ध्यास तुझा

This poem is about expectation from Love

                                                                     ध्यास तुझा

जगात अशी अनेक मुलं  असतात

पण नेत्र मात्र तुझ्यासाठी तरसतात

का असे घडते मला नाही  कळत

हृदयाचे ठोके जातात मात्र वाढत

खार तर तुझीच चाहती

हे माझ्याशिवाय कोणाला  नाही माहित

तुझ्याशी ओळख करण्यास शोधत असते संधी

पण माझ्याशी बोलण्यास आहे कुठे तुझ्याकडे अवधी

मला माझ्यावर आहे विश्वास

तुला पण असावा माझाच ध्यास

मैत्री तुझ्याशी करायला

आवडेल खूप मला

पण तुला नाही बोलायचे

मग माझं कसे व्हायचे ?

पण कधी ना कधी तुला यावेच लागेल

"तू  सांगशील तसे वागेन" म्हणावेच लागेल .

© शीतल महामुनी माने