मागच्या भागात आपण पाहिले की, रजनीला तिच्या काकांकडे राहायला जावे लागले होते. दोघेजण उत्तम करीअर करतात. पण त्यांनी एकमेकांचे करीअर जणू आत्मसात केले होते. रजनीची ओळख ज्ञानव बरोबर होते तिला यातून मनोवैज्ञानिक होण्याची प्रेरणा मिळते. आई-बाबा रजनीला भेटायला येतात. आता पाहुया पुढे,
" बाबा अजून थोडे दिवस रहा ना. माझ अजून मन भरत नाही."
" बोल बोल करता महिना झाला तरीपण तुझ मन भरत नाही का?"
" बर जावू दे. परत या लवकर. "
" आता तूच ये. तुझ्या वहिनीला तरी बघायला येशील का नाही."
" हो. येणार ना. नक्की येईल."
इकडे ज्ञानवला त्याच्या बाबांच्या पुस्तकात एका गडबडलेल्या रेखाचित्रांचा आणि गूढ शंका असलेली वाक्य दिसली होती. " तुला सुटणार कोड हे अवघड जरी असले, तरी या प्रश्नातच त्या उत्तराचे सार सामवले गेले आहे."यावर ज्ञानव बुचकळ्यात पडतो. याचा अर्थ सांगण्यासाठी त्याचे वडिल देखील या जगात आता राहिले नव्हते. वर्षभरापूर्वीच त्यांचे कॅन्सरमुळे निधन झाले होते. वडिलांच्या आठवणीत तो त्यांची पुस्तके वाचत होता.
" कसा आहेस ज्ञानव तू."
" बरा आहे मी."
" तू एवढा चिंतेत का दिसत आहे."
" काही नाही ग. बाबांशिवाय आता कोणतेही केस सोडवण अवघड वाटत आहे."
" तू एवढा हुशार आहेस. नक्की तू केस एकटा सोडवू शकतो. यात बाबांचा आशिर्वाद आहेच तुझ्या जवळ."
" बरोबर बोलते तू."
" काळजी घे तू. मी येत जाईल तुला भेटायला."
आई - बाबा घरी गेल्यानंतर रजनी थोडी अस्वस्थ झाली होती. कपाटात कपडे लावत असताना एक चिठ्ठी रजनीला सापडते. त्यात असे लिहले होते की, "वैभवला आता बरे वाटत नाही. तो कोणाशीच आता पहिल्यासारखे बोलत नाही. त्याच मन गुंतावे म्हणून तुझा दादा त्याला सतत कोणत्या ना कोणत्या कामात गुंतवण्याचा प्रयत्न करत असतो. कामात असेल तरच तो व्यवस्थित असतो. नाहीतर शून्यात नजर लावून बसलेला असतो. कितीतरी डाॅक्टर आणि दवाखाने केले पण काहीच उपयोग झाला नाही. घरातल्यांनी तर, देवाला नवस पण केलाय. पण त्याची तब्येत आता बिघडत चालली आहे. तू एकदा येवून त्याला भेटलीस तर त्याला बर वाटेल."
' आई हे ती असताना बोलली असती तर, कदाचित आज मी त्यांच्या बरोबर वैभवला भेटायला गेले असते.अजूनही वेळ गेली नाही महिन्याभरातले हे पेशंट झाले की उरलेल्यांना ज्ञानवकडे जायला सांगेल.'
" ज्ञानव काही दिवसांकरता मी जरा आई-बाबांकडे जावून येते."
" बरे आहेत ना ते. आताच इकडे येवून गेले होते ना?"
" अरे थोड काम आहे. ते झाले की येईल मी इकडे. तोपर्यंत माझ्या पेशंटला मी तुझ्याकडे पाठवेल."
" हो. चालेल ना."
" रजनी कधी आलीस तू."
" बाबा सांगते सगळे. आधी मला वैभवला भेटायला हव. "
" तू सांगितल का तिला वैभव बद्दल. माझ्या समोर तर काही बोलताना दिसली नाही तू."
" मी एका चिठ्ठितून तिला सांगितले होते. ती इतक्या लवकर येईल असे वाटत नव्हते."
" वैभव, कसा आहेस तू."
" मी बरा आहे. तू कशी आहेस."
" मी ठिक आहे."
फोनवर न थांबता बोलणारा वैभव आज मात्र शांत आणि निस्तेज दिसत होता. वैभवला बोलत करण्याचा रजनी पूर्णपणे प्रयत्न करत होती. त्याच्या मनावर कुठेतरी खोलवर आघात झालेला आहे हि एकच गोष्ट तिला सापडते. पण या गोष्टीचा तळ गाठण्याकरता तिला ज्ञानवची मदत लागणार होती. कारण ज्ञानवचे बाबांनी मानवी मनाच्या गूढतेचा आणि भावनांच्या वावरण्याचा शोध घेणे आवडत होते. " मानवाच्या मनाचे रहस्य मनाच्या खोल गाभ्यात लपलेल असते." या गूढतेवर ते विजय जरी मिळवू शकले नसले तरी, त्यांना मानवी मनाची दु:खाची,मनाची गडबड, प्रेमाच्या पातळीवर सत्यापर्यंत नक्की घेवून जाईल असा रजनीचा विश्वास होता. आपल्या वडिलांच्या शिकवणीवर पावले टाकत वैभवला फक्त ज्ञानवच बाहेर काढू शकेल. या विचाराने रजनीने ज्ञानवशी बोलयचे ठरवले होते.
" रजनी इकडे यायचे विसरलीस का?"
" तुलाच फोन करायला घेत होते आता मी."
" कशी काय या गरीबाची आठवण आली तुला."
"मस्करी नको करुस. कारण जरा गंभीर आहे."
" बोल ना. माझी काही मदत लागेल का तुला."
" हो. तुला इकडे यायला जमेल का?"
" जमेल ना. झालय काय पण. "
" तू इकडे ये मग सांगते."
" पुढच्या आठवड्यात मी इकडेच काम संपवून येतो."
" हो."
" हा माझा मित्र वैभव."
" वैभव हा माझा तिकडचा मित्र ज्ञानव. तुम्ही दोघ बोला आलेच मी तोपर्यंत."
" रजनी तुझा मित्र असा काय ग? शून्यात नजर लावलेला. मला वाटल पहिली भेट असेल म्हणून कदाचित वागत असेल असा. तो नेहमीच असा असतो का."
" यासाठीच मी तुला इथे बोलवल आहे. त्याच्या मनात काहीतरी दडले आहे. पण त्या गोष्टीचा शोध घेण्याकरता मला तुझी मदत लागणार आहे."
" मी कधीही तयार आहे. ठरल तर मग. कधी करायच आपण हे मिशन सुरु."
वैभवच्या मनाचा ठाव घेवू शकतील का ज्ञानव आणि रजनी? यात ते स्वत: जावून तर अडकणार नाही ना? पाहुया पुढच्या भागात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा