Login

DINK भाग 6

ओळख एका नव्या विचार शैलीची, त्यातील चॅलेंजेसची.
दीर्घकथा लेखन स्पर्धा

DINK भाग 6

"सर हे तेच प्रसिद्ध वकील ज्यांनी आपल्या मंत्री साहेबांच्या जमिनीचा विवाद सोडवला आणि आपले काकाश्री आहेत ना त्यांच्या मुलाची मानहानीची केसही यांनीच लढली व जिंकलेही." श्री परांजपेच्या असिस्टंटने त्यांना तेजसची माहिती देत त्यांच्या कानात कुजबुजला, "सध्याच्या घडीला यांनी ज्या केसला हात लावला त्या केसला कोणताच वकील कोर्टात नेत नाही."

"अच्छा!" श्री परांजपेच्या तोंडून उद्गार बाहेर पडले.

"नमस्कार सर." तेजस हात जोडून म्हणाला, "आता आत बसून बोलायचं?"

"एक मिनिट. बेशक तुम्ही नामवंत वकील आहात " रिद्धीने त्याला अडवले, "पण मला तुम्ही पिहूची केस लढणार अशी काहीच माहिती कोणी दिली नाही."

"ते मी कसा सांगणार? मला स्वतःला सकाळीच कस्तुरी मीडियाच्या डायरेक्टर मिसेस कस्तुरीच्या असिस्टंटने फोन करून मिस पिहूची केस घ्यायची विनंती केलेली." तेजस रिद्धीला म्हणाला.

"मला कॉल आला होता एक वकील येतील म्हणून." पिहू बोलली, "तो वकील तुम्ही असणार हे माहित नव्हतं."

"मॅम, कस्तुरी मॅमचा ईमेल आला आहे." रिद्धीच्या असिस्टंटने तिला ईमेल दाखवला.

"ठीक आहे. बघा काय करू शकता ते. मी जाते माझी बरीच कामं पेंडिंग आहेत." रिद्धीने जरा खट्टू चेहऱ्यानेच त्यांचा निरोप घेतला.

तेजसच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पसरले.
"मिस्टर परांजपे तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझा शब्द आहे. तुम्ही कस्तुरी सोबत जुळून फायद्यातच राहणार." तेजस परांजपेला आत्मविश्वासाने बोलला.

"ठीक आहे. तुझ्यावर विश्वास ठेऊन मी कॉन्ट्रॅक्ट पेपर सही करतोय. पण हे पेपर माझ्या ताब्यातच राहणार व उद्या सकाळ पर्यंत यांच्या बद्दल सकारात्मक बातमी नाही आली तर हे कॉन्ट्रॅक्ट पेपर आमच्या बंगल्यातील चुलीत जळून राख होतील." श्री परांजपे मिश्किल हसले.

"नक्कीच सर." तेजस प्रसन्न चेहऱ्याने बोलला.

पिहू शांतच. श्री परांजपे आपल्या असिस्टंट सह गेले तसे पिहूने तेजसला विचारलं,
"कुठून सुरवात करायची?"

"कशाची?" तेजसने अनाहुतपने प्रश्न केला.

"केस बद्दलच्या वाटाघाटीची. आणखी कशाची? थोड्या वेळात पत्रकार येतील. त्या आधी तुला काही प्रश्न असतील ते विचारून घे. म्हणजे तुझे मॅटर बनवायला तु मोकळा." पिहू एका दमात बोलली.

"हो हो तेही करूच पण त्याआधी काहीतरी खायला हवं. मी सकाळी एका क्लाईंटला भेटून इकडे आलो आहे. मला नाश्ता करायलाही वेळ मिळाला नाही." तेजसने स्पष्टीकरण दिले.

"चालेल. मी आमच्या कॅन्टीनचा मेनू पाठवला आहे. सांगा काय खाणार." पिहूने त्याला विचारलं.

"मी एकटाच कसा खाणार? म्हणजे तु फक्त माझ्याकडे पाहणार आणि मी खाणार हे ठीक नाही वाटत मला." तो बोलला.

"ठीक आहे मग मी माझं इतर काही काम निपटावून येते." पिहू म्हणाली.

"पण मग घटनाक्रम कोण सांगणार मला. साडेतीन वाजायला आले आहेत. जास्त वेळ वाचला नाही पत्रकार यायला." तेजस बोलला.

"तुमची इच्छा काय आहे मिस्टर तेजस?" पिहूने चिडून त्याला विचारलं.

"माझी इच्छा आहे कि तुही माझ्यासोबत थोडं जेवण करावं आणि त्यासोबतच तुझी बाजू मला सांगावी." तेजस सौम्यपने उत्तरला.

"ठीक आहे." दोघेही जेवायला बसले. पिहूने झालेला किस्सा त्याला सविस्तर सांगितला.

"अच्छा असे झाले तर." पाण्याचा घोट घेऊन त्याने पिहूला सांगितले, "आता मी जे काही तुला सांगणार ते आणि तसेच पत्रकार मंडळी समोर बोलायचे. बाकी मी सांभाळून घेईल."

"तु सांगितलेलं मला पटल्यास नक्कीच बोलणार, नाहीतर मी आपल्या अनुषंगाने बोलेल." पिहू म्हणाली.

तेजसला तिचा हा अटीट्युड आवडला नाही तरीही त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही कारण त्याला माहित होतं कि तो एका इंडिपेंडेन्ट स्त्री सोबत डील करतोय तेव्हा ती सहजा सहजी त्याचे ऐकणार नाही.

ठरल्या प्रमाणे चार वाजता पत्रकार आले. प्रश्न उत्तर सुरु झाले.
"मॅम तुम्ही एक स्त्री असूनही दुसऱ्या स्त्री ची समस्या समजून घेतली नाही वर मान करून मी काहीच चुकीचं केलं नाही असा दावाही करत आहात. यावर तुम्हाला काय म्हणायचे आहे?" एका पत्रकाराने विचारलं.

"मला सांगा. रस्त्यावर असंख्य भिकारी असतात. तुम्ही किती वेळा त्यांना भीक घालता?" पिहूने उलट प्रश्न केला.

तेजसने चमकून तिच्याकडे बघितलं.

"इथे भिकारीचा संबंध कुठून आला आहे? कुठली गोष्ट कुठे नेऊ नका." पत्रकारंचा एकच गलका झाला.

क्रमश :

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"