मागच्या भागात आपण पाहिले की, वैभव आणि रजनी एकमेकांचे मित्र शाळेत एकत्र असल्याने दोघांना अभ्यासाची, चिकित्सक गोष्टींची रुची. मोठे झाल्यावर काय होणार अशी चर्चा दोघांत रंगते नंतर हळूहळू रजनीचा भाऊ आणि आई-वडिल सामील होतात.
आता पाहुया पुढे,
" मला इच्छा नसताना काकांकडे राहाव लागणार आहे."
" त्यात एवढे निराश व्हायला काय झाले. काही दिवसात येशीलच ना परत तू."
" वैभव माझ आता शालेय शिक्षणाबरोबर काॅलेज पण तिकडेच होईल वाटत."
" अचानक काय झाले असे."
" मला देखील माहित नाही."
" बोलून बघू का काका-काकूंशी मी."
" खरतर त्यांना पण जड जात आहे. मला तिकडे पाठवणे. त्यांचा नाईलाज आहे. आणि पाठवण्यामागच कारण विचारायच नाही अशी शपथ देखील घातली आहे. तेव्हा तू अजून यावर काही बोलू नकोस. मला दोन दिवसात निघायच आहे."
" माझी आठवण आली तर मला फोन करशील ना."
" हो. का नाही करणार."
" तुला आवडतात म्हणून मी आईकडून नारळाची बर्फी बनवली तुझ्यासाठी."
" अरे वा. मी येईपर्यंत जेवण पण बनवायला शिकशील. छान झाली आहे बर्फी."
रजनी बॅंगलोरला तिच्या काकांकडे निघून जाते. सुरवतीचे काही दिवस तिला करमत नव्हते. नंतर मात्र ती तिथे रुळते. वैभवला, आई-वडिलांना अधून-मधून फोन करत होती. शाळेमधे रजनी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होते. आता ती काॅलेजला गेली होती. हुशार, गुणी आणि सुस्वभावी असल्याने प्रत्येक कौशल्य ती आत्मसात करत होती.
" नमस्कार, मी ज्ञानव. मला थोड तुमच्याशी प्रोजेक्ट विषयी बोलायच आहे."
" हो. बोला ना."
" आपल्या प्रोजेक्ट मधे एकूण पाच जण आहेत. आपण उद्या एक मिटिंग घेवून प्रोजेक्ट बद्दल चर्चा करुयात."
" हो . चालेल ना."
सर्वजण मन लावून प्रोजेक्ट बद्दल चर्चा करुन प्रोजेक्ट पूर्ण केले होते.
" अभिनंदन, तुमच प्रोजेक्ट सर्वांना आवडले. प्रिन्सिपल सरांनी तुम्हा पाच जणांना भेटायला बोलवल आहे."
" तुमच्या इतकी हुशार मुले काॅलेजला लाभणार असतील तर काॅलेजचे भाग्य समजतो आम्ही.असच काॅलेजचे नाव रोशन करा. तुमचे खूप अभिनंदन."
" धन्यवाद सर. "
हळूहळू ज्ञानव आणि रजनीची मैत्री दृढ झाली होती. दोघेही एकत्र अभ्यास करत होते. ज्ञानवचे वडिल मनोविज्ञानक होते. ज्ञानवला देखील यात आवड होती. तो आपल्या वडिलांची निरनिराळी पुस्तके हाताळत होता. त्याला त्याच्या वडिलांसारखे बनायचे होते.
" रजनी मी माझ्या वडिलांसारखे मनोवैज्ञानिक बनणार. लोकांच्या मनाचा ठाव घेत त्यांच्या समस्यांचे मला निराकरण करायचे आहे."
" तू नेहमी मला सांगत असलेला अनुभव आणि मला वाचायला दिलेली पुस्तके यातून मला देखील यात आवड निर्माण होत आहे."
" चांगलेच आहे की मग आपण दोघे या विषयावर एकत्र काम करु."
दोघेजण यात प्राविण्य घेवून उत्तम मनोवैज्ञानिक बनले होते. दोघांकडे निरनिराळ्या केस येत होत्या. दोघेजण आपली केस सोडवण्यात व्यस्त होवून गेले होते. दोघांचा संपर्क आता तुटत चालला होता.
" आई-बाबा तुम्ही. कसे आहात. मला कळवल का नाही तुम्ही येणार आहेत."
" तू तुझ्या कामात व्यस्त असते. आमच्यामुळे तुला त्रास नको व्हायला."
" काय बोलताय बाबा. दादा नाही आला का."
" तुझ्या वहिनीची परीक्षा आहे एक. ती झाली की ते दोघेही येणार आहेत इकडे."
" वैभव कसा आहे ग. काय करतोय तो."
" छान आहे. तुझ्या दादाच्याच कंपनीत लागलाय नोकरीला. तीन वर्ष झाली."
" काय? तो नक्की करतोय काय? "
" तो इंटेरीअर डिझायनर झाला आहे. आपल्या दादाचा ओरडा खायचा पण त्याने ते शिकून घेतले."
" बाबा, त्याला तर मनोवैज्ञानिक व्हायचे होते ना? मग. खरतर काॅलेज नंतर माझ आणि त्याच बोलणच थांबले होते."
" हो. तो यायचा आपल्या घरी. तुझा फोन येतो का? असे वगैरे विचारत होता."
" करेल मी फोन कधीतरी."
" काय ग. मला सांग तू तुझ्या दादा सारख इंटेरीअर डिझायनर होणार होतीस. आता मधेच मनोवैज्ञानिक कशी झालीस."
" बाबा आपल्या दिशा अचूक ठरलेल्या असतात अस वाटते. त्या आपल्याला जो मार्ग दाखवतील त्यानुसार सगळे घडत असेल, हो ना?"
" अगदी बरोबर."
" मला जरा बोलायच तुझ्याशी."
" बोल ना आई. "
" अग तुझा दादा न येण्यामागे.. "
" काय ओ. आलेच."
" आल्या आल्या नको सांगूस तिला काही. जरा थोडे दिवस तर जावून देशील का नाही."
" बर. तुम्ही म्हणताय तसेच करेल."
" आई, बोलता बोलता का थांबलीस. बाबा, काय झालय का. माझ्यापासून काही लपवताय का? "
" नाही ग. "
" तुझी आई म्हणत होती. तुझ्या दादाच लग्न झाल आता तुझ्यासाठी पण एक छानसा मुलगा शोधायला हवा."
" बाबा, इतक्यात मला लग्न नाही करायच. काही लोक इथे येतात तर, कधी कधी मला मुळापर्यंत शोधण्यासाठी अनेकांबरोबर दूर ठिकाणी जावे लागते. माझ्याशी लग्न करणा-या मुलाला या गोष्टी समजायला हव्या."
रजनीच्या आईला काय सांगायच असेल? सांगू शकेल का ती रजनीला. कोण असेल रजनीचा जोडीदार? वैभव की ज्ञानव? की आणखीन कोण? पाहुया पुढच्या भागात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा