दीर्घकथा लेखन स्पर्धा
DINK भाग 7
" शांत व्हा शांत व्हा प्लीज शांत व्हा. " तेजसने टेबलवर हात मारून सर्वांना शांत होण्याची विनंती केली, " तुम्ही शांत बसणार तेव्हाच मी पिऊ काही बोलू शकणार. "
सर्व शांत झाले.
सर्व शांत झाले.
"मिस पिहूला म्हणायचे आहे की जसं आपण काही दिवसांनी भिकाऱ्याला पैसे देणे सोडून कामधंदा कर असे बोलतो अगदी तसेच तिने त्या मॅडमला थोडा वेळ स्वतःची जागा दिल्यावर आपली जागा परत मागितली व त्यांच्या बाळाला त्यांनी आपल्या परीने हॅन्डल करायची विनंती केली. बरोबर ना मिस पिहू." तेजसने पिहूकडे बघितले.
"अगदी बरोबर." पिहू आत्मविश्वासाने बोलू लागली, "मात्र त्या मलाच अद्वातद्वा बोलू लागल्या. इतकेच नाही त्याच्याकडून ट्रेनमधील आणखी काही व्यक्ती व त्यांची बहीण बोलायला आली ज्याने मला मानसिकरित्या फार त्रास झाला. माझी मानसिक खच्चीकरण झाले. मी तीन दिवस माझा फोन स्विच ऑफ करून होती. माझ्या मनात स्वतः विषय बरेच वाईट विचारही आले. सोशल मीडियावर माझ्या मर्जी शिवाय माझा व्हिडिओ टाकला गेला, माझ्याविषयी बरेच मेम्ससही बनवण्यात आले. माझ्या घरच्यांना नको नको त्या प्रश्नांना सामोरे जावे लागले. म्हणून मी त्या मॅडम वर मानहानीचा दावा टाकणार आहे. तुम्हीच सांगा चुकलं काय होतं माझं? जगात कितीतरी अशी मंडळी आहे ज्यांना आपल्याला काय हवं याचा विचार करून ते आधीच रेल्वे, फ्लाईट, जहाज यांचे तिकीट बुक करतात आणि वेळेवर कुणीतरी अशी व्यक्ती तुम्हाला म्हणेल की त्यांच्या मुलांसाठी तुम्ही तुमची सीट देऊन द्या. का द्यायची? मग सरकारने जी रिझर्वेशनची व्यवस्था केली आहे ती फालतुगिरी आहे का? किंवा रिझर्वेशन करताना आम्ही जो एक्स्ट्रा पैसा देतो तो आमच्याकडे असाच आला आहे असे समजावे का?"
"तुमच्या सारखा विचार केला तर सहिष्णूता संपुष्टात यायची जगातून. ज्यांच्याकडे जास्त आहे त्यांनी द्यायचे असते." एक पत्रकार म्हणाला.
" अच्छा आणि समोरच्याने घेता घेता देणाऱ्याचे हात ओढून घ्यायचे असते? " पिहुने परत त्याला प्रतिप्रश्न केला, " मी थोडा वेळ बसू दिले होते त्यांना. त्या शांत बसल्या असत्या तर होऊ शकतं काही वेळानी पुन्हा त्यांना बसू दिले असते. मात्र त्यांनी ते लक्षात न घेता माझाच व्हिडिओ बनवून टाकला. माझा संपूर्ण प्रवास एका वाईट घटनेत परिवर्तित झाला. कष्टाने जीवन जगणारी एक इंडिपेंडेंट स्त्री आहे मी. कार्पोरेट जगत मध्ये माझे एक नाव आहे. कस्तुरी सारख्या प्रतिष्ठित जाहिरात कंपनीचा चेहरा आहे मी. तुम्ही विचार नाही करू शकत इतका दबाव आहे माझ्यावर. "
"तुम्ही तुमच्या इंडिपेंडेन्टपणाला फार ग्लोरीफाय करताय असं नाही वाटत तुम्हाला?" पत्रकार
" माझ्याजवळ आहे म्हणून मी करते आहे. तुमच्याकडे जवळ असते तर तुम्हीही केले असते. " पिहूचे उत्तर.
" मी कधी विचार केला आहे, एक दिवस जेव्हा तुमचे स्वतःचे मुल असेल, तुमच्यावर असा प्रसंग आला तर? " पत्रकार.
"माझी प्रत्येक गोष्ट ही पंधरा दिवस पूर्व योजनाबद्ध चालते. तेव्हा माझ्यावर असा प्रसंग कधी येणारच नाही तरीही तुमच्या म्हणण्याप्रमाणे आलाच तर मी कोणाकडे पदर न पसरवता तो प्रसंग निभावून नेण्या इतपत सक्षम आहे." पिहूचे उत्तर.
"तुम्ही तुमची वयाची पस्तीशी पार केली आहे तेव्हा लग्न व मुलबाळ कधी करणार आहात?" एक पत्रकार.
"कधीच नाही. नो हेट, पण मला या दोन्हीही गोष्टीत अजिबात रस नाही आहे." पिहू
"काही विशेष कारण?" पत्रकार.
" या प्रश्नाचे सध्या परिस्थितीशी काही संबंध नाही. तेव्हा मिस पिहू उत्तर देण्यासाठी बाध्य नाहीत." तेजस बोलला.
"संबंध आहे सर, असं बोललं जात आहे की मिस पिहूला लहान मुलं मुळीच आवडत नाहीत म्हणून या प्रश्नाचे उत्तर त्यांनी देणे फार गरजेचे आहे." पत्रकार.
" मला फक्त माझ्यासाठी जगायचे आहे. मुलबाळ होणे म्हणजे आपले अर्धे आयुष्य त्यांना देणे. आधीच वयाची वीस पंचवीस वर्ष आई-वडिलांचे ऐकता ऐकता गेली आहेत. आणखी पुढील वीस पंचवीस वर्ष मुलाचे आणि नवऱ्याचे ऐकण्यात घालवण्याची मला इच्छा नाही. " पिहूचे उत्तर ऐकून एक तरुण पत्रकार उभी होऊन म्हणाली,
"मुद्दा बरोबर आहे तुमचा पण असाच विचार सर्व स्त्रियांनी केला तर आपल्या देशातील कुटुंब व्यवस्था ढासळणार नाही का?"
"तुम्हाला वाटतं सर्वच स्त्रिया हा असा निर्णय घेऊ शकतील?" पिहूच्या या प्रश्नाने हॉल मधील सर्व चिडीचूप बसली, "पाच टक्केही नाही."
"मी तुमच्या सर्व प्रश्नांना उत्तरं दिले आहेत. आशा आहे आपण माझा मुद्दा समजला असणार. सर्वांनी चहापाणी घेऊन जावे अशी विनंती. " इतकं बोलून पिहू हॉल मधून बाहेर पडली.
क्रमश :
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
धन्यवाद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा