सावन के आते ही, बादल के छाते ही
फूलों के मौसम में, फूलों के मौसम में
चलते ही पुरवाई, मिलते ही तन्हाई
उलझाके बातों में, कहता है रातों में
यादों में खो जाऊं, जल्दी से सो जाऊं
क्योंके साँवरिया को सपनों में आना है ये दिल,
ये दिल दिवाना है ..."
गाणं केव्हाच संपलं होतं. पण अजूनही सगळे त्या गाण्याच्या शब्दांत स्वतःला हरवून बसलेले... ध्रुव तर एकटक तिला पाहत होता. ते पाहून अर्सा ने लाजून नजर झुकवली.
.........
गाडीत पूर्णतः शांतता पसरलेली. ब्रेक आणि चाकांचा काय तो आवाज होता आणि त्यात अर्सा च्या गाण्यांचा आवाज...!
सगळे धुंद होऊन तिचं गाणं ऐकत होते. तिचा आवाज ही गोड होता त्यामुळे जे झोपले होते तेही.. उठून कोण गातय हे पाहत होते.
गाडीत असणाऱ्या शांततेमुळे तिचा आवाज अजूनच मोठ्याने येऊ लागलेला. पण त्याची फिकीर नव्हती कोणाला. कारण तिचा आवाज एवढा गोड होता की सगळे मन लावून ऐकत होते.
ध्रुव कदाचित मनाबरोबर हृदय ही लावून ऐकत होता. गाणं केव्हाच संपलं होतं. पण त्याच्या धुंदीत अजूनही सगळे कुठल्यातरी दुसऱ्याच विश्वात पोहोचले होते.
गाडीचा ब्रेक लागला आणि सगळे भानावर आले. गाडी पंधरा मिनिटे थांबणार होती. सगळे नाश्त्यासाठी उतरून गेले होते. जाताना कंडक्टरने " ?? सुंदर " असा इशारा करत खाली उतरला.
अर्सा ला मात्र अवघडल्या सारखं झालं. ती पटकन पुढे चालू लागली. तिच्या मागोमाग सगळ्या मुली आणि त्यांच्या मागे सगळे मुले खाली उतरले.
सगळे बाथरूम मध्ये जाऊन आले. आणि एकेक चहा घेतला व ते गाडीत येऊन खात बसले.
युज अँड थ्रो कप मध्ये सगळ्यांनी चहा घेतला होता. गाडी अजून पाच मिनिटे तरी थांबणार होती. अर्साने आई-बाबांना कॉल करून.. गाडी नाश्त्यासाठी थांबली आहे. असे सांगितले. थोडावेळ बोलून तिने कॉल कट केला.
मोबाईल ठेवताना गौतम ने दिलेल्या डब्याची आठवण झाली. तिने कचरत डबा बाहेर काढला.
" हे कोण हे घेणार आहे का खायला...?" तीने डब्याचे झाकण उघडून त्यांच्या समोर केलं. सर्वांनी तिच्याकडे पाहिलं आणि एकदा डब्यातील गोडाची भाकरी पाहिली.
ध्रुव ने पटकन तिच्या हातातला डबा घेतला. डबा घेताना ओझरता स्पर्श तिच्या हाताला झाला त्याने ती शहारली. पटकन हात काढला. त्याने तिला महात सॉरी म्हटलं... तशी ती त्याच्याकडे दुर्लक्ष करून बाकीच्यांना पाहू लागली.
" मला हवीय हा भाकरी. मला जाम आवडते..." निशू उठत म्हणाली. पण तिला धक्का देत आत्मा ने ध्रुव च्या हातातील डबा हिसकावून आपल्या हाती घेतला.
" सॉरी... पण तुला नाही भेटणार. बाजूला हो.. मला सगळ्यांना द्यायचं आहे. " असं म्हणत त्याने तिला बाजूला केलं व आपल्या जागी जाऊन बसत एकटाच तो डबा उघडून खाऊ लागला. ते पाहून निशु चिडून लाल झाली.
" माकडा... सगळ्यांना वाटत होतास ना..? मग आता एकटाच का खात आहेस..? दे माझ्याकडे तो डबा बघू..." निशूने त्याच्या हातातील डबा हिसकावून घेतला आणि तिने सगळ्यांना एक एक पीस वाटला.
ध्रुव कडे येत तिने त्यालाही एक पीस दिला. पण त्याने तो पीस तिच्या हातातच ठेवत डबा आपल्याकडे घेतला. अन् एक गोड स्माईल केली...
" एका पीस ने माझं काहीही होणार नाही. मला पूर्ण डबा दे.." असं म्हणत त्याने खायला सुरुवात केली.
अर्सा कपाळावर हात मारत सगळ्यांना पाहत होती. पण राहून राहून लक्ष त्याच्याकडे जात होता. त्याने हसत तिला पाहिलं आणि तिच्यासमोर डबा केला. " तुला पाहिजे का...?"
त्याने विचारलं आणि ती बेहोश...! आधीच तुला पाहून माझा श्वास अडकतो. त्यात तुझ्याशी बोलणं म्हणजे...
अर्सा मनातल्या मनात विचार करत होती.
" अर्सा कुठे हरवलीस...?" त्याने पुन्हा हाक मारली आणि तिने भानावर येत नकारार्थी मान हलवली.
" नाही.. काही नाही. नकोय मला. माझ्याकडे सेपरेट डब्बा आहे. \" फक्त माझ्यासाठी..!\" " शेवटचे शब्द मात्र हळू म्हटले. कोणालाही ऐकू येणार नाही असे...
कारण गौतम ने तिला सूचना तशी दिली होती. \" गोडाची भाकरी सगळ्यांना वाटून मोकळी होशील. तुलाच राहणार नाही. त्यापेक्षा थोडे पिसेस काढून तुझ्या डब्यात ठेव..l बाकीचे एका बाजूला ठेव. जे तुला बाकीच्यांना देता येतील." त्याचं मात्र तंतोतंत लागू पडले इथे.
तिच्यासाठी एक पीस सुद्धा राहिला नाही. ती गालात हसली. \" त्याला कॉल करू का..? पण कशाला उगाच... माझ्या आई बाबांना एका एका तासाने कॉल करते. त्याला ही एका एका तासाने कॉल केला तर त्याचे आई-बाबा त्याची कॉलर घेतील हातात. त्यापेक्षा राहू दे... कोल्हापूरला पोचली की कॉल करेन. आता फक्त मेसेज करते. " असा विचार करून तिने त्याला मेसेज टाकून ठेवला. अन् पुन्हा त्यांच्यामध्ये सामील झाली.
गाडीत पुन्हा तिथून सुटली आता ती सरळ कोल्हापूरलाच थांबणार होती. म्हणजे अजून अडीच तास होते. सगळेच आता पेंगत होते. अधेमधे कोणा कोणाचं बोलणं चालू होतं.
अर्सा फोनवर होती. कानात इअरफोन घालून बसलेली. अजूनही त्यांच्या जागा बदलल्या नव्हत्या. त्यामुळे तो तिच्या बाजूलाच होता. त्यामुळे तर तिला अजूनच अवघडल्यासारखं वाटू लागलं. अर्सा ने गाणे चेंज केलं. तेवढ्यात कैवल चा कॉल आला.
" हा बोल बे... काय म्हणतोय...? " ती हळू आवाजात म्हणाली.
" कुठे पोचलीस...?"
" आत्ता गाडी नाश्त्याला थांबली होती. आता पुढे जातोय. अजून अडीच तीन तास लागतील पोहोचायला."
" हा. सरळ घरी जाणार की कुठं फिरायला जायचं आहे...?"
" नाही. घरी नाही. आधी महालक्ष्मीला जाणार आहोत. तिकडे पाया पडून मस्त पैकी प्रसाद खाऊ आणि मग तिकडं लग्नाच्या घरी जाऊ. "
" हा. गाडीचा त्रास झाला का..?"
" नाही रे... सध्या तरी काही नाही. गोळी घेतली होती ना.. त्यामुळे काही वाटत नाहीये."
" बर आहे मग. मी कॉल करेन पुन्हा एक दोन तासाने. आता कामावर आहे."
" ओके चालेल... बाय. मी ठेवते."
अर्सा ने कॉल ठेवला तशी तिच्या मोबाईल ची मेसेज ट्यून वाजली.
ध्रुव चा मेसेज होता. तिचे डोळे जागीच मोठे झाले. \" हा बाजूला असूनही मेसेज का करतोय...? बरं त्याला पाहूही शकत नाही. तरी तिरक्या नजरेने तिने त्याला पाहिलं. तर तिला पाहून हसत होता. तशी ती गडबडली पुन्हा मोबाईल मध्ये पाहू लागले. तशी पुन्हा मेसेज ट्यून वाजली. आता मात्र तिने मेसेज उघडून पाहिला.
" हाय.." त्याचा पहिला वाला मेसेज.
" छान गायलीस...???" त्याचा दुसरा मेसेज.
अर्साने थँक्यू आणि एक स्मायली पाठवली. अन मोबाईल बंद करून ठेवला. तसा पुन्हा वाजला. पाहिलं तर एक ऑडिओ होता. तिने ऑन केला आणि डोळे चमकले.
ती तिने गायलेल्या गाण्याची रेकॉर्डिंग होती. जी त्याने रेकॉर्ड केली होती. पुन्हा त्याचा मेसेज आला.
" व्हिडिओ काढणार होतो. पण उगाच मग बोल लागले असते. म्हणून फक्त ऑडिओ रेकॉर्ड केला." त्याचा मेसेज वाचून अर्साच्या पोटात फुलपाखरांचा फुगडी चा खेळ सुरू झालेला. कसं बसं स्वतःला नॉर्मल केले तिने.
" थॅंक्यु..?" मेसेज टाईप करून पाठवला.
त्याच्याही चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली." तू जास्त मोबाईल मध्ये का असतेस..? आमच्या सगळ्यांबरोबर बोलत का नाहीस..?" त्याचा लगेच मेसेज आला. आणि तिच्या कपाळावर आठ्या पडल्या.
काय सांगू...? काय बोलू..?घरी असती तर तोंडचा पट्टा चालूच राहिला असता. इथं काय बोलणार होती..? बरं तिला जी माहिती आहे त्यात त्यांना इंटरेस्ट नसेल. सांगितले उगाच मग तिचच हसू व्हायचं.
गौतम असता तर गोष्ट निराळी होती. तो ऐकायचा कारण त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता त्याच्याकडे. पण इथे ती थोडं काही बोलायला गेली की लगेच दुसरा कोणी तरी विषय काढायचा आणि तिचा विषय तिथेच थांबायचा. मग ती गप्पच राहायची.
पण आता त्याच्या मेसेजला रिप्लाय देणं गरजेचं होतं. " काय बोलू...? मला बोलायला आवडत नाही. तिने स्मॉल बट स्वीट उत्तर दिलं. आणि मोबाईलचा डाटा बंद करून ठेवला.
खरंच एखाद्याच्या समोर त्याचा क्रश असेल. तर ती व्यक्ती त्याच्या क्रश सोबत मुद्दाम बोलण्याचा प्रयत्न करेल. त्याच्याशी टाइम्स सेंड करायचा प्रयत्न करेल. पण इथं वेगळच होत. तो स्वतःहून तिच्याशी बोलत होता. पण तिला जमत नव्हतं त्याच्याशी बोलणं. दडपण येत होतं तिच्यावर. त्यामुळे मग मोबाईल बाजूला ठेवून तिने मागे सिट वर मान ठेवून डोळे मिटले.
क्रमशः..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा