' निघालात का मावशी ? थांबा ना आजची रात्र. संध्याकाळी महेश आला की आपण सगळे बाहेर जाऊया जेवायला ......
कविता मला पण राहायला आवडलं असतं पण मी फक्त ताईला ह्या वस्तू द्यायला आले होते. त्यामुळे घरातली कामे तशीच पडून आहेत.
सुनीताबाई आपल्या भाचेसून म्हणजेच बहिणीच्या सुनेला प्रेमाने म्हणाल्या, तशी त्यांची बहीण पण सुनीताबाईंना आग्रह करू लागली..
सुनीता अगं कामं काय होतं राहतील ..पण कविता एवढ सांगतेय तर थांब ना . बरेच दिवस मी पण कुठे बाहेर पडले नाही आज जाऊयात.

नाही नाही म्हणता म्हणता सुनीताबाई आपल्या बहिणीच्या घरी थांबायला तयार झाल्या.
संध्याकाळी भाचा आला तेव्हा सर्वजण जवळच्या मॉल मधे फिरायला गेले .
कविताने सुनीता मावशीसाठी भरपूर शॉपिंग केली आणि तिथूनच ते सगळे जेवायला गेले.

दुसऱ्या दिवशी सुनीताबाईंनी कविताची भरपूर तारिफ करत सर्वांचा प्रेमाने निरोप घेतला.
कविताच प्रेमळ वागणं ,बोलणं, पाहुणचार करणं , आग्रह करण हे सर्व सुनीताबाईंच्या मनात भरलं होत त्यामुळे त्यांना कवितासारखीच मनमिळाऊ, कामसू सून हवी होती.
पण त्यांच्या मुलाने म्हणजे शुभमने बायको म्हणून आपल्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या सायलीला पसंद केले आणि सुनीताबाईंना एकुलत्या एक मुलाची आवड म्हणून होकार द्यावा लागला.

सहा महिन्यांतच सायलीने घराचा कायापालट केला. घरात सर्व आधुनिक उपकरणे आली. सुनीताबाई आधी एकट्या घरातील कामं करायच्या पण आता ह्या सर्व कामासाठी बाई लावली होती.
त्यामुळे त्यांचा पूर्ण दिवस कंटाळवाणा जाऊ लागला. हे ओळखून सायलीने त्यांचं नाव एका हौशी महिलांच्या मंडळात नोंदवले.
त्यामुळे वेळच जात नाही , कंटाळा येतो अशी तक्रार करणाऱ्या सुनीताबाईंना आता मंडळातील इतर कार्यक्रम ,सहली या साठी वेळ कमी पडू लागला.
तरीही आपली सून कविता सारखी इतर कोणत्या कार्यक्रमाला नसते , नातेवाईकांना भेटत नाही किंवा कधी कोणी पाहुणा आला तर पाहुणचार करायला घरी नाही. सुट्टीच्या दिवशी कधी कोणाकडे जायचं म्हटलं की नकार देते या गोष्टींची त्यांना खंत होती.

त्यांनी एकदा हा विषय सायलीकडे मांडला.
त्यावर सायली ने हसत उत्तर दिलं, आई शुभम प्रमाणेच माझदेखील सारखंच काम आहे त्यामुळे आम्हाला आराम करायला फक्त रविवारच मिळतो . इतर वेळी गरज असेल तर एखादा दिवस सुट्टी घेता येऊ शकते पण सारखं सारखं नाही घेता येणार.
शेवटी
पैसा कमवायचा म्हटलं तर कुठेतरी तडजोड करावी लागणार ना?

सुनीताबाई यावर निरुत्तर झाल्या.
काही दिवसांनी एकदा दुपारी सहज सुनीताबाईंची मोठी बहीण त्यांना भेटायला आली.
बोलता बोलता सहज म्हणाली ,
सुनीता तू खूप नशीबवान आहेस सायली सारखी सून तुला मिळाली .
नोकरीकरून पण घर व्यवस्थित मॅनेज केलंय.शिवाय तुझी पण काळजी घेते.

यावर सुनीताबाई हळू आवाजात म्हणाल्या... एवढ केलं म्हणजे झालं असं नाही ना ताई? घरी असती तर मला आधार असता . वेळ जावा म्हणून बाहेर पडायला नसतं लागलं . आणि कविता तर येणाऱ्या - जाणाऱ्या लोकांचा इतका चांगला पाहुणचार करते मग तुझी तर किती काळजी घेत असेल ?
यावर ताई हसू लागली आणि म्हणाली अगं ती एक नंबरची नाटकी आहे बघं . प्रत्येकाच्या तोंडावर गोड बोलते . चांगुलपणाचा दिखावा करते पण नंतर मात्र ती वैतागते बडबड करते. तुला एकदा मॉल मध्ये खरेदी करून दिली नंतर घरी येऊन फुकटचा खर्च करावा लागला म्हणून बडबड करत होती.
शेवटी काय तोंडावर गोड बोलते ,दिखावा करून पाहुणचार करते ना ...म्हणून मी पण दुर्लक्ष करते.
सुनीताबाईंना विश्वास बसला नाही म्हणून ताईंनी सुनीताबाईंच्या कानात काहीतरी सांगितले.

ठरल्याप्रमाणे ताईने सायलीला फोन केला.
मावशी बोला आज कशी काय आठवण आली तुमच्या या सुनेची?..पलीकडून सायलीने विचारलं.
सायली मला माहीत आहे तू ऑफिस मधे असशील पण तरीही तुला कॉल केला ..
अगं माझी तब्येत बिघडली आहे . मी तुझ्या घरी आले आहे तुझी सासू आहे सोबत पण तू येतेस का ?
सायली धीर देत म्हणाली..हो मावशी मी निघते लगेच. येताना डॉक्टरांना घेऊन येते . तुम्ही पडून रहा शांत. आईना सांगून तोपर्यंत काहीतरी खाऊन घ्या.

सुनीताबाई म्हणाल्या ...बघू आता मी एक फोन केला तर कविता धावत येईल बघं.
ताई म्हणाल्या, हो ...हो....आधी कर तर खरं..
सुनीताबाईंनी कविताला फोन केला.
कविता अगं ऐक ना ... मला ना जरा बरं वाटतं नाहीये चक्कर पण येतेय . सायलीला फोन केला पण ती व्हिसिट साठी गेली आहे ऑफिसमधून म्हणून रात्रीच येऊ शकते.
तू ये मग लगेच...
तू ये मग लगेच...
पलीकडे ऐकणाऱ्या कविताच्या कपाळावर आठ्या आल्या...नाटकीपणाने ती म्हणाली...
मावशी मी आताच मार्केटमधून घरी आले. तुमच्याकडे आले असते पण नेमकं आजच सासूबाई न सांगता कुठेतरी गेल्यात. काळजी घ्या तुम्ही . आराम करा.
सुनीताबाईंच पुढंच बोलणं न ऐकता कविताने फोन ठेवून दिला.

आणि इकडे सुनीताबाईंच्या मनात आपल्या सुनेबद्दल अजून प्रेम दाटून आले.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा