#जलद लेखन स्पर्धा- नोव्हेंबर:-२०२५
विषय:- दुरून डोंगर साजरे
शीर्षक:- दिखावा
भाग:-२
मागील भागात - रसिकाने तिच्या घरापासून दूर असलेल्या टुमदार बंगला आणि त्यातील श्रीमंत माणसांचे आकर्षणाने कौतुक केलेले शुभमला आवडत नाही. तरी ती त्याला त्या विषयी सांगते.
आता पुढे:-
"हा हा.. नाही साधी गोष्ट, कळलं. जा आता काम कर तुझं." तो हसत तिला म्हणाला.
तसा तिला राग आला पण त्याला थोडं रोखून बघत मनात म्हणाली,"काय माणूस आहे, जराही ऐकून घेत. जा म्हणे काम करं."
त्याने ही रोखून पाहत डोळे मोठे करून तिला आत जाण्याचा इशारा केला तशी ती नाक मुरडत पाय आपटत आत निघून गेली.
"वेडी कुठली? काहीही सांगत असते." ती जाताच तो हसत ती गेल्याच्या दिशेने पाहत म्हणाला.
पण तो मात्र आता त्या बंगल्याकडे पाहू लागला.
"मायला, खरेच भारी आहे बंगला. रसिका बरोबर बोलते. पण बंगल्यातील माणसं खरंच सुखी असतील का? " त्याने मनात स्वतःलाच प्रश्न विचारला.
थोडा वेळ तो विचारात गुरफटला.
"जाऊ दे, मला काय करायचे? मी ना भलतेच काहीतरी विचार करतो. ही रसिका स्वतः तर वेडी आहेच, मलाही वेड करतेय." नंतर तो स्वतःच स्वतःची समजूत काढत मनातील विचार झटकून देत आत निघून गेला.
काही दिवसांनी..
एकदा सकाळी रसिका धुतलेले कपडे बाहेर अंगणात दोरीवर वाळू घालत होती. तर त्या घरातील एक तिच्याच वयाची स्त्री त्या बंगल्याच्या गॅलरीत फिरत होती.
एकदा सकाळी रसिका धुतलेले कपडे बाहेर अंगणात दोरीवर वाळू घालत होती. तर त्या घरातील एक तिच्याच वयाची स्त्री त्या बंगल्याच्या गॅलरीत फिरत होती.
तिची नजर कपडे वाळत घालणाऱ्या रसिकाकडे गेले. ती रोज तिला आणि शुभमला पाहत होती. त्यांना हसताना बोलताना पाहून तिच्या ओठांवर हसू यायचं.
आज तिला आपण भेटून बोलू असा विचार करत ती तिला भेटायला आली.
रसिका तिच्या नादात गाणे गुणगुणत काम करत होती.
त्या स्त्रीने तिच्या घरात डोकावून विचारले,"कोणी आहे का घरात? "
"कोण आला आता सकाळी सकाळी?" असे म्हणत तिने मागे वळून पाहिले तर पाहतच राहिली.
भरजरी पैठणी, भरगच्च दागिन्यानी, साजशृंगाराने नटलेली त्या बंगल्याती सुंदर अशी स्त्रीला पाहून ती थक्कच झाली.
त्या स्त्रीने खसा खाकरला तेव्हा ती भानावर आली व तिला आत यायला सांगितले.
ती आत आली तर तिने तिला खुर्चीवर बसण्याचा इशारा केला. ती स्त्री त्यावर बसली.
रसिकाने तिला पाणी आणून देत अप्रूप वाटत म्हणाली,"तुम्ही त्या बंगल्यातल्या ना, मी एक दोनदा गाडीतून जाताना तुम्हाला पाहिले होते."
"हो, मी शालिनी. घर छान आहे तुमचं. तुम्ही इथे नवीन वाटता. तुमचं नाव काय?" ती स्त्री म्हणजे शालिनी तिला म्हणाली.
"हो, आम्ही नवीनच राहायला आलो इथे. माझे नाव रसिका." रसिकाने उत्तर दिले.
"छान नाव आहे." शालिनी हसत म्हणाली आणि तिने दिलेले पाणी पिले.
"थॅंक्यू. तुमचेपण नाव छान आहे आणि तुम्ही खूप सुंदर आहात, आणि तुमचा बंगला पण भारी आहे." रसिका हर्षोल्लासाने म्हणाली.
"हम्म, थॅंक्यू." शालिनी उदास हसत म्हणाली.
तिच्या चेहऱ्यावरील वेदना रसिकाच्या नजरेतून सुटले नाही.
.
क्रमशः
.
क्रमशः
काही दु:ख असेल का शालिनीला?
जयश्री शिंदे
प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा