" देवा... या अर्सा ने त्या ध्रुव ला पार येडं नाय बनवलं म्हणजे मिळवली. " तो हसतच आपल्या रूम मध्ये निघून गेला. पण त्याच्या हसण्यात कुठेतरी निराशा होती... जी तो लपवत होता.
.............
कोल्हापूरला पोहोचायला नाही म्हाणायला एक नक्की वाजणार होता. कारण त्यांची गाडी थोडी उशिरा आलेली आणि आता कुठे साडेनऊ वाजले होते. म्हणजे अजून तीन साडेतीन तासांचा प्रवास होता.
वेळ कसा जाईल याची फिकीर नव्हती कारण ते सगळे एकत्र होते. आणि एकत्र प्रवास करायला जी मजा येते ती एकट्याने नाही येत. हेही तेवढेच खरे.
पण या सगळ्यांपासून अलिप्त असणारी अर्सा कानात हेडफोन घालून ध्रुवच्या विचारात हरवलेली.
आता तो तिथे आलाय म्हणजे तिचं चित थाऱ्यावर राहत नव्हते. लक्ष ही त्याच्यावरच जात होता.
एका क्षणी त्याची आणि तिची नजरा नजर झाली. बिचारी बावरून आजूबाजूला पाहू लागली. तो मात्र तिला पाहत होता. तसे तिनेही त्याला पाहत एक स्माईल केली. तोही दिलखुलास हसला.
' किती गोड हसतो हा... ' अर्सा मनातून हसली अन् तिने पुन्हा मोबाईल मध्ये पाहत गाणे चेंज केले.
" पेहेला नशा पेहेला खुमार
नया प्यार है नया इंतजार ...
करलूं में क्या अपना हाल
ऐ दिल ए बेकरार
मेरे दिल ए बेकरार ..
तूही बता ... "
बाकीचे सगळे गप्पा गोष्टी करत होते. खूप दिवसांनी भेटल्याने कोण कुठे काय करतो याची विचारपूस चालू होती. पिंकी ने ही अर्सा ला तिच्या कामाविषयी आणि बाकीची माहिती विचारली.
अर्सा एका कंपनीत मॅनेजर होती. छोटीशी कंपनी होती ती. त्यात ती मजेत होती. घरात ही बंधनं असली तरी खुश होती ती. त्यामुळे तिने ही आपण मजेत आहोत असं सांगत तिला विचारलं.
हळू हळू त्यांना एका जागी बसून कंटाळा. त्यामुळे मग उठून एकमेकांच्या खोड्या काढणं, जागा बदलणं चालू होतं. पिंकी उठून स्वप्ना च्या बाजूला गेली. तर नीशू अर्सा च्या बाजूला आली.
" अरसू... किती दिवसांनी भेटतोय आपण. आणि तू आहेस की कानात हेडफोन घालून बसलीस. जरा आमच्याशी बोल. थोडा वेळ आमच्या जिजुंना ही फ्री सोड की..." निशु मुद्दाम अर्सा ची मस्करी करत होती.
" कोण जिजू...? कोणाचा जिजु...?" अर्सा ने भुवई उंचावली अन् कानातील कॉड काढून बाजूला केला.
" आमचा जीजू ग... तुमचे हे..." ती डोळे मिचकावत म्हणाली.
" काविळीच्या रोग्याला सगळं पिवळच दिसतं. " अर्सा तिला पाहत नकारार्थी मान हलवत म्हणाली.
" असं काहीही नाही अरसु... तू सांग बघू कोणी पटवलास की अजूनही " प्यार...? हम से ना हो पायेगा...!" च्याच जंजाळात अडकली आहेस...?"
" नीशु की बच्ची... तू आधी सांग... तू कधी लग्न करतेस...? मी तर तुझ्या लग्नात एखादा मुलगा पटवायच्या विचारात आहे. "
" अरे देवा.. म्हणजे अजुन एक दीड वर्ष वाट पाहावी लागेल तुला..." निषू मनापासून हसत म्हणाली.
अर्सा ही मनापासून हसली. एवढ्या वेळात ती पहिली वेळ मनमोकळी हसली असेल....
हळू हळू ती त्यांच्यात मिक्स होत होती. पण तरीही कमीच बोलत होती.
थोड्यावेळाने सगळे शांत झाले. सगळे विषय संपले होते. मुलांचं बोलणं संपलं होतं. पण मुली अजूनही बोलायच्या थांबल्या नव्हत्या.
" विश्वा भावा... काय हा मच्छी बाजार भरलाय. की ती बोलतात या मुली...?" आत्मा जरा मोठ्या आवाजात म्हणाला.
निशु अजूनही अर्सा शीच बोलत होती. पण आत्मा चे बोल कानावर पडले आणि तिने भुवई उंचावली.
निशु आणि आत्मा बेस्ट फ्रेंड कम सिस्टर ब्रदर. पार्ट टाइम टॉम अँड जेरी...?
म्हणजे आत्मा बोलला की निशू ने त्याला रोकलच पाहिजे. आणि त्या दोघांची तू तू मैं मैं चालू व्हायलाच हवी असा जणू दोघांचाही नियम होता. त्यामुळे आता आत्मा बोलला आणि निशु कंबरेवर हात घेऊन त्याच्या समोर उभे राहिली.
" ओ भटकती आत्मा... आमचा तो मासळी बाजार आणि तुझा काय फाईव स्टार मॉल का..? जा ना तू गप तुझ्या मसनातील चुडेल मैत्रिणीशी बोलत बस ना..."
" ओय... सुक्या बांगड्या... जास्त बोलायचं नाय हा.. आधीच सांगून ठेवतो. नाहीतर तुझी गुटली गाडीतून बाहेर फेकून देईन." तो तिला खुन्नस देत म्हणाला.
" हात तर लावून बघ. तुझे सरळ पाय उलटे करेन आणि हात वाकडं..." निशु हात पाय वाकडं करत म्हणाली.
" अरे अरे... तुम्ही घरी आहात का..? असं भांडायला. सगळे तुम्हालाच बघतायत. जरा तरी लाज बाळगा..." ध्रुव त्या दोघांना हि शांत करत म्हणाला.
नेमकी अर्सा ही निशु ला पकडून खाली बसवायला उठली होती. त्याला पाहून पटकन आपल्या जागी बसली.
पुन्हा एकदा शांतता.....
" हे... आपण गाण्यांच्या भेंड्या खेळूया का...?" प्रीती ने बोलायला सुरुवात केलेली.
" हो चालेल..." वर्षा आणि स्वप्ना लगेच तयार झाल्या.
मुलांकडून नितीन, राहू आणि आत्मा विश्वा तयार झाले. पण टीम कशी बनवणार...?
प्रीती ची कल्पना म्हणून मग तिचा एक गट आणि राहु चा एक गट तयार झाला. प्रीती ने पटकन वर्षा नितीन आणि आत्मा ला आपल्या गटात घेतलं.
राहू ने ही स्वप्ना विश्वा ला आपल्या गटात सामील केलं. पण तरीही त्यांच्या गटात एक माणूस कमीच होता. की राहू ने निशु ला इशारा केला.
" निशू... आत्मा ला हरवायचे आहे. प्लीज आमच्या गटात ये ना.." राहू
निशु ही तयार झाली. असे चार चार चे गट तयार झाले. त्यांनी गाणी म्हणायला जशी सुरुवात केली. हळू हळू सगळे जण एकत्र येऊ लागले. खेळात इंट्रेस वाढत गेला तसे आपोआप एकमेकांना साथ देऊ लागले.
सचिन राहुल च्या गटात जाऊन बसला. तसा ध्रुव ही प्रीती च्या गटात गेला.
म्हणजे आता राहुल च्या गटात स्वप्ना, विश्वा, निशु, सचिन असे पाच जण.
तर प्रीती च्या गटात वर्षा, नितीन, आत्मा आणि ध्रुव आणि पिंकी असे सहा जण झाले.
" अर्सा..." राहुल ने तिला हाक मारली.
" काय..?"
" आमच्या गटात ये ना.. "
" राहुल्या.... मला गाणी म्हणता येत नाहीत. मी काय करू तुमच्या गटात येऊन..." अर्सा गोंधळून म्हणाली.
" अगं बाई.... हवं तर गाणी नको म्हणू. पण ये..." राहुल विनवणी करत म्हणाला. तशी अर्सा ही तयार झाली.
जसे गट तयार झाले. तशा जागा ही बदलल्या. आणि अर्सा जिथे बसली... बरोबर त्याच सिट च्या बाजूची सिट ध्रुव काबीज करून बसलेला.
अर्सा चा लक्ष नव्हता. ती फक्त तिला मिळालेल्या जागी जाऊन बसली. बाबांचा कॉल आलेला. त्यामुळे त्यांच्याशी बोलत होती.
पुन्हा एकदा भेंड्या सुरू झाल्या. गाडीत जास्त गर्दी नव्हती. त्यात यांचाच गलका जास्त होता. त्यामुळे कंडक्टर ने ही मागे येण्याची तसदी घेतली नाही. बाकीचे काही प्रवासी झोपले होते तर काही मागे यांच्या गाण्यांच्या भेंड्या एन्जॉय करत होते.
" .... लागेना... लागेना.. आता हे मन तुझ्या विना..." निशु आत्मा ला पाहत..." न आला तुमच्यावर... "
" So what...? मला चॅलेंज देऊ नकोस. समजलं..." आत्मा ने तिला उडवून लावलं.
" ना जाने मेरे दिल को क्या... हो गया...
अभी तो यही था अभी... खो गया..." ध्रुव ने गाणं म्हणायला सुरुवात केली आणि इथे अर्सा चे डोळे खोबणीतून बाहेर यायचे बाकी राहिले.
आता कुठे तिचा लक्ष त्याच्यावर गेला. नेमका तो तिला पाहत होता आणि त्याला पाहून तिच्या काळजात धडकी भरली. तिला नक्की काय होतंय ते कळत नव्हतं पण खूप विचित्र वाटत होतं. पोटात असंख्य फुलपाखरं फुगडी घालत होते. तर हृदय मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतल्यासारख हजार च्या स्पीड मध्ये पळत होते.
" य... य आलाय तुमच्यावर..." आत्मा ने निशू ला पाहत रुबाबात सांगितले.
" य आलाय ना...? त्यात काय...? स्वप्ना सुरू कर ग गाणं म्हणायला..." निशु ही त्याच रुबाबात म्हणाली.
" निशु मला आठवत नाहीये. " स्वप्ना जीभ चावत म्हणाली. आणि तीच बोलणं ऐकून निशु ने डोळे मोठे केले.
" काय...? अग मग आठव ना.. "
सगळेच य वरून गाणं आठवत होते. पण कोणालाच गाणं आठवेना. त्यात आत्मा ने उभ राहत वेळ मोजायला सुरुवात केली.
" टिक टिक वन..."
" टिक टिक टू..."
" टिक टिक three.."
" बघ हा.. पाच म्हणायच्या आधी गाणं म्हणा नाहीतर भेंडी लागेल..." आत्मा तिला चेतावणी देत म्हणाला.
" अरे यार... आठवा ना.. लवकर. आपण हरू नाहीतर..." निशु कळवळून म्हणाली.
" अर्सा... तू एकही गाणं गायली नाहीये. आता एक तरी गा ना... आम्हाला गरज आहे. नाहीतर आम्ही हरू... " सचिन ने अर्सा पाहत विनंती करत म्हणाला.
" मी...? अरे मला नाही येत गाता... आणि माझा आवाज ही.."
" इथे कॉम्पिटीशन नाहीये आरसू... प्लीज गा ना... हमारी इज्जत अब तुम्हारे हात मे हैं..." निशु ओव्हर अक्टिंग करत म्हणाली.
" अति होतंय हे निशु...." अर्सा ने डोळे फिरवले.
" प्लीज ना... प्लीज... हवं तर एखादं जुनं गाणं म्हणालीस तरी चालेल... पण गाणं म्हण...." राहुल ने ही तिला मख्खन लावायला सुरुवात केली.
" ओके ओके... गाते मी. पण नावं ठेवायची नाहीत हा.. आधीच सांगून ठेवते. " अर्सा ने होकारार्थी मान तर हलवली. पण तिला ही गाणं आठवेना. त्यात सगळेच तिला आशाळभूत नजरेने पाहत होते. त्यामुळे तर ती अजूनच बावरली.
" असे बघू नका मला... काहीच सुचत नाहीये त्यामुळे. " तिने आपले डोळे मिटले. एक गाणं आठवलं... पण ते खूप जुनं गाणं होतं. पण सध्या त्यांना हवं होतं... म्हणून मग तिने गायला सुरुवात केली.
" ये दिल दीवाना है, दिल तो दीवाना है
दीवाना दिल है ये दिल दीवाना...."
अर्सा ने गाण्याची पहिलं कडवे गाऊन डोळे उघडले. पण सगळे तिच्या आवजत हरवले. तिचा आवाज खूपच छान होता. मंजुळ स्वर... प्रत्येक शब्दात भावना जणू ओतप्रोत भरलेल्या... त्यामुळे तिचं गाणं ऐकत राहावं असच वाटत होतं सगळ्यांना. त्यात आजूबाजूचा आवाज ही बंद झालेला. त्यामुळे तिचा आवाज स्पष्टपणे सगळ्यांच्या कानातून मनात... आणि मनातून ह्रदयात सामावुन जात होता.
" ... पुढे गाशील ..." ध्रुव ने तिला पाहत रिक्वेस्ट केली.
" पुढे...?"
" हो हो... अर्सू... तुझा आवाज खूप गोड आहे. खरंच पुढे गा ना..." निशु ने ही ध्रुव च्या बोलण्याला दुजोरा दिला.
" हो हो अर्सा तू गा... छान गातेस तू... आम्हाला ऐकायचं आहे. " आता तर सगळेच तिला विनंती करू लागले. अर्सा च्या कपाळावर आठ्या पडल्या. पण त्याने सांगितलं होतं... म्हणजे गाणं भाग होतं. तिने गालात हसली अन् पुन्हा गायला सुरुवात केली... यावेळी डोळे उघडेच होते. अन् घुमुन फिरून त्याच्यावरच येत होते. तो मात्र बिनधास्त तिला पाहत होता...
" ये दिल दीवाना है, दिल तो दीवाना है
दीवाना दिल है ये दिल दीवाना...."l
कैसा बेदर्दी है, इसकी तो मर्ज़ी है
जब तक जवानी है, ये रुत सुहानी है
नज़रें जुदा ना हों, अरमां खफ़ा ना हों
दिलकश बहारों में, छुपके चनारों में
यूं ही सदा हम तुम, बैठे रहें गुमसुम
वो बेवफ़ा जो कहे हमको जाना है ये दिल,
ये दिल दिवाना है ...
बेचैन रहता है, चुपके से कहता है
मुझको धड़कने दो, शोला भड़कने दो
काँटों में कलियों में, साजन की गलियों में
फ़ेरा लगाने दो, छोड़ो भी जाने दो
खो तो न जाऊंगा, मैं लौट आऊंगा
देखा सुने समझे अच्छा बहाना है ये दिल,
ये दिल दिवाना है ...
सावन के आते ही, बादल के छाते ही
फूलों के मौसम में, फूलों के मौसम में
चलते ही पुरवाई, मिलते ही तन्हाई
उलझाके बातों में, कहता है रातों में
यादों में खो जाऊं, जल्दी से सो जाऊं
क्योंके साँवरिया को सपनों में आना है ये दिल,
ये दिल दिवाना है ..."
गाणं केव्हाच संपलं होतं. पण अजूनही सगळे त्या गाण्याच्या शब्दांत स्वतःला हरवून बसलेले... ध्रुव तर एकटक तिला पाहत होता. ते पाहून अर्सा ने लाजून नजर झुकवली.
क्रमशः....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा