मागील भागात आपण पाहिले की,प्रिया व राहुलच्या रुपात या मैत्रिणींची कुटुंबे परत एकत्र येऊ शकतील .प्रियाच्या वडिलांना युक्तीने तयार केले,आता वेळ होती राहुलच्या आईची,यमूची नात सुमती या लग्नाला परवानगी देईल का???पाहूया आजच्या भागात.
प्रियाने राहुलला उद्या सारसबागेत भेट असा मॅसेज केला आणि झोपली.राहुल हॉस्टेलवरच होता.प्रिया सुट्टीवरून कधी आली?उद्या कशाला भेटायचं असेल??तेसुद्धा सारसबागेत.राहुल बर्वे उंच,गोरा घारा,टिपिकल पुणेरी आणि थोडासा देशी तडका असणारा.मेडिकल कॉलेजमध्ये चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध राहुल तसा लाजाळू.प्रिया आणि राहुल गेले तीन वर्षे एकमेकांच्या प्रेमात होते.तूप भात आणि मटण भाकरी असं त्यांना सगळी मित्र मंडळी चिडवायची.राहुल मात्र पक्का खवय्या होता.त्याला काहीही व्यर्ज नव्हते.हा सगळा विचार चाललेला असताना कधी झोप लागली कळलेच नाही.सकाळी मोबाईल जोरजोरात ओरडायला लागल्यावर राहूल खडबडून जागा झाला.प्रियाला भेटायला जायच ,पटपट तयारी करायला हवी.तेवढ्यात प्रियाचा फोन फोन आला मी निघालेय, वेळेवर ये.प्रियाचा फोन ऐकून यमू आजी हसली,"राहुल आणि वेळेवर,काहीही ...अग त्याला दहा वेळा आठवण करावी लागते.आपण आरामात जाऊ या प्रिया,तेव्हा सुमन रागावली,नको,त्याला वाट पहायला लावायची का?जावई माणूस तो रागावला तर??रंगू ओरडली।"सुमे गप...आता त्या प्रियाला आवरू द्या.प्रिया छान तयार झाली,सुंदर अबोली रंगाचा पंजाबी सूट,मोकळे केस, हलकासा मेकअप,हातात सुंदर पर्स ,प्रियाला पाहून यमू ओरडली,सुमे राहुलचे काय खरे नाही,हो!काय सुंदर दिसतेस प्रिया,काशी पुढे होत म्हणाली,माझा आवडता रंग अबोली.सगळ्या प्रियाबरोबर सारसबागेत पोहचल्या,राहुलचा पत्ता नाही.यमू हसली,"म्हणाले होते ना,पण या सुमीला मध्येच परंपरा आठवतात.आता बसा वाट बघत...
इकडे राहुल तयार होत होता,पेस्टल रंगाचा शर्ट,गोरापान रंग,धारदार नाक,व्यायामाने बांदेसुद शरीर.कोणत्याही तरुणीला स्वप्नातील राजकुमार वाटेल असा.राहुल अक्षरशः धावत पळत पोहचला,तरीपण एक तास उशीर झाला.इकडे प्रिया आणि यमू ज्वालामुखी झाल्या होत्या.राहुल समोर आला,"सॉरी!!ते उठायला...हो !!तू काय बाबा राजकुमारच ना...मला काय कामच नसतात काही.राहुल वारंवार माफी मागत होता.तेवढ्यात काशी आणि गोदा म्हणाल्या,"छानच दिसतोय जोडा,मी आता प्रियाच्या जागी असते तर इथेच लग्न केलं असत.काशी हसत बोलली.तेवढ्यात यमू प्रियाला म्हणाली,"त्याला म्हणावं कान धरून सॉरी म्हण आणि तीन वेळा कोंबडा बन...प्रिया असे म्हणताच राहुल ओरडला...यमू आजीची शिक्षा..यमू आजी म्हणजे माझ्या आईची आजी..धमाल होती म्हातारी...काय म्हातारी??प्रिया अजिबात माफ करू नकोस..तुला सांगतो प्रिया सुलभामावशी इतके छान मासे बनवते.आजीला कळत असे पण...नव्या पिढीला ती अगदी सहज सामावून घ्यायची.हो का?तुला सांगतो प्रिया आज जर यमू आजी असती ना तर आईला सहज समजावलं असत तिने.ते तर ती समजावेल ,काय म्हणालीस?????ते ती समजावेल प्रिया काहीही काय बोलतेस???आजी जाऊन 6 महिने झालेत .तरीही समजावेल ...यमू आजीने मागून आवाज दिला.राहुल मागे वळाला,मागे एक अत्यंत सुंदर अशी तरुणी उभी होती...राहुलने नीट पहिले,परत डोळे चोळले.
अमेझिंग यार ,प्रिया टाइम ट्रॅव्हल करून यमू आजी तरुण झाली तर अगदी अशीच दिसली असती.......हं आणि आम्ही असे म्हणत बाकीच्या पण पुढे आल्या.राहुल बघतच राहिला.प्रियाने त्याला सगळं सांगितलं.माझ्या बाबांची परवानगी यांनीच मिळवून दिली.राहुल आता खूप खुश झाला.आजी आता माझ्याकडची परवानगी पण मिळव ना.काशी हसली,"यमू काय करू या?तुम्ही सांगा?गोदा म्हणाली,"आम्ही मदत करू पण???पण काय आजी??रंगू पाठीवर थाप मारत म्हणाली,आम्हाला सारसबागेत फिरवायच.
हातीचच्या एवढच ना....चला .काशी थांबली,"अग गणपतीला दुर्वांचा हार करते.आजी आत विकत मिळते सगळ.काय???हो अगदी उकडीच्या मोदका सकट. रंगू म्हणाली,"उकडीचे मोदक मात्र यमू आणि गोदानेच करावेत बरं. चला जाऊ या.सारसबागेत येताना इतका मोकळेपणा पाहून या सगळ्या जरा नाराजच दिसल्या.देवाचे दर्शन घेताना हे काय सगळं??शिवाय किती हि गर्दी.यमे आपण यायचो तेव्हा किती शांतता असायची,वातावरण अगदी प्रसन्न असे.तिकडे कोपऱ्यावर पेरुवाला असायचा ,त्यापलीकडे रसाचे गुऱ्हाळ.काशी आठवणीत रमून गेली.अग काळानुसार बदल होणारच की,पण गणेशवरची श्रद्धा कायम आहे ना!झालं तर मग.रंगू मात्र चिडली होती,"श्रद्धा असू दे पण हे अंगचटीला येणं, विनाकारण हसण ,खिदळणे जरा मर्यादेत हवे.आजी चल आपण मस्त थंड पिऊ या,प्रिया म्हणाली.मसाले ताक ???काय????गोदा किंचाळलीच ,ताक विकत घेऊन प्यायचं?ते पण वीस रुपयाला ग्लास??अरे रांजणभर ताक वाटायचे मी,ते पण फुकट.आता मात्र रंगू चिडली,गोदे हा काही तुझा वाडा नाही,मला जाम तहान लागली आहे.चला ताक पिऊ.सुमन हसत म्हणाली,"किती बदल झालाय बघ,जे आपण आरोग्यासाठी घरात सहज खायचो ,प्यायचो ते आज विकत घ्यावे लागतेय.अशा मस्त गप्पा चालल्या होत्या.तेवढ्यात प्रियाने भेळीची ऑर्डर दिली,भेळ पाहून काशीचे डोळे भरून आले.तुम्हाला आठवत मला भेळ किती आवडायची.सुमी म्हणाली,हो तर,आम्ही तुला त्यावरून किती चिडवायचो.पण तू रडतेस का?काशी सुस्कारत म्हणाली,"हे गेले,त्यानंतर घरात एकदा भेळ बनवली होती,खूप खावीशी वाटली,एकच घास हातात घेतला,एवढ्यात आज्जे सासूबाईंच्या ते लक्षात आलंआणि...हाताला चटका दिला,मला दोन दिवस....उपाशी...प्रिया ते ऐकूनच रडायला लागली.राहुल हसला,आज्जी तू जर माझी आजी असतीस तुला रोज भेळ खायला घातली असती बघ.पुन्हा सगळे हसायला लागले.
खूप मजा मस्ती करून झाली,आता जरा विचार करू,सुमातीला तयार करायच म्हणजे आधी दिगंबर म्हणजे राहुलच्या बाबांना तयार करावे लागेल.आपल्याला काहीतरी करून.त्यासाठी राहुलच्या घरी जाऊ...काही गरज नाही.यमू आजी म्हणाली,"तुझ्या या प्रियाला माझी प्रिया मदत करेल..माझ्या घरात बेत तडीस नेऊ....काय असेल युक्ती?राहुलची आई तयार होणार का???यमुच्या घरी काय मजा होणार?पाहू या पुढील भागात..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा