चांगल्या गोष्टी पसरण्यासाठी वेळ लागतो हे जितकं खरं आहे तितकच वाईट गोष्टी वाऱ्यासारख्या सर्वांपर्यंत पोहोचत असतात. स्वरूपच्या घरच्यांना देखील समजते की स्वरूपची नोकरी जाऊन देखील तो घरात काहीच बोलला नाही. एकटाच ते दुःख भोगत इतरांना त्याची वाच्यता देखील केली नव्हती. दुसरा जॉब लागे तोपर्यंत कोणाला पहिल्या नोकरीबद्दल काहीच माहित नव्हते. या गोष्टीचा नीताला राग आला होता.
स्वरूप ला गोंडस मुलगा होतो. त्याचे नाव ओमकार ठेवण्यात येते. घरात सनई चौघडे वाजू लागतात. ओमकार च्या येण्याने स्वरूप ला कंपनीत बढती देखील मिळते.
ओमकार हा आपल्या जगण्याची, धैर्याची, शौर्याची शक्ती स्त्रोत आहे असे स्वरूप ला वाटत होते. स्वरूप अनेक डायरींचा संग्रह करत टेबलाखालच्या कपाटात आपल्या स्टोरी लिहून ठेवत असे.
आपल्या वडिलांना विचारले की यात खास असं काहीच नाही असंच उत्तर नेहमी ओंकारला मिळत गेले. ओमकार त्या कपाटाची अखेर चावी शोधून काढतो. आठवडाभर कामानिमित्त स्वरूप शहराबाहेर जातो. या संधीचा फायदा घेत ओमकार त्या किल्लीने ते कपाट उघडतो. कपाटात डायऱ्यांनी भरलेलं ग्रंथालय दिसते.
ओमकार आता शाळेत जाऊ लागला होता. खेळता खेळता त्याचे लक्ष टेबलाखालच्या कपाटाकडे जाते. त्या कपाटात काय आहे हे जाणून घ्यायचं प्रयत्न ओंकारचा सुरू असतो. घरातल्या मंडळींना विचारले तर कोणालाच या कपाटाची किल्ली माहित नसते.
ओमकार या घटनेविषयी कोणालाही न सांगता शाळेतल्या शिक्षकांना भेटून याबद्दल सांगतो. शिक्षक त्या डायऱ्या शाळेत घेऊन यायला सांगतात. डायरीवर प्रत्येक स्टोरी चे भाग अर्थपूर्ण लिहिलेले असतात. शिक्षकांच्या पसंतीस उतरतात.
पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सुरू होतो. त्यातला एक दोन घटना कार्यक्रमात नाट्य स्वरूपात सादर केले जातात. हे तर आपण लिहिलेल्या डायरीतल्या प्रसंगासारखाच आहे. शेवटी या पुस्तकाचे निर्माण करते म्हणून स्वरूप चे नाव घेण्यात येते.
स्वरूप ला होणारा आनंद शब्दात व्यक्त करता येत नव्हता. जे आजवर करू शकलो नाही ते ओमकार ने करून दाखवलं.
लहान असून देखील माझ्या जगण्याची उमेद म्हणून पंखात बळ भरले. असे स्वरूप सर्वांसमोर बोलतो. बोलता बोलता स्वरूप ला भरून येतं. आई-वडिलांकडे एक कटाक्ष टाकून जणू हे मी करून दाखवलं असं स्वरूप न बोलताच डोळ्यांनी बोलत होता.
कशी वाटली कथा मलिका कमेंट करुन नक्की सांगा.
समाप्त:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा