वैभव आणि रजनी दोघेही लहानपणापासून एकत्र वाढले होते. दोघांची आवडी-निवडी एकमेकांना अगदी साजेश्या होत्या. दोघांना अभ्यासात रुची होती. ऐतिहासिक, कुतूहल करणा-या गोष्टींमधे त्यांना अधिक रुची होती.
" तू मोठ झाल्यावर काय होणार आहे."
" मी एक मनोवैज्ञानिक होणार आहे. लोकांच्या मनाचा ठाव घेत त्यांना होणा-या त्रासातून मुक्तता करणे हेच माझे उदिष्ट आहे."
" खूप छान आहे."
" तू काय होणार मोठ्यापणी सांग की, का फक्त माझ्याकडूनच काढून घेणार काय होणार ते."
" मी दादा सारख इंटेरीअर डिझायनर होणार. प्राचीन कालीन लेण्यांमधील कलात्मक लेण्यांवरील मूर्तीची छायाचित्रे आजकाल कुठे पाहायला मिळत नाही. तसेच प्राचीन काळच्या मंदिरावर असलेले सुबक चित्र आजच्या काळात मी लोकांच्या नजरेत आणू इच्छिते."
" अग हो, पण ज्यांना आपल्यासारखी ऐतिहासिक गोष्टी मनापासून आवडतात. चिकित्सक पणे त्यातील गूढ जाणून घेण्याची ओढ वाटते. तसे आताच्या युगात कोणाला राहिली असेल का? "
" कोणत्या एवढ्या गहन विषयावर आज तुमची चर्चा चालली आहे. आज कोणत्या ऐतिहासिक गोष्टी विषयी माहिती मिळवलीत का? "
" नाही, बाबा आज आमच्या शाळेत एक प्रश्न सर्वांना विचारण्यात आला होता."
" काय उत्तरे दिली मग. "
" काका, मी मनोवैज्ञानिक होणार आणि रजनी इंटेरीअर डिझायनर होणार."
" मला वाटल तुम्ही दोघे तर खूप मोठे शास्त्रज्ञ होवू असे उत्तर अपेक्षित होते. दोघांना पण प्रत्येक गोष्टीत सारखेच प्रश्न पडत असतात. आणि त्याची उत्तरे शोधण्यासाठी पुस्तकांची आवड देखील आहे."
" त्यातल काही कळल नाहीतर, येतात माझ डोक खायला."
" काय रे दादा, अस बोलतो तू. तुला तरी आमच्या प्रश्नाच उत्तर द्यायला कुठे जमते. मेघना ताई आम्हांला सर्व प्रश्नांची अचूक आणि आम्हांला पटतील अशीच उत्तरे देत असते."
" हो का, मग आता परत याच मला काही विचारायला. बरोबर सांगतो मी."
" आरव, एवढे चिडायला काय झाले. लहान मुले आहेत ती. बोलत असतील वेडवाकडे एवढे काय मनाला लावून घेतोस."
" शेवटी बहिण कोणाची आहे."
" राहू दे, माझा दादा पण काही कमी नाही वैभव."
" अंगणातल्या गप्पा संपल्या असतील तर मोतीचूर लाडू आणि चिवडा कोणाला हवाय का? "
" काकू, मला."
" ये हवरट, तुझ्या घरातल काही देतोस का खायला. आला मोठा मला द्या."
" गप रे, उठ-सूठ काय तुझा त्या लहानपोरावर डोळा आहे."
" मग तो पण त्याच्या बहिणीच कौतुक माझ्यासमोर का करत असतो. त्याला तोंड गप्प नाही ठेवता येत का."
" अच्छा, म्हणजे खर कारण हे आहे का? "
" मुळात प्रत्येकाच कामाच स्वरुप, अभ्यास करण्याची पद्धत वेगळी असते. ज्ञानाचा साठा देखील प्रत्येकजण आपल्या पद्धतीने करत असतो. एखाद्या प्रश्नाच उत्तर एकच असू शकते पण ते मांडण्याच्या पद्धती विभीन्न असू शकतात. कोणत्या पद्धतीचा अवलंब केल्यास आता ते उत्तर बरोबर वाटेल हे समोरच्यावर अवलंबून आहे."
" येताय का कोणी आत की डब्यात भरुन ठेवू मी सर्व."
" आई आले मी थांब."
" काकू मी जातो."
" वैभव ये. कोणी काही बोलणार नाही तुला. मी इथेच उभा आहे. जा तू आत. "
" काका, पण ते दादा माझ्याकडे डोळे मोठे करुन बघत आहे."
" हर्ष बास झाले आता तुझे. तुझ्या कामाला गेलास तरी चालेल."
" तसही कोणाला थांबायच आहे इथे. माझी भरपूर काम करायची राहिली आहेत."
" काकू काय मस्त झालय चिवडा. बघा कसा आवाज येतोय. कडाम-कुडूम. मोतीचूर लाडूतला बेदाणा तर मला खूप आवडतो."
" मला चिवड्यातला मणूका आणि काजू आवडतात. लाडू उद्या मला डब्यात पण दे. माझ्या आणखी मैत्रिणींनी मी तू बनवलेला लाडू खायला देईल."
" काकू अजून एक गोष्ट माहिती का तुम्हांला. रजनी तिला न आवडणारी भाजी तिची मैत्रिणी ओजस्विताला देते आणि तिचा डबा हि खाते."
" तुला आताच बोलायच होत का, आता गोड लाडू बरोबर धपाटा पण बसणार मला तुझ्यामुळे."
" नाही ओरडणार, त्या निमित्ताने तुम्ही एकमेकींच्या खाद्यपदार्थाची चव घेता. त्या दिवसापुरत का होईना तुमच्या पोटात अन्न जाते. काही न खाण्यापेक्षा काहितरी खाता हे महत्वाचे."
" काकू, येतो मी आता. आई घरी वाट पाहत असेल माझी."
" रजनी तू पण आता अभ्यासाला बस. "
" सीमा आपली रजनी तिचा डबा आवडीचा नसला की, दुस-या मुलीला देते. अश्याने तिला न आवडणा-या भाजी मधून मिळणारे पोषकतत्वे कशी मिळणार? "
" काळजी करु नका, मला माहित आहे. तिला कोणती भाजी आवडत नाही ते. मी ती शाळेतून घरी आली की तीच भाजी एकत्र करुन पराठे तर कधी चिवडा करुन त्यात मिसळून देत असते. तिला वाटत काहीतरी नविन आई रोज खायला बनवते. ती आवडीने खाते. मग तिच्यावर ओरडून काय फायदा. आपल्याला जे हवय ते तर घडते मग झाल तर. "
" तू म्हणजे सर्वगुणसम्पन्न अशी गृहिणी आहेस. तू जग पालटू शकते."
" जगाच नाही माहित. पण आपल कुटूंबात चांगला बदल नक्कीच घडवू शकते."
या कुटूंबाच्या आयुष्यात अजून कोणत्या गोष्टी घडून येतील पाहूया पुढच्या भागात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा