Login

दिल विल...२

अबोल प्रेम...





" तू जा... माझी सहमती आहे. पण दर दोन दोन तासांनी मला कॉल करायचा. तुझं लोकेशन मला शेअर करायचं. तुम्ही मुली मुली एकत्र फिरा पण आजुबाजुला लक्ष द्या. थिल्लर पणा अजिबात नको. तुमच्या ग्रुप मधील सगळ्या मुलांचे नंबर मला दे आत्ता. आणि चालू नंबरच हवे हा मला... " दिनकर राव तिला सूचना वजा धमकीच देत होते.

अर्सा ही होकारार्थी मान हलवत होती. तिला सगळ्या अटी मान्य होत्या. तिला स्वतःवर विश्वास होता. त्यामुळे तिने लगोलग सगळ्यांचे नंबर दिनकर रावांना देऊन टाकले.


बाबांनी कोल्हापूरला जायची परवानगी दिली हे ऐकून अर्सा ला फार आनंद झाला.

रात्री जेवण करून तिने सगळ्यात आधी कैवल ला कॉल केला.

" हॅलो बडी.... बाबांनी मला कोल्हापूरला जायला परवानगी दिली. याहूssss....?" अर्सा अत्यंत आनंदित होऊन आपल्या बेडवर झेपावली.

" कंजूस.... एक नंबर कंजूस मुलगी आहेस तू. मला पाचशे रुपये द्यावे लागतील म्हणून खोटे पण बोलू लागलीस तू..." कैवल ने नकारार्थी मान हलवली.

" अरे मी खोटं बोलत नाहीये. खरंच बाबांनी मला कोल्हापूरला जायला परवानगी दिली. परवा निघू आम्ही कोल्हापूरला...."

" पुरे पूरे जास्त उडू नको हवेत. नाहीतर धपकन जमिनीवर पडायला वेळ लागणार नाही." तो तिला चिडवत म्हणाला. पण अर्सा ला त्याचं वाईट वाटलं नाही.

" नाही पडणार....?" ती हसत म्हणाली. " चल बे भोपू... तू भी क्या याद रखेगा... मी करते तुला पाचशे रुपये ट्रांसफर. ऐश कर...." ती एकदम ऐटीत म्हणाली.

त्याने मात्र आपल्या डोक्यावर हात मारला. " बरं चल... मी जातो. मला जेवण करायचं आहे अजुन. तुझं काय.. आयतं गिळून झालं असेल. "

" तुला कोणी सांगितलं होतं एवढ्या लांब तेही एकटं राहता जा म्हणून. " ती बेफिकीर पने म्हणाली.

" चूप ग चोमडे...ठेवतो बाय." त्याने कॉल कट केला. तशी अर्सा हसली आणि कॉल कट केला.

की पुन्हा फोन वाजला. स्क्रीन वरील नाव पाहून तिने खुशितच कॉल रिसिव्ह केला...

" हॅलो माय जान...." ती खट्याळ पणे म्हणाली.

" तू रात्रीची टकीला शॉट लावून बसलीस का...? हे जान वैगेरे काय आहे...?" तो गोंधळून म्हणाला.

" नाय रे .. तसं नाय.. आज मी जाम खुश आहे. "

" ते समजलच मला. जान वरून. " तो नाक उडवत म्हणाला.

" असं नाही रे... "

" मग कसं...? "

" अरे माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला जायला बाबांनी मला परवानगी दिली. "

" अरे वाह... काका तयार झाले तर तुला बाहेर सोडायला. " तो फिरकी घेत होता. पण तिला आज कशाचंच वाईट वाटत नव्हतं. तिने फक्त हुंकार भरला.

" गौत्या.... तू पण ये ना....प्लीज..." ती त्याला लाडीगोडी लावत म्हणाली.

" मला येड लागलंय का...? तूच जा... बरं मला सांग तुम्ही सगळे कधी निघणार आहात...?"

" अम्म... परवा सकाळी आठ वाजता गाडी आहे माझ्यामते..." ती अंदाज लावत म्हणाली.

" तुला कोणी सांगितलं गाडी आठ वाजत आहे ती...?"

" कोणी म्हणजे...? मला माहित आहे. " ती भोलेपणाने म्हणाली.

" तुझी माहिती सुद्धा तुझ्यासारखी अर्धवट..." तो म्हणाला आणि तिने गाल फुगवले....

" गौत्या... जास्त बोललास..." ती नाटकी रागवत म्हणाली आणि तो मात्र खो खो करत हसला.

गौत्या... म्हणजे गौतम नाईक. अर्सा चा एकमेव जिगरी मित्र. फक्त मित्र...! स्वभावाने शांत. फेसबुक फ्रेंड... पण नंतर ओळख झाल्यावर कळलं. तो, ती राहायची तिथून अर्धा एक तासाच्या अंतरावर असणाऱ्या दुसऱ्या गावात राहायचा. दोन्ही गावाला एकच बाजारपेठ लागायची. त्यामुळे मग अधून मधुन भेट ही व्हायची. त्यामुळेच ते लवकरच चांगले मित्र झालेले. तिचा शांत स्वभाव आणि नंतर अंगातील किडे ओळखू लागलेला तो. ती कोणत्या वेळी कशी रीॲक्ट होईल त्याचा ही अचूक अंदाज यायचा त्याला. त्यामुळे तिच्या बाबतीत सगळ्या गोष्टी त्याला माहित असायच्या. तीच सांगायची त्याला....

आता ही ती कुठल्या मैत्रिणीच्या लग्नाला जाणार आहे...? कुठे जाणार आहे...? कधी...? किती जण...? सगळं सांगून ठेवलेलं तिने.

" माकडा... सगळे दात घशात घालेन समजल ना..." ती चिडून म्हणाली. आणि त्याने आपलं हसू कसं बसं रोखले.

" बरं मला सांग... तो ही येणार आहे का...?" त्याच्या या प्रश्नावर मात्र ती शांत झाली. त्याच्या उल्लेखाने सुद्धा ती गप्पगार व्हायची. तो समोर आला तर काय होईल तिचं...?

तो....! तिचा क्रश... तिच्याच बरोबर आयटीआय मध्ये होता. तेव्हा कधी बोलणं झालं नव्हतं तिचं. पण तरीही तो आवडायचा तिला. कधी सांगू शकली नाही हे वेगळं... पण तरीही... फर्स्ट साईट लव...? असच काहीसं...!

ती विचारात हरवलेली. गौतम ने तिला भानावर आणलं.

" म्हणजे येणार आहे तर....?"

" Hmmm...." ती

" मग यावेळी तरी काही बोलणार आहेस की नाही...?"

" नाही. कधीच नाही. तुला ही माहित आहे का ते...?"

" अग पण प्रयत्न करायला काय हरकत आहे...?"

" गौत्या... तुला काहीच माहीत नाही असं दाखवू नकोस समजलं ना. ताई च्या केवढे मोठे रामायण घडलं ते तुला माहित आहे ना...? अशावेळी माझं कोण ऐकेल...? त्यात त्याच्यात आणि आमच्यात एक मोठी भिंत आहे. ती म्हणजे जातीची...! आणि तू म्हणतोस प्रयत्न कर... मूर्ख आहे का मी...?"

" नाही. अजिबात नाही... पण आता जमाना बदलला आहे अर्सा... कदाचित त्याच्या घरचे जातपात मानत नसतील. कदाचित त्याच्या ही मनात तुझ्याबद्दल फिलिंग्ज असतील..."

" या जर तर च्या गोष्टी आहेत गौत्या... आणि मला खरंच या सगळ्यात नाही पडायचं. प्लीज... आपण टॉपिक चेंज करूया का...? नाही तर नकोच. मी ठेवते कॉल. झोप येतेय मला. उद्या कामाला ही जायचं आहे. काका काकूंना विचारलं म्हणून सांग... बाय good night..."

" Sorry... Good night. " त्याने ही कॉल कट केला. आणि एक वार तिच्या कॉलर डीपी ला पाहिलं.

" खरच वेडी होती ती... तेवढीच समजूतदार... !" तो हसला आणि झोपायला निघून गेला.


अर्सा झोपायचा प्रयत्न करत होती. पण आता झोप कोसो दूर उडालेली. त्याचा तो पाच वर्षांपूर्वी चा चेहरा अचानक डोळ्यांसमोर आला. " खरंच गौत्या म्हणतो तसा जर तो ही आला लग्नाला तर...? श्या... नाही येणार. तो आता सरकारी अधिकारी आहे. त्याला कुठे सुट्टी मिळतेय. मी पण ना.... त्या माकडाच्या बोलण्यात येतेय. अर्सू बेटा झोप तू. " ती स्वतःला समजावत झोपी गेली. पण तो मात्र नजरेसमोरून जाता जाईन.....