©®प्रज्ञा बो-हाडे
जीवनाच्या वाटेवर प्रत्येकाची भक्कम साथ पाठीशी असेल तर जगण्याची नवी उमेद हमखास जागृत होते. नाही का? अशीच एक कहानी स्वरूपच्या आयुष्यात घडली. स्वरूप आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा. आपल्या मुलाने अभ्यास करून, नावलौकिक मिळवावे ही प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. तीच इच्छा माधवराव आणि शैलाची ही होती. परिस्थितीमुळे माधवरावांना त्यांचे शिक्षण बारावी मध्ये सोडावे लागले.
तर शैलाला सातवीत असताना शिक्षण पैसे अभावी सोडून द्यावे लागले. आपलं शिक्षण घेण्याचं स्वप्न आपला मुलगा नक्कीच पूर्ण करेल यावर दोघांचाही विश्वास होता.पण स्वरूप मात्र ही गोष्ट गांभीर्याने घेत नव्हता. मित्रांबरोबर गप्पागोष्टी, खेळ खेळण्यात तो बराचसा वेळ वाया घालू लागला.
माधवरावांच्या भावांची मुलं मात्र अभ्यासात हुशार आणि नेहमीच पहिल्या क्रमांकाने पास होत असायची. माधवराव त्यांना बक्षीस म्हणून रोख रक्कम देत असायचे. स्वरूप ला देखील आपल्यालाही असेच एक ना एक दिवस बक्षीस नक्की मिळेल असा विश्वास मनी संचारला होता.
माधवराव स्वरूप ला नेहमी अभ्यासावरून बोलत असायचे. तुझ्यापेक्षा लहान असून ही मुले किती हुशार आहेत. हे सारखे स्वरूप समोर बोलून दाखवायचे.
स्वरूप हताश व्हायचा. अभ्यास देखील नम्रपणे करायचा. कधी रात्री जागूण, तर कधी पहाटे उठून अभ्यास पूर्ण करायचा. मेहनत करून देखील आपल्याला यश का मिळत नाही या विचारात स्वरूप नेहमी काळजीत असायचा.
एक ना एक दिवस आपणही स्वतःला सिद्ध करून दाखव यावर स्वरूपची तगमग स्पष्ट दिसत होती. स्वरूप दहावीला गेला तेव्हा स्वरूप चे अख्खे घरच दहावीला बसून परीक्षा देत आहेत की काय असे वाटत होते. आधीच एकुलता एक. त्यातूनही तो नापास झाला तर पुढे कसे होणार? याचाच विचार सर्वजण करत होते.
संकट आली की जशी चारी बाजूंनी वार करतात. तसंच काहीसं स्वरूपच्या बाबत घडत होतं. खेळ खेळताना स्वरूप ला नेहमीच लिंबू टिंबू, किंवा क्रिकेट खेळताना नेहमीच राखीव गडी म्हणून गणले जात.
स्वरूप नक्की कोणते पाऊल उचलेल हे आपण पुढच्या भागात पाहूया.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा