Login

DINK भाग 8

तिचा प्रवास स्त्री ची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा, स्वतःच्या आयुष्याला आपल्या तत्वावर जगण्याचा
दीर्घकथा लेखन स्पर्धा

DINK भाग 8

संध्याकाळच्या वृत्तपत्रात तसेच इतर सर्व ऑनलाईन माध्यमात पिहूची मुलाखत झलकळी. विविध इंफ्लूएन्सर त्यांचे अशा प्रकारचे अनुभव सांगून तिच्या बाजूने त्यांचे विचार मांडू लागले. तिला समर्थन द्यायला काही संस्थाही सरसवल्या.

"मुलं महत्वाची आहेतच पण तुम्हाला ती सांभाळण्या इतपत अक्कल नसताना जन्माला का घालावी?"

"आपल्या खांद्यावरिल ओझं इतरांच्या खांद्यावर टाकून कसे चालेल?"

" कोणी प्रवाशी तुमच्या मुलासाठी त्यांची सीट सोडाणार असे गृहीत धरणे अगदी चुकीचे."

"पिहूने तिची सीट पूर्णवेळ स्वातीला वापरू दिली नाही म्हणून तिचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर तिची बदनामी केली गेली असे वर्तन म्हणजे दुराचार नाहीतर काय?"

अशी मत मतांतरे बोलल्या जाऊ लागली. मुंबईचीच रहिवासी असलेल्या स्वाती व हर्षाला आता त्यांच्या करनीचा पश्चाताप होऊ लागला कारण पत्रकार आता तिच्या मागे लागले. तिच्यावर न्यायालयात मानहानीचा खटला दाखल होईल हे ऐकून तिच्या कुटुंबातील सदस्य पिहू सोबत बोलून, तिची माफी मागून, तिला हे प्रकरण लवकरात लवकर मिटवण्यासाठी तिच्यावर दबाव आणू लागले. तिला आताही तिच्या वागण्यात काही चुकलं आहे असं वाटत नव्हतं पण कुटुंबियांच्या बोलन्यांमुळे ती त्रस्त झाली. तेव्हा हर्षा व तिने कस्तुरीच्या ऑफिसला जाऊन पिहूची माफी मागून कोर्टात केस दाखल न करण्याची विनंती केली. परंतु पिहू तिला म्हणाली,

"जेव्हा तिची नामुष्की ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर करण्यात आली तेव्हा माफी सुद्धा जग जाहीर पद्धतीने ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरच मागायला हवी. म्हणजे तिला घेऊन तिच्या कंपनीचे जे नाव खराब झाले ते सुधरेल."

स्वातीने नकार दिला. मात्र तिची बहीण हर्षा हुशार होती. तिने पिहूला तिच्याशी प्रेमाने बोलायची विनंती केली.

"तुम्ही सुशिक्षित आहात. एका मोठ्या पोस्टवर काम करून बक्कळ पैसा कमावता. लग्न मुलबाळ असतांना दिवसाला दोन क्षण शांत मिळवण्यासाठी जी धडपड आम्हा मध्यम वर्गीय स्त्रियांना करावी लागते ती तुमच्या वाट्याला नाही येत." हर्षा तिची व तिच्या बहिणीची कर्म कहाणी पिहूला सांगू लागली, मात्र चित्र पिहूच्या डोळ्यासमोर तरळू लागले. तिच्या आईची ऑफिसला जायची लगबग, सर्वांचा स्वयंपाक करून, सर्वांना नाश्ता खाऊ घालून स्वतः मात्र चवही न घेता उपाशी पोटी घराबाहेर पडणे, त्यातही मुलाला ड्रायव्हर बनवले असे आजीचे टोमणे, आजोबाचे खुर्चीत बसून हुकूम सोडणे, बाबाचे मुकाट बसने, आईचा सर्व राग पिहू व तिच्या भावाला मारण्यात निघने.

"मॅम तुम्ही ऐकत आहात ना?" हर्षाने पिहूच्या खांद्याला हात लावून विचारलं, "स्वाती, माझी लहान बहीण, बाळ झाल्यावर फार चिडचिडी झालेली. आपल्याकडे फक्त सव्वा महिना बाळंत बाईला आराम तेही ती माहेरी असेल आणि सासरी मंडळी व्यवस्थित असतील तर. नाहीतर काही खरं नाही. त्यात हे असे कर, ते तसे कर आणि शब्दा शब्दात आईचा उध्दार करणारीच जास्त. तिला तिच्या घराच्या किटकिट मधून जरा विसावा मिळावा म्हणून तिच्या सासूबाईच्या खूप विनवण्या करून मी तिला मोकळ्या हवेत फिरायला घेऊन जाण्याच्या उद्देशाने गोव्याला घेऊन गेले. रेल्वेत तुम्ही भेटलात. इशू झाला. काय करणार लहानपनापासून शिकवण मिळालेली कि आईपण सगळ्यात महत्वाचे. पण तुम्ही वेगळ्या विचाराच्या. तुमचा राग राग झाला. स्वातीला चांगले वाटावे म्हणून मी तुमचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला. तेव्हा आम्हाला माहित नव्हतं कि इशू इतका मोठा होईल. रात गई बात गई या उक्ती प्रमाणे लोकं जसं इतर गोष्टी विसरतात तसेच हेही विसरतील. पण झालं उलटंच. आता सगळं तुमच्या हातात आहे. स्वातीने तिचा गुन्हा कबूल केला तर जन्मभर तिचे सासू सासरे तिला टोमणे मारतील. तिचे जगणे हराम करतील."

"पण माझ्याकडेही दुसरा पर्याय नाही. तरीही मी सांगते तसे बोललात तर तुमच्या बहिणीविषयी वाईट संदेश जाणार नाही आणि लोकांना तिच्या विषयी सहानुभूती वाटेल याची हमी मी तुला देते." पिहूने हर्षाला बोलण्यासाठी काही ओळी लिहून दिल्या.

"मी एक सामान्य स्त्री. आपल्या समाजाला एक थोतांड वाटणाऱ्या पोस्ट पार्टम डिप्रेशनमध्ये गेल्यामुळे काही दिवसांपासून माझा स्वतःवर ताबा उरला नाही. खूप मूड बदलतो. यातच तो पिहू मॅम सोबतचा रेल्वेतील प्रसंग घडला. त्यावेळी जे सुचलं ते केलं, त्याने पिहू मॅमला इतका त्रास होईल अशी कल्पना मला नव्हती. तरीही त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून मला क्षमा करावी अशी विनंती."

क्रमश :

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

धन्यवाद.
0

🎭 Series Post

View all