Login

DINK भाग 4

संघर्ष एका मुलं जन्माला घालण्याची इच्छा नसलेल्या स्त्री चा. तिच्या प्रियकर ते जीवनसाथी होऊ पाहणाऱ्या त्याचा.

दीर्घकथा लेखन स्पर्धा

DINK भाग 4

"मॅम, तो माणुस खूप तेढा आहे." पिहूची असिस्टंट गार्गी तिला सांगू लागली, "नुसता फिरवतोय. आपणही सरळ सरळ त्याच्याशी बोलू शकत नाही आहे. आपले नाव खराब होऊ शकते. त्यात त्यांनी हा कॉन्ट्रॅक्ट दिला तर आपल्याला फार मोठा फायदा होईल तसेच त्याच्या संपर्कात मोठ मोठ्या हस्ती असल्यामुळे त्याच्या पाठोपाठ बरेच कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळू शकतात म्हणून बॉसचे म्हणणे आहे की काहीही करून आपल्याला त्याच्याकडून कराल साइन करून घ्यायचा आहे."

" ठीक आहे मी बघते त्याच्याशी बोलून त्याचे काय करायचे ते. " पिहूने गार्गीला आश्वासन दिले.

"काही लोकांना स्वतःबद्दल कमालीचा आत्मविश्वास असतो हा गार्गी." मुंबई हेड ऑफिसची मार्केटिंग हेड रिद्धीने पिहूला टोमणा मारला.

"मॅम काय म्हणाला तुम्ही?" गार्गीने ऐकून न ऐकल्यासारखे केले.

"जाऊदे तुही तिची चेली आहेस." रिद्धी बोलली.

"रिद्धी मॅम तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर माझ्याशी बोला ना. तिला तिचे काम करू द्या प्लिज." पिऊनी गार्गी ला तिथून जाण्याचा इशारा केला.

" मग आता सरळच सांगते पिऊ तुला. मला तुझ्या वैयक्तिक आयुष्यात काहीच रस नाही आहे. तू लग्न कर नको करू कोणासोबत रिलेशनशिप मध्ये राहा काहीही कर मात्र त्यामुळे या कंपनीच्या रेप्युटेशनवर कोणी बोट उचलायला नको. बाकी तू समजदार आहेस मी कशाबद्दल बोलत आहे ते समजायला. " रिद्धी संतापून बोलली.

"तुम्ही निश्चिन्त रहा. ते मॅटर आज संध्याकाळी सॉल्व होऊन जाईल." पिहूने तिला आश्वासन दिले.

" आशा तर तीच आहे पण जरा का चुकी झाली तर डिमोशन साठी तयार राहा." रिद्धीने तिला धमकी भरल्या आवाजात सांगितले.

" तशी वेळ येणार नाही त्याआधी मीच राजीनामा देऊन मोकळी होईल. " पिहू हसून बोलली.

"हम्म तेच छान होईल." रिद्धीही खोटं खोटं हसून तिथून चालती झाली.

पिहू मनातल्या मनात येणाऱ्या क्लाइंटला कशाप्रकारे हाताळावे, त्यांनी ट्रेनमधील त्या घटने विषयी विचारल्यास त्याला पटणार अशा भाषेत काय उत्तर द्यावे? या प्रश्नांच्या उत्तराची जुळवाजुळव करू लागली. मोबाईल हातात घेतला तर तेच मेसेजेस, नोटिफिकेशन. तिने मोबाईल बाजूला ठेवून दिला. लॅपटॉपवरही काहीच लिहू वाटेना. तिला तेजसची डायरी आठवली. तिने डायरी घेऊन त्यात तिच्या मनातील मुद्दे लिहून काढले. कोणत्या प्रश्नाला काय उत्तर द्यायचे याची उजळणी केली. वॉशरूम मध्ये आरशासमोर उभे राहून आत्मविश्वासाने बोलायचा सरावही केला. तिच्यामुळे होत असलेल्या सर्व गोंधळातून निघण्यासाठी व कंपनी तिचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी तिला या क्लाइंट कडून कॉन्ट्रॅक्ट कोणत्याही किमतीवर आज सही करून घ्यायचाच होता.

पिहू थोडंफार खाऊन मीटिंगरूम मध्ये क्लाइंटची वाट पाहत बसली. काही वेळातच दिल्लीचे प्रसिद्ध बिल्डर श्री मुंदडा त्यांच्या सेक्रेटरी सोबत रिद्धी मागोमाग मीटिंग रूमच्या आत आले. श्री मुंदडा पहिल्यांदाच महाराष्ट्रात नवी मुंबईमध्ये त्यांचा एक मोठा प्रोजेक्ट लॉन्च करणार होते म्हणून त्यांना एका महाराष्ट्रीयन जाहिरात कंपनीत सोबत त्यांच्या प्रोजेक्टच्या जाहिरातीचा करार करायचा होता.

"ही आमची होनहार मार्केटिंगमध्ये विशेष टॅलेंट असलेली मिस पिहू." रिद्धीने त्यांच्याशी तुमची ओळख करून दिली, " पुढील सर्व व्यवहार तुम्ही याच्याशीच करणार आहात ही तुमच्या सर्व शंका कुशंकांचे निरासरण करेल व  तुम्हाला अजिबात निराश करणार नाही. "

पिहूने फक्त चेहऱ्यावर हलके हसू आणले.
"छान छान." श्री परांजपे म्हणाले, " मला फक्त माझ्या सर्व प्रश्नांची उत्तर हवे आहे ते मिळतात मीही पटकन कॉन्ट्रॅक्ट पेपर सही करून मोकळा होईल. "

" हो सर मला ते समजलेच म्हणून आम्ही विशेष आमच्या अव्वल एम्प्लॉईला इथे आणले आहे. तुम्ही बसून चर्चा करा. मी येतेच. " इतके बोलून रिद्धी पिहू कडे वळून म्हणाली, " सरांचे लक्ष ठेव. त्यांना काय हवे नको ते सर्व बघ. काही लागले तर गार्गीला सांग. "

पिहूने परत चेहऱ्यावर स्मित पसरवले.

क्रमश :

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"