Login

ढेकणाच्या भीतीने घर जळत नाही (भाग १)

भाकित

कथेचे नाव - ढेकणाच्या भीतीने घर जळत नाही.

शीर्षक - भाकीत

लेखक - स्वाती पवार

ऊस तोडी करणाऱ्यां माणसांची गाडी  मुक्कामासाठी गावच्या वेशीजवळच असलेल्या मंगल च्या घराजवळ येऊन थांबते.
गाडीचा आवाजाने मंगला जाग येते. ती उठून घटाळ्यात बघते तर पहाटेचे पाच वाजलेले असतात. ती हळूच दरवाजा उघडते व बाहेर बघते. ऊस तोडी करणाऱ्या माणसांची टोळी घराबाहेर येऊन थांबलेली असते.  ते गाडीतून सामान काढून तंबू ठोकण्याचे काम करत असतात...
पहाट झाली असल्यामुळे मंगल,"अंगण ठेवलेला बंबामध्ये पाणी ओतून बंब पेटवते... तेवढ्या शंकराव बाहेर येतात व ऊस तोडी करणाऱ्या माणसांना बोलतात काही लागलं तर सांगा...

त्यावर ती माणसं बोलतात आम्हाला  फक्त पाणी लागेल..

मंगल चे घर हे गावच्या वेशी जवळच होते. आजूबाजूला मोठे पटांगण व पिण्याच्या पाण्याची सोय असल्यामुळे ऊस तोडी करणाऱ्या माणसांची टोळी नेहमी तिथे मुक्कामासाठी येत असत.

मंगल बंबातील गरम पाणी बादलीत काढून दोन्ही मुलांना अंघोळीसाठी देते. उमेश आणि विशाल या दोघांचेही डबे बनवण्यासाठी ती स्वयंपाक घरात जाते...
विशाल आणि उमेश हे मंगलची सावत्र मुल असतात ती तालुक्याच्या ठिकाणी एका कंपनीत काम करत असतात.

विशाल आणि उमेश मंगलला आवाज देतात...आई ...मोठी आई ....अग़ झाला का तुझा टिफिन बनवून?

मंगल बोलते हो रे बाळांनो हा घ्या तुमच्या दोघांचाही डबा. आणि वेळेवरती खा....
मंगल दोघांच्याही चेहऱ्यावरून हात फिरवून पाप्या घेते. दोघेही मंगल च्या पाया पडून टू व्हीलर वरून कामाला जातात...

तितक्या 'शेवंता 'मंगल ची सवत ही परड्यातून गाईंच्या धारा काढून येते.....

शेवंता बोलते आक्का आज खूप कमी दूध दिलं गायांनी...

'मंगल,असू दे ..... कधीतरी होणारच. एक काम कर  तू आंघोळ करून घे . तोपर्यंत मी बाकीचं बघते..

शेवंता आणि मंगल बोलत असतानाच ऊस तोडीवाल्यांच्या टोळी मधून तीन चार बायका त्यांच्या तंबातून बाहेर येतात व मंगलला बोलतात" अहो बाईसाहेब या तुमच्या नळाच मी पाणी घेऊ का"?

हो घ्या की....

त्याचवेळी बायकांच्या घोळक्यातून विलक्षण चेहरा असणारी. कपाळावर  मोठ कुंकू लावलेली एक बाई तिरकस नजरेने मंगल कडे बघते.....

ती मंगळ जवळ येते ...तेव्हा ती बोलते  मी सगुना तुमच्या नळातून पाणी भरू व्हयं...ती तिरकसपणे मंगलशी बोलते... तुमच्या नळाचे पाणी लईच वाहून चाललंय इतकं पण वाहून देऊ नकोस की संपून जाईल....

तिच्या आवाजाने आणि तिच्या वक्रदृष्टीने मंगल घाबरून जाते...सगुना मंगला बोलते तुझ्याबद्दल माझ्याकडे एक भाकीत आहे सांगू का?

मंगल बोलते कसलं भाकीत...

तुझ्या दोन्ही पोरांबद्दल आहे...

तिची वक्रदृष्टी बघूनच मंगल घाबरून घरात जाते. काय असेल भाकित विचारू का तिला? मंगल मनातच विचार करते...


0

🎭 Series Post

View all