Login

दिलेस तू जगण्याची उमेद भाग ३

आपलं कार्य समोर येण्याची शाश्वती कधीच देता येत नाही.

स्वरूप ला सतत काही ना काही लिहिण्याचे इच्छा नेहमी होत असायची. पण तशी कधी संधी समोर दिसतच नव्हती. स्वरूपने एकदा एक स्टोरी लिहायची ठरवली. रोज दिवसभराच्या कामातून पहाटेची वेळ निश्चित करून स्वरूप स्टोरीचा रोज एक भाग लिहू लागला. 

नीताला स्वरूप काहीतरी काम पहाटे उठून करत असल्याचे जाणीव होताच ती एकदा स्वरूप ला विचारते. कामाचा लोड सध्या वाढला आहे का खूप. पहाटे उठून काम करत आहात.
यावर स्वरूपची बोबडीच वळते. मंथ एंड असल्याने काम पूर्ण करण्याची जबाबदारी सगळ्यांवरच दिलेली आहे. ज्यांना ऑफिसमध्ये थांबून काम करता येत नसेल त्यांनी घरी राहून हे काम पूर्ण केले पाहिजे. त्यात तुझी तब्येत नाजूक आहे. डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितला आहे. सध्या तरी ऑफिसला जाणे मला योग्य वाटत नाही. मी घरी थांबूनच ते काम करेल.
नीता स्वरूपच्या बोलण्यावर विश्वास ठेवत झोपी जाते. स्वरूप नेहमीप्रमाणे आवरून कामावर निघून जातो. ओवर टाइम करणे जमत जरी नसले तरी ऑफिसच्या रेगुलर वेळेत जाऊन काम करणं हितावह आहे. हे जाणून स्वरूप ऑफिसला निघून जातो.
स्वरूप चे ऑफिस दुसऱ्या जागी स्थलांतर होत असल्याने ऑफिसमधल्या लोकांना एकतर त्या जागी शिफ्ट होण्यास सांगितले होते. अथवा नोकरीस राजीनामा दिला आहे अशी सही लेखी स्वरूपात करून घेतली होती.

स्वरूप ला नीताच्या गरोदर अवस्थेमुळे दूरच्या शहरात जाणे योग्य वाटत नव्हते. परंतु नोकरी गेली हे कारण घरी सांगणे योग्य वाटत नव्हते. आहे त्या टायमिंगला घराबाहेर पडत स्वरूप नोकरीचा शोध घेऊ लागला. स्टोरी लिहिण्याचा त्याचा नित्यनेमाने प्रयत्न हा सुरूच होता. स्वरूप ला दुसऱ्या कंपनीत सुदैवाने नोकरी मिळाली.

स्वरूपने ही स्टोरी लिहून पूर्ण केली. टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ती डायरी ठेवून दिली.

अनेक विषयांवर आधारित लेखन करून स्वरूप आपल्या भावना शब्दात गुंफू लागला. आपण मनाला भावेल असे काम करत आहोत या आनंदात स्वरूप खुश होता. नातेवाईक, शेजारी पाजारी. स्वरूप ला दोष देत होते. एकुलता एक असून शिक्षण घेता आले नाही. चांगल्या पगाराची नोकरी देखील हाताशी नाही. कधी नोकरीवर काढून टाकतील याचा नेम देखील नाही. स्वरूप ने ही गोष्ट कोणालाच न सांगता सर्वांना कशी काय माहित झाली याचे कोडे समजत नव्हते. स्वरूपच्या ऑफिसमधल्या काम करणाऱ्या एका कलीगने ही बातमी चाळीतील लोकांच्या कानावर घातल्याचे समजते.

अंतिम भागात पाहूया स्वरुपाच्या वाट्याला नावलौकीक येईल की नाही?

0

🎭 Series Post

View all