Login

डिजिटल बालपण आणि कोडींगची सुरवात

डिजिटल बालपण आणि कोडींगची सुरवात
" आज संध्याकाळी बागीच्या मधे भेटू "

असा मेसेज राधिकाने आपल्या फ्रेंड्सच्या व्हॉट्स ॲप ग्रुप वर पाठवला. तिने मोबाइल फोन बाजुला ठेवला. मग समोर पसरलेल्या कडे बघून वैतागली.
मुलांच्या परीक्षा संपल्या होत्या. तिला ऑफिसच खूप काम होत. सध्या तिने वर्क फ्रॉम होम केलं होतं.

तिला दोन मुलं होती. मोठी मुलगी दहा वर्षांची. तर धाकटा मुलगा सात वर्षाचा होता. दोघे ही डे केअर सेंटर मधे राहायला तयार नव्हते. शाळेला सुट्टी लागली होती. त्यामुळें घरातच खेळत होते. त्यांनीच हा पसारा घालून ठेवला होता. मगाशी त्यांची भांडणं झाली तेव्हा तर त्यांची भांडणं सोडवे पर्यन्त तिच डोकं दुखायला लागलं होतं.

आता थोडा वेळ मुलांना खाली ग्राउंड वर खेळायला घेउन जाऊ. अस म्हणत तिने त्यांना त्याचं आवरायला सांगितलं. तिने स्वतः पसारा आवरायला घेतला. मनात विचार चालले होते,

' या मुलांना आता आठ दहा दिवस सुट्टी आहे. खेळणी खेळून कंटाळली आहेत. या सुट्टीचा काही तरी उपयोग करून घेतला पाहिजे. ज्यामुळे या मुलांना नविन काहितरी शिकता येईल. दिवसाचे दोन अडीच तास मूल बिझी राहतील. नी आम्हा मॉमस् ना स्वतःचा ' मी टाइम ' मिळेल.

जसा हा प्रश्न मला पडला आहे तसाच माझ्या सोबतच्या फ्रेंड्स ना पडला असेल.संध्याकाळी गार्डन मध्ये भेटल्यावर या प्रश्नांवर काही तोडगा मिळतो का ते बघू.

पुढच्या अर्धा तासात ते तिघ गार्डन मध्ये आले. मुलांना त्यांच्या वयाचे मित्र मैत्रिणी दिसले तर मुलं गेली खेळायला. नी राधिका तिच्या मैत्रिणी सोबत गप्पा मारायला बसली. तेव्हा हा प्रश्न चर्चेत आलाच.

' मुलांना बिझी कस ठेवायचं.? '

क्राफ्ट पासुन सुरवात झालेली चर्चा कॉम्प्युटर आणि स्क्रीन टाईम या विषयावर आली.

" मुलं खुप वेळ स्क्रीन समोर असतात. त्याला काहितरी उपाय हवा."

" उपाय तर हवाच पण स्क्रीन टाईम हा चांगल्या कारणासाठी उपयोगी पडेल अस काहितरी सोल्यूशन हवं."

"  अग खरं यावेळेत ए आय सारखं काहीतरी शिकायला हवं. मुलांनी ए आय शिकणं  हि काळाची गरज आहे.आजकाल त्याचे ऑनलाईन वर्कशॉप असतात. ते अटेंड केले पाहिजे." मिनाक्षी म्हणाली. ती एका आय टी कंपनी मधे नोकरीला होती.

" मिनाक्षी ए आय म्हणजे काय ग ? "

" लहान मुलांना कस शिकवायच ? "

" म्हणजे आणखी स्क्रीन टाईम वाढला ! "

प्रत्येकीचे नविन प्रश्र्न. मत.विचार. मिनाक्षी सांगू लागली.

" ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजनस भविष्यात ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता खूप महत्वाची असणार आहे. "

त्या सगळ्या जणी बोलतच होत्या. इतक्यात मुलांची भांडणं झाली. काव्या आणि अर्णव दोघ तक्रार घेउन त्यांच्या कडे आले.त्यांच्या बोलण्यातील ए आय शब्द ऐकून अर्णव ने विचारलं,

" मिनाक्षी मावशी, ए आय म्हणजे काय ? "

" मावशी आम्हाला शाळेत या विषयावर एक लेसन आहे. पण नेमकं काय ते नाही समजलं."

" ए आय म्हणजे आपल्याला मदत करणारा कृत्रिम रोबोट. जो आपल्या प्रश्नांची उत्तर देतो. ते एक टूल असतं.कॉम्प्युटर सारखं स्मार्ट टूल " मिनाक्षी म्हणाली. ती बोलतं होती तो पर्यंत बाकीची बच्चे कंपनी पण आली होती.

" टूल्स आपल्याला अनेक कामे सोप्या पद्धतीने करायला मदत करतील. जसे की, चित्र काढणे. संगीत बनवणे. प्रॉजेक्ट बनवणे."

तिने अधिक सोप करुन सांगितल. तसं मुलांनी त्यांची प्रश्नांची बँकच तिच्या समोर उघडली.

" ए आय टूल म्हणजे काय ? "

"  ए आय टूल हे एक मॅजिक बॉक्स आहे का ? "

" ए आय टूल आपल्याला खेळण्यांसाठी मदत करू शकतो का ? "

" त्या टूलला आपण प्रश्न विचारू शकतो का ? "

" हे टूल कसे काम करते "

" हे टूल इतके स्मार्ट कसे असते ? "

" हे टूल आपल्यासारखे विचार करू शकते का ? "

" या टूलचा वापर का केला जातो ? "

" हे टूल आपल्याला आपण विचारु ते शिकवू शकते ? "

" हे टूल शिकण्याचे टूलचे फायदे आणि तोटे काय आहेत ? "

" हे टूल शिकण्यासाठी काय करायचं ? कसं शिकायचं ? "

" हे टूल शिकलं तर भविष्यात या विषया मधे करिअर करता येईल का ?"

" या टूलमुळे आपले काम सोपे होते का ? "

" अरे हो हो हो. किती ते प्रश्र्न."

" माझ्यापेक्षा या विषयावर अधिक माहिती हर्षदा मावशीच तुम्हाला सांगेल." मिनाक्षी म्हणाली. हर्षदा एक कोडींग एक्स्पर्ट इंजिनियर आहे.

" "काव्या, AI म्हणजे एक असा जादुई बॉक्स ज्याला आपण काहीही विचारू शकतो आणि तो आपल्याला त्याचे उत्तर देईल.

" जसे की, तू जर ए आय ला विचारला की,

" पानांचा रंग का बदलतो ? "

तर ए आय टूल त्याचं उत्तर देईल.

पानांचा रंग बदलण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यात असलेल्या क्लोरोफिल नावाच्या रंगद्रव्याचे प्रमाण बदलणे.

शरद ऋतूमध्ये दिवस कमी होऊ लागल्याने झाडे कमी प्रकाशसंश्लेषण करतात आणि त्यामुळे क्लोरोफिलचे उत्पादन कमी होते. यामुळे इतर रंगद्रव्ये दिसू लागतात आणि पाने पिवळी, नारंगी किंवा लाल होतात.पाण्याची कमतरता, रोग किंवा कीटक यांच्यामुळेही पानांचा रंग बदलू शकतो.
थोडक्यात: पानांचा रंग त्यात असलेल्या रंगद्रव्यांच्या प्रमाणावर अवलंबून असतो."
हर्षदा ने सांगितल. तिने तिच्या हातातल्या टॅब लेट वर त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवल. त्यामुळे मुलाचं कुतुहल अधिकच वाढलं होतं.

" मावशी आम्हाला हे टूल कस वापरायचं ते कस शिकता येईल ? "

" हो तुम्हाला हे नक्कीच शिकता येईल.यासाठी ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध आहेत. किंवा ऑनलाईन शॉर्ट टर्म कोर्सचे वर्क शॉप असतात . तुम्ही ते पण तुम्ही अटेंड करू शकता.

"  ऑनलाइन कोर्स साठी Coursera, edX, Udemy सारख्या प्लॅटफॉर्मवर अनेक ऑनलाइन कोर्स उपलब्ध आहेत."

" बूटकॅम्प सारखं टूल तुम्हाला AI बूटकॅम्प्स जे तुम्हाला व्यावहारिक अनुभव देऊ शकतात."

" तुम्हाला आणखीन गोष्ट सांगू , तुमचे स्कूल प्रॉजेक्ट पण तुम्ही ए आय च्या मदतीने पुर्ण करू शकता. अधिक स्मार्ट बनू शकता."

" ओपन सोर्स सारखं ग्रुप असतात.GitHub सारख्या प्लॅटफॉर्मवर AI समुदायातील लोकांसोबत संवाद साधू शकता."

" काव्या ए आय टूल्स शिकणे म्हणजे भविष्यातील अनेक करिअरच्या अनेक दारांना उघडणे. ए आय हे आजच्या युगात सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे आणि येत्या काळात या क्षेत्रात अनेक नवीन संधी निर्माण होणार आहेत."

" ए आय शिकल्यावर आम्ही कोणत्या क्षेत्रात करिअर करू शकतो ? "

" ए आय शिकल्यावर तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करू शकता "

" जसं की, डेटा सायंटिस्ट म्हणजे तुम्ही मोठ्या प्रमाणावर डेटाचा अभ्यास करून त्यातून माहिती काढण्यासाठी ए आय अल्गोरिदम वापरू शकता."

"मशीन लर्निंग इंजिनियर म्हणजे तुम्ही मशीनला स्वतः शिकायला लावण्यासाठी मॉडेल तयार करू शकता. "

" ए आय  रिसर्चर तुम्ही  ए आयच्या नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावू शकता आणि त्याचा वापर विविध क्षेत्रात करू शकता. "

" रोबोटिक्स इंजिनियर म्हणजे तुम्ही ए आय चा वापर करून रोबोट्सला अधिक बुद्धिमान बनवू शकता. "

" नॅचुरल लँग्वेज प्रोसेसिंग इंजिनियर म्हणजे तुम्ही कंप्यूटरला मानवी भाषेचे समजावून घेण्यास आणि ती तयार करण्यास शिकवू शकता."

" कंप्यूटर विजन इंजिनियर म्हणजे तुम्ही कंप्यूटरला दृश्य माहिती समजून घेण्यास शिकवू शकता. "

" प्रोडक्ट मॅनेजर: तुम्ही ए आय आधारित उत्पादने विकसित करण्यासाठी टीमचे नेतृत्व करू शकता.
याशिवाय, ए आय ची मागणी इतर अनेक क्षेत्रातही वाढत आहे."

" कोणत्या क्षेत्रात ? "

" हेल्थकेअर म्हणजे रोगांचे निदान करणे, औषधे शोधणे "

" वित्त म्हणजे फायनान्स मधील धोका शोधणे, ग्राहक सेवा म्हणजे कन्झुमर सर्व्हिस "

" ऑटोमोबाईल म्हणजे स्वायत्त वाहने म्हणजे ड्राइव्हवर लेस कार "

" म्हणजे टेस्ला सारखी कार ? "

" हो टेस्ला सारखी कार. जिथं ए आय चा वापर केला आहे."

" शिक्षण अर्थात वैयक्तिकीकृत शिकवण पर्सनल टीचर म्हणून पण वापर करू शकता."

" तुम्ही मोबाईल वर कॉम्प्युटर वर गेम्स खेळता. तुम्हाला स्वतःला गेम खेळायला आवडतात. तसचं ए आय च्या मदतीने तुम्ही स्वतः चे गेम डिझाईन करू शकता."

" अरे बापरे ! ए आय म्हणजे एखादा जादूचा दिवाच आहे."

" जादूचा दिवा आहे का नाही माहीत नाही पण तुमचा अभ्यास करतानाचा बेस्ट फ्रेंड नक्कीच आहे."

" मावशी मला हे शिकायचं आहे. मला स्कूल मध्ये स्क्रॅच वापरून गेम डिझाईन करायला सांगितला होता. त्यात त्या कार्टून कॅरॅक्टरला डान्स करायला इंनस्ट्रक्शन दयायच्या होत्या. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता पार करण्यासाठी प्रोग्रामिंग करायचं होत. ग्रुप बनवून लूप तयार करायचं होत. पण ते सगळं खुप एक्सायटिंग होत." श्राव्य म्हणाली. ती सातवी मधे शिकत होती.

" मावशी म्हणजे मला पण दिदू सारखं गेम बनवता येईल ? " छोटया रीचा ने विचारलं.

" हो. नक्कीच तू पण हे करू शकते. या आठ दिवसांच्या सुट्टी मधे तुम्ही तुमचा फन झोन तयार करू शकता."

" हर्षदा मावशी, मी नक्की माझा फन झोन तयार करणार."

" मिनाक्षी मावाशी आम्ही टीव्ही वर कार्टून बघतो. तसे कार्टून चे ऍनिमेशन पण बनवू शकतो का ?" छोटया काव्याने विचारलं.

" ते मी कसं सांगणार, त्यासाठी तुम्ही आधी ए आय ची ओळख करून घ्यायला हवी." मिनाक्षी मावशी तिचा गाल लाडाने ओढून म्हणली.

" काव्या बच्चा तु पण तुझा पर्सनल गेम बनवून फन झोन तयार करू शकते. आधी श्री गणेशा करु या लर्निग फन झोन चा.मग शिकणार ना ए आय ? " हर्षदा मावशी ने विचारले.

उत्तरा दाखल काव्या ने होकार देत जोर जोरात मान हलवली. मग सगळी बच्चे कंपनी ए आय शिकण्यासाठी ऑनलाइन कोणते शॉर्ट टर्म वर्क शॉप आहेत ते बघु लागले. त्यांचा स्वतः चा फन झोन तयार करण्यासाठी.

" हर्षदा, ए आय शिकणं खुप अवघड आहे का ?"

" फीस किती असतील ? "

" राधिका ए आय शिकणं खुप गरजेचं आहे. सोपं आहे. ए आय म्हणजे आपल्याला आपण विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणारा पर्सनल गाईड टिचर आहे."

" आपण आजच्या मॉमस् ना स्मार्ट होणं गरजेचं आहे. काळा नुसार बदलण आवश्यक आहे. अभ्यास करताना आपल्याला बऱ्याच अडचणी येतात. आपण त्या प्रॉब्लेमस् चे सोल्यूशन देखील त्यांना विचारु शकतो."

" हे सगळं शिकणं म्हणजे स्क्रीन टाईम पण वाढला."

" मुलं दिवसातून किमान एक ते दीड तास मोबाईल किंवा टीव्ही बघतात. ए आय शिकायचं ठरवल तर तो एक ते दीड तासाचा स्क्रीन टाईम अभ्यास करण्यासाठी आणि त्यांच्या मजबूत भविष्या साठी वापरला जाईल." हर्षदा त्यांना समजावत म्हणाली.

" थँक्यू हर्षदा तू खूप छान पर्याय सुचवला. मूल एका जागी बसून ए आय शिकतील. त्यांना त्यांचा गेम बनवायचा असेल तर त्यांना त्यांच्या विचारांना चालना द्यावी लागेल."

" मुलं दिड ते दोन तास ए आय लर्निग मधे बिझी होतील आणि मॉमस् ना त्यांचा मी टाइम पण मिळेल." राधिका हसत म्हणली.

" आता हि मूल रमली मिशन लर्निग फन झोन तयार करण्यासाठी काय करावं लागेल ते समजुन घेण्यात." राधिका कौतुकाने त्या मुलांच्या डिस्कशन कडे बघत म्हणाली.

" नक्कीच, आता तु म्हणालीस तसं आता या सुट्टी मधे मिशन लर्निग फन झोन चा श्री गणेशा करू." हर्षदा हसत म्हणाली.

" लर्निग फन झोन आणि क्रिटिंग ओन फन झोन "

हर्षदा विचार करत होती. काय काय भन्नाट कल्पना अस्तित्वात येतील या लर्निग फन झोन मिशन मधून. ती प्रसन्न हसत होती. आज तिने मॉमस् ना त्यांचा फ्री टाईम मिळवून दिला होता. मुलांच्या डोक्यातील अफलातून कल्पना अस्तिवात आणण्यासाठी त्यांच्या विचारांना योग्य तो मार्ग दाखवला.

घरी जायची वेळ झाली तसे सगळे घरी जायला निघाले. पण सगळ्या जणी त्यांच्या मोबाइल वर मुलांना ए आय कस शिकवता येईल त्यासाठी ऑनलाईन कोर्सेस बघत होत्या.

तर मुलं त्यांना ए आयचा वापर करून त्यांचा स्वतः चा फन झोन कसा तयार करता येईल याचा विचार करत होती.

आता फन झोन मधे लवकरच या मुलांच्या डोक्यातील अफलातून गेम साकारले जातील.
तुम्ही कधी बनवणार तुमचा फन झोन ?

ए आय भविष्याची गरज, आजच्या डिजिटल युगात मुलांच्या करियरची पहिली आणि मजबूत पायरी.


©® वेदा

आवडल्यास नक्की लाईक करा.

नावासकट शेअर करा.