धोक्याची रिंग
रात्रीचे दीड वाजले होते. पुण्याच्या कर्वे नगरमधील राधिका अपार्टमेंटमध्ये नेहमीप्रमाणे शांतता पसरली होती. चौथ्या मजल्यावर असलेल्या फ्लॅट नंबर 407 मधील खोलीत मात्र दिवा लागलेला दिसत होता. त्या खोलीत बसलेली होती नेहा जोशी, २४ वर्षांची, नुकतीच गुन्हे शाखेत डेटा-विश्लेषक म्हणून रुजू झालेली. आज नेहाला झोप येत नव्हती. एका विचित्र प्रकरणाने तिच्या मेंदूचा ताबा घेतला होता.
दोन आठवड्यांपासून शहरात काही लोकांचा गायब होण्याचा सिलसिला सुरू होता. त्यात एक साम्य होतं, प्रत्येक व्यक्ती गायब होण्याच्या आधी एक अज्ञात क्रमांकावरून आलेला फोन उचलला होता, आणि तो कॉल उचलल्यानंतर २४ तासांच्या आत त्यांचा पत्ता लागत नव्हता.
पोलिस तपासात अजून काहीच मिळालं नव्हतं. पण आज पहाटे नेहाला एका फाईलमध्ये एक सामान्य पॅटर्न सापडला, सर्व फोन कॉल एकाच टॉवरवरून आलेले होते… आणि टॉवरची लोकेशन शहराच्या उपनगरातील एक २० वर्षांपासून बंद पडलेली इमारत,
“विनायक मिल कंपाऊंड”.
नेहाने चष्मा काढून डोळे चोळले. "कुणीतरी जाणूनबुजून लोकांना इथे खेचतंय… पण का?" ती मनात पुटपुटली.
तेवढ्यात तिचा मोबाईल वायब्रेट झाला. स्क्रीनवर नंबर unknown होता. तिचं हृदयाने अक्षरशः एक धडका चुकवला.

“पुन्हा तोच क्रमांक?” तोच नंबर, ज्यावरून गायब झालेल्या लोकांना कॉल आले होते. नेहाने काही सेकंद श्वास रोखून फोन उचलला. “हॅलो…?”
तिच्या कानात अगदी मंद, संथ, पण थरकाप उडवणारा आवाज आला, "नेहा… सत्य शोधायला आली आहेस ना? मग चला… माझ्यासोबत…" ताबडतोब कॉल कट.
तिच्या कानात अगदी मंद, संथ, पण थरकाप उडवणारा आवाज आला, "नेहा… सत्य शोधायला आली आहेस ना? मग चला… माझ्यासोबत…" ताबडतोब कॉल कट.
नेहाचे अंग पूर्ण थरथरले. "तुला माझं नाव कसं माहित?"
"मी कॉल उचलला, म्हणजे मीही…?"
पण ती घाबरून बसणाऱ्यांपैकी नव्हती. तिने लगेच आपला जॅकेट, टॉर्च, आणि सर्व्हिस आयडी घेतला.
"आज काहीतरी तरी सापडणारच…"
"मी कॉल उचलला, म्हणजे मीही…?"
पण ती घाबरून बसणाऱ्यांपैकी नव्हती. तिने लगेच आपला जॅकेट, टॉर्च, आणि सर्व्हिस आयडी घेतला.
"आज काहीतरी तरी सापडणारच…"
विनायक मिल कंपाऊंड — रात्री ३:१०
नेहा स्कूटरवरून उतरली. समोर विशाल, अंधारमय, मोडकळीस आलेली मिल उभी होती. तुटलेल्या काचा, कोसळलेल्या भिंती, आणि कंपाऊंडवर वाढलेलं काटेरी झुडूप. ही जागा शब्दशः जिवंत वाटत होती… एखाद्या गूढ श्वासासारखी. तिने टॉर्च चालू केली. प्रकाशाच्या वलयात धूळ नाचू लागली. समोर एक गंजलेला लोखंडी दरवाजा अर्धवट उघडा होता.

अचानक, खर्रर्र…असा आवाज आला. कोणीतरी आतल्या बाजूला पाऊल ओढल्यासारखा आवाज आला. नेहाने हळूच दरवाजा ढकलला. भीषण शांतता.
भिंतींवर पाण्याचे डाग, तुटलेल्या मशीनरीचे अवशेष, आणि जमिनीवर पडलेला एखादा शर्टाचा बटन, बांगडीचा तुकडा… अनेक. “हेच ते हरवलेले लोक…?”
भिंतींवर पाण्याचे डाग, तुटलेल्या मशीनरीचे अवशेष, आणि जमिनीवर पडलेला एखादा शर्टाचा बटन, बांगडीचा तुकडा… अनेक. “हेच ते हरवलेले लोक…?”
ती पुढे जात होती. मग अचानक तिच्या टॉर्चच्या प्रकाशात एक वस्तू चमकली, मोबाईल फोन. जमिनीवर पडलेला. स्क्रीन क्रॅक झालेली. फोनच्या मागे लिहिलेलं नाव पाहून नेहाचे डोळे विस्फारले, "राहुल पाटील"
गेल्या आठवड्यात हरवलेला २४ वर्षांचा इंजिनिअर.
गेल्या आठवड्यात हरवलेला २४ वर्षांचा इंजिनिअर.
नेहाने फोन उचलला, पण त्याच क्षणी, धडाम!
दरवाजा कोणीतरी जोरात बंद केला.
ती झटकन वळली. समोर कोणीच नाही.
तिच्या वाढत्या धडधडीत तिने जॉकेटमधला छोटा पिस्तूल सुरक्षित जागी पकडला आणि दुसऱ्या हॉलमध्ये पावले टाकली.
दरवाजा कोणीतरी जोरात बंद केला.
ती झटकन वळली. समोर कोणीच नाही.
तिच्या वाढत्या धडधडीत तिने जॉकेटमधला छोटा पिस्तूल सुरक्षित जागी पकडला आणि दुसऱ्या हॉलमध्ये पावले टाकली.
मिलमध्ये आत जाताना तिला भिंतीवर मोठ्या अक्षरात कोरलेला एक शब्द दिसला, “Save us”
नेहाच्या मनात विचारांची गर्दी निर्माण झाली.
तिच्यासमोर जिन्याच्या दिशेने एक पांढरी सावली चमकून गायब झाली. एक क्षण थांबायचं का? डरपोक नाही ती.
ती जिन्यावरून खाली उतरली.
बेसमेंटमध्ये अंधार दाटून बसला होता. काही क्षणात टॉर्चचा किरण एका मोठ्या, जुन्या कंट्रोल रूमवर पडला. वायरिंग तुटलेली, स्क्रीन फोडलेली. पण… एक स्क्रीन मात्र नीट होती. नेहाने हळूच त्या स्क्रीनचा पॉवर बटण दाबला.
ती स्क्रीन चालू झाली आणि त्यावर लाईव्ह सीसीटीव्ही फुटेज दिसू लागलं.

पहिल्या स्क्रीनवर, एका खोलीत एक तरुण बसलेला होता. डोळे भीतीने उघडे. नेहाने त्याचा फोटो फाईलमध्ये पाहिला होता, राहुल पाटील.
दुसऱ्या स्क्रीनवर, एक १५ वर्षांची मुलगी, रडत होती.
तिसऱ्या स्क्रीनवर, एक वृद्ध माणूस होता, त्याचे हात थरथरत होते. ते सारे जिवंत होते!
तिसऱ्या स्क्रीनवर, एक वृद्ध माणूस होता, त्याचे हात थरथरत होते. ते सारे जिवंत होते!
मग चौथ्या स्क्रीनवर, नेहा स्वतःच दिसली. मिलच्या मुख्य दरवाज्यातून आत येत. नेहाचे रक्त गोठले.
त्याच क्षणी स्क्रीनवर एक सावली दिसली.
ती तिच्या मागे उभी होती.
क्षणात तिने खांद्यामागे बघितले, कोणीच नाही.
पण स्क्रीनवर ती सावली हळूहळू नेहाच्या दिशेने येत होती, फक्त स्क्रीनवरच, वास्तवात कुणी नव्हतं.
त्याच क्षणी स्क्रीनवर एक सावली दिसली.
ती तिच्या मागे उभी होती.
क्षणात तिने खांद्यामागे बघितले, कोणीच नाही.
पण स्क्रीनवर ती सावली हळूहळू नेहाच्या दिशेने येत होती, फक्त स्क्रीनवरच, वास्तवात कुणी नव्हतं.
हे काय आहे? भ्रम? की कोणीतरी स्क्रीन manipulate करतंय? आवाज आला, “शोध, नेहा… अजून खाली आहे.” अचानक स्क्रीन बंद.
तेवढ्यात नेहाच्या पायाखालचं फ्लोअर हळूहळू सरकायला लागलं. एखाद्या ट्रॅपडोरसारखं.
ती धडधडत खाली कोसळली.
ती धडधडत खाली कोसळली.
नेहा शुद्धीवर आली तेव्हा ती एका जुनाट खुर्चीला बांधलेली होती. समोर टेबल. टेबलवर जळत्या मेणबत्त्या.
आणि भिंतीवर हुक, दोऱ्या, काही रसायनांच्या बाटल्या.
“टॉर्चर रूम…?” खोलीत हलक्या पावलांचा आवाज झाला. समोर पडद्यातून एक माणूस बाहेर आला.
उंच, काळ्या कोटात, चेहऱ्यावर मास्क.
आणि भिंतीवर हुक, दोऱ्या, काही रसायनांच्या बाटल्या.
“टॉर्चर रूम…?” खोलीत हलक्या पावलांचा आवाज झाला. समोर पडद्यातून एक माणूस बाहेर आला.
उंच, काळ्या कोटात, चेहऱ्यावर मास्क.
त्याच्या डोळ्यांची चमक नेहाच्या अंगावर काटा आणणारी होती. तो मंद स्वरात म्हणाला, “नेहा… तुला माहिती आहे का, लोक माझ्याकडे का येतात?”
नेहा दात-ओठ चावून म्हणाली, “तू लोकांना जबरदस्तीने पळवून आणतोस!”
तो हसला. “नाही… मी त्यांना वाचवतो. जग त्यांना समजत नाही. त्यांना इथे शांतता मिळते.”
नेहा दात-ओठ चावून म्हणाली, “तू लोकांना जबरदस्तीने पळवून आणतोस!”
तो हसला. “नाही… मी त्यांना वाचवतो. जग त्यांना समजत नाही. त्यांना इथे शांतता मिळते.”
“तू वेडा आहेस!” तो जवळ येत म्हणाला, “चालेल… पण आता तूही या शांततेचा एक भाग होणार आहेस.”
नेहाने हाताच्या दोऱ्या तोडण्याचा प्रयत्न केलानाही पण तिला ते तोडता आलं नाही. तो माणूस आता तिच्या अगदी समोर होता. त्याने खिशातून एक छोटी इलेक्ट्रिक ब्लेडसारखी वस्तू काढली.
नेहाने हाताच्या दोऱ्या तोडण्याचा प्रयत्न केलानाही पण तिला ते तोडता आलं नाही. तो माणूस आता तिच्या अगदी समोर होता. त्याने खिशातून एक छोटी इलेक्ट्रिक ब्लेडसारखी वस्तू काढली.
“हा तुझा शेवटचा कॉल होता, नेहा.”
तेवढ्यात, धाडकन!
वरच्या बाजूने धावत येणाऱ्या आवाजात खोलीचे दार उघडले.
“नेहा! नेहा!” आत आले होते तिचे दोन सहकारी—इंस्पेक्टर अजय आणि सीमा.
त्या वेड्याने क्षणात पळ काढला.
नेहाने किंचाळत सांगितले, “तो वरच्या बाजूने गेला! पकडा त्याला!” अजय त्याच्या मागे धावला.
सीमाने नेहाला दोऱ्यातून सोडवले.

अजय वर पोहोचला तेव्हा तो मुखवटाधारी माणूस छताच्या कडेला उभा होता. “थांब! पोलिस!” अजय ओरडला. तो हसत चंद्राकडे पाहत म्हणाला,
“तुम्ही उशीर केला… मी इथे कोणालाही मारत नाही. मी फक्त त्यांना… मुक्त करतो.”
अजय जवळ गेला तसे तो माणूस मागे पाय ठेवून,
अंधारात खाली उडी मारली. अजय धावत काठावर पोहोचला. पण खाली कोणीच नव्हते.
“तुम्ही उशीर केला… मी इथे कोणालाही मारत नाही. मी फक्त त्यांना… मुक्त करतो.”
अजय जवळ गेला तसे तो माणूस मागे पाय ठेवून,
अंधारात खाली उडी मारली. अजय धावत काठावर पोहोचला. पण खाली कोणीच नव्हते.
कोणीतरी पळून जाण्याचा आवाजही नाही.
शरीरही नाही. जणू… तो कधी अस्तित्वातच नव्हता.
शरीरही नाही. जणू… तो कधी अस्तित्वातच नव्हता.
नेहा ऑफिसमध्ये केस फाईल बंद करत होती.
मिलमधून सर्व लोकांची सुटका झाली होती.
ते सर्व मानसिक धक्क्यात होते, पण जिवंत होते.
मिलमधून सर्व लोकांची सुटका झाली होती.
ते सर्व मानसिक धक्क्यात होते, पण जिवंत होते.
फक्त एकच गोष्ट अजूनही रहस्य होती, तो मुखवटाधारी माणूस कुठे गायब झाला? फोन टेबलवर व्हायब्रेट झाला.
Unknown number.
नेहाचं हृदय पुन्हा धडधडायला लागलं.
तिने फोन उचलला.
पलीकडून हलक्या स्वरात तोच आवाज,
“नेहा… केस बंद झाली का?”
तिचे हात थरथरले.
“तू… जिवंत आहेस?”
तो म्हणाला, “मी मरत नाही, नेहा. कारण मी खरा नाही…
मी त्या लोकांच्या भीतीतून जन्मतो… आणि परत परत येतो. लवकरच… तुझ्याकडेही येईन…”
कॉल कट.
नेहाने फोन खाली ठेवला. काचेतल्या तिच्या प्रतिबिंबात तिला मागून एक फिकट सावली दिसली.
ती जोरात मागे वळली, कोणीच नव्हतं.
पण हवेत हलका कुजबुजणारा आवाज घुमत होता—
“अजून संपलेलं नाही…”