Login

दिलेसं तू जगण्याची उमेद भाग २

आपलं कार्य कोणत्या पद्धतीने समोर येईल याची शाश्वती देता येत नाही.

स्वरूप ला इतकी ताकद, सकारात्मकपणा मिळत होता तरी कुठून? याचे उत्तर आपल्या सर्वां जवळ आहे. फक्त आपलं त्याकडे लक्ष नाही. स्वरूपच्या पंखात इतका बळ कुठून येत असावं? अगदी सोपं आहे. ते म्हणजे आपल्या अंतर्मनात दडलेल्या आपल्याच आवाजाने स्वरूप ला नवी उमेद दिसत होती.

अनेकदा दुसरे कोणीतरी येऊन आपल्याला संकटातून बाहेर काढण्याचा मोलाचा उपदेश देईल, किंवा मार्गदर्शन करून आपल्याला योग्य उपाय सुचवेल. या आशेवर वाट बघत ती वेळ कधी उगवतच नाही.
स्वरूप ला दहावीत असताना उत्तम वर्ग शिक्षक लाभले. त्यांनी स्वरूप ला स्वतःच्या अंतर्मनात दडलेल्या मी शी ओळख करून दिली. सरांनी सांगितल्याप्रमाणे स्वतःचा लढा हा स्वतःच लढावा लागतो. युद्धात सैनिकांचे फौज बरोबर जरी असली तरी जो तो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. यामध्ये स्वतःचा जीव गमवावा लागल्यानंतर युद्ध करता स्वतःलाच उभे राहावे लागणार. अशावेळी सैनिकांची फौज देखील पाठीशी उभी असणार नाही. समोर येणाऱ्या प्रसंगाला जेव्हा स्वतः लढण्याची वेळ उद्भवते तेव्हा मात्र इतरांवर अवलंबून राहिल्यामुळे शत्रू निश्चितच विजय होईल.

स्वरूप एकुलता एक असल्याने त्याला डॉक्टर किंवा इंजिनियर बनवण्याचे आई-वडिलांचे स्वप्न अपूर्णच राहणार होते. कारण स्वरूप ला दहावीत जेमतेम ५५ टक्के मिळाले होते. एवढ्या कमी टक्क्यांमध्ये शास्त्र शाखेत प्रवेश मिळणे अशक्य होते. स्वरूपच्या सरांनी सांगितल्याप्रमाणे स्वरूप ला वाणिज्य शाखेत प्रवेश घेण्यात आला.

अकरावी बारावी फर्स्ट क्लास मिळवून स्वरूप पास झाला. पुढे ग्रॅज्युएशन करून बँकेच्या परीक्षा देण्याचा स्वरूप चा मानस होता. बँकेच्या परीक्षा देऊनही उत्तीर्ण न होता आल्यामुळे बँकेत भरती होण्याचा निर्णय अचूक ठरला. स्वरूपने कंपनीमध्ये अकाउंटची नोकरी करण्याचे ठरवले. स्वरूपचे इतर भावंड मात्र कोणी इंजिनियर तर कोणी डॉक्टर झाले. स्वरूपच्या आई-वडिलांना आपल्या मुलाने आपली मान खाली घातली असे सतत वाटत होते.

स्वरूपचे लग्न लावून देण्याचा निर्णय आई-वडिलांनी घेतला. नीता आपल्या घराण्यात शोभून दिसेल अशी मुलगी आहे. माधवरावांच्या मित्राची मुलगी असल्यामुळे घरच्यांच्या पाहण्यातली नीता आधीपासूनच होती. घरच्यांची पसंत तीच आपली पसंत म्हणत स्वरूपने लग्नाला मान्यता दिली. 

नीता उच्चशिक्षित होती. ती कॉलेजमध्ये प्रोफेसर ची नोकरी करत होती. योग्य वयात लग्न झाले ती चांगली असते या घरच्यांच्या मतावर दुजोरा देत नीता लग्नाच्या बोहल्यावर चढायला तयार होते. स्वरूपच्या घरी जाणे येणे असल्याने स्वरूप चे शिक्षण जरी कमी असले तरी त्याचा स्वभाव, नम्रपणे सर्वांशी वागणे नीताला विशेष भावत होते. स्वरूप ला नकार देण्यात कोणतेच कारण समोर दिसत नव्हते.स्वरूप आणि नीता चा सुखाने संसार सुरू झाला.

या संसारामध्ये कोणत्या घटना घडत जातात ते आपण पुढच्या भागात पाहूया.

0

🎭 Series Post

View all