आश्वस्त केले. आता पाहूया पुढे काय होतंय 







सुमे आपण प्रियाला शब्द दिला. पण आता आपण काय करणार ? कसे ओळखणार प्रियाच्या बाबांचे मन? खर तर सुममला सुद्धा काय करावे हे सुचत नव्हते.तेव्हा काशी म्हणाली,"मी सुचवू का? रंगू रागावून बोलली," गधडे!! सांग लवकर! बघा एक उपाय आहे.सुमन आज पर्यंत आपण आपले भूत असणे कोणालाच दर्शविले नाही?आता ती वेळ आली आहे.आता सुमन तू प्रियाच्या बाबांच्या समोर प्रकट हो!त्यानंतर तू प्रियाच्या मनाविरुद्ध काही नको असे सांग.हे ऐकून गोदा हसली,"काशे फुसका आहे हा प्लॅन,आधी त्याला थोडं घाबरवायला हवे.थांब,आता मजा बघ.रंगू आणि गोदाने बोलायला सुरुवात केली,राजेश!!!अरे ये राजेश!!प्रियाचे बाबा ताडकन उठले.डोळे चोळत इकडे तिकडे पाहू लागले.समोर कोणीही नव्हते.या दोघी परत खुसपुसल्या,"राजेश,अरे तुझ्या मित्राची पोरगी प्रेम प्रकरणात गेली ,म्हणून तू प्रियाला अडवणार का??राजेश आता घाबरला.त्याने प्रियाच्या आईला उठवलं.आता इथे कोणीतरी बोलत होत.प्रियाची आई ओरडली,"झोपा हो गप्प कोणी नाहीय तिकडे".परंतु त्याला झोप येईना.रात्रभर तो याच विचारात होता.कोण असेल?तो आवाज खरा की भास???पहाटे केव्हातरी डोळा लागला.





सकाळी उठून त्याने पहिला फोन त्याच्या मित्राला लावला.सदा कसा आहेस?भेटायला येऊ का???राजेश चा बालमित्र सदाशिव गोरे याच्या मुलीने दोन महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती.प्रेम प्रकरणात घरच्यांनी परवानगी नाकारून दुसरीकडे लग्न लावले म्हणून.राजेश घरी सांगून सदाला भेटायला निघाला.सदाच्या घरी दिवानखान्यातच मुलीचा हार घातलेला फोटो होता.राजेश फोटो पहात असताना काशी त्याच्या कानात कुजबुली,"प्रियाचा असा फोटो पाहू शकशील का???आवाज ऐकून तो कावरा बावरा झाला.मनात एक कळ उठली.सदा अजूनही या धक्क्यातून सावरला नव्हता.पोटची पोरगी गमावली रे!निदान तीच म्हणणं ऐकून त्या मुलाला भेटायला पाहिजे होत ..आता माझी पोर कधीच हसणार नाही....रागावणार नाही.....एवढ्यात रंगू राजेशच्या कानात बोलली,"तू सहन करू शकशील असे दुःख???कोण आहे?????राजेश मोठ्याने ओरडला.मित्राला धीर देऊन राजेश घरी जायला निघाला.घरी येत असताना परत सुमन त्याच्या कानाजवळ बोलली,"राजा ,बाळा अरे प्रिया काय म्हणते ते ऐक तरी एकदा".हा आवाज मात्र राजेशने ओळखला.सुमन आज्जी??????कोण आहे?????काय चाललं आहे हे???एवढ्यात या पाच मैत्रिणी समोर आल्या.राजेशला सगळं समजावलं.राजेश विचारातच घरी आला.संध्याकाळी सगळे जेवायला बसले असताना राजेश सुनबाई आणि मुलाला म्हणाला,"सुनबाई ,करा तुमचं स्वप्न पूर्ण,आणि लाडक्या नणंद बाईला म्हणावं,"कोण तो राहुल आहे त्याला भेटवा एकदा.प्रिया रागाने खोलीतच होती.बाबांचे बोलणे ऐकून धावतच खाली आली.बाबा!!!म्हणत गळ्यात पडली.





प्रियाराणी ,आता खुश ना!!सुमन म्हणाली.एवढ्यात यमू बोलली,"बयो अजून एक अडथळा बाकी आहे,या दिगम्बर पंतांची बायको ,माझी नातं.सुमती बर्वे,पक्की शाकाहारी,शुद्ध सात्विक,त्यामुळं सूनसुद्धा तशीच हवीय......पण ते तुम्ही माझ्यावर सोडा.मी काय म्हणते!प्रिया आता राहुलची भेट घालून दे!!!आज्जी त्याला कधी भेटेल असं झालय मला.पण कुठे भेटायच???गोदा हसत म्हणाली,"सारसबागेत भेटू या!!गणपती आणि आमचे आशीर्वाद एकदम मिळू दे.यमू आजी हसत म्हणाली,"आमच्याबद्दल सांगू नकोस काही,जरा गंमत करू .प्रिया राहुलच्या भेटीची स्वप्न पहातच झोपी गेली.



सुमन मात्र काळजीत पडली.अग अशी सासू असेल तर कस होणार?या प्रिया बाईला प्रत्येक रविवारी चापून मटण भाकरी लागते..यमे अग माझ्या पोरीला त्रास नाही ना होणार!!यमू हसली,"मी आहे ना!!सुमती तशी खूप हौशी आहे,मनाने सुद्धा सालस आहे,फक्त आहाराबाबत मात्र ती थोडी कर्मठ आहे.अग म्हणूनच तर हा दिगम्बर आणि राहुल माझ्या घरी यायचे.सुलभाला वाटे ,या म्हातारीला काय कळत?पण पडल्या ,पडल्या सुद्धा कळायचं हो!!!

असो,उद्या तू राहुलला भेट,मग ठरव तुझी पोर खुश राहील की नाही.





आता सारसबागेत काय धमाल येणार???जुन्या काही आठवणी आणि नवे काही पाहून कशी मजा करणार या मैत्रिणी.भेटू या सारसबागेत पुढच्या भागात....


0

🎭 Series Post

View all