दीर्घकथा लेखन स्पर्धा
DINK भाग 9
"थँक्यू." व्हिडिओ क्लिप संपल्यावर स्वाती बाजूला जाऊन बसली.
"मिस पिहू थँक्यू, मला व माझ्या बहिणीला समजून घेतल्याबद्दल." हर्षा पिहूला म्हणाली.
"हम्म!" पिहूला खूप काही बोलायचं मन होतं पण प्रत्यक्षात ती काहीच बोलू शकली नाही.
"पैसा खरंच माणसाला हिम्मतवान बनवतो." हर्षाच बोलली.
"अगदी खरं आहे आणि म्हणूनच आजच्या काळात तरी प्रत्येक स्त्रीला पैसे कमवायची अक्कल असायलाच हवी." पिहू स्वतःला थांबवू शकली नाही, " तुझ्या बहिणीला समजावून सांग. आपण सहन करतो तेव्हा पर्यंत सर्वच आपल्याला गृहीत धरून चालतात. त्यांना वाटतं हिला काहीही बोललं, काही म्हटलं तरी काहीच फरक पडणार नाही. तेव्हा आपल्याला काही पटत नसेल, दुखत असेल खूपत असेल तर ते त्यांना बोलून दाखवायचं. सांगायचं त्रास होतो. स्त्रिया आतल्या आत स्वतःच्या आत सर्व साठवून ठेवतात आणि ज्या पोटच्या गोळ्यांवर सर्वात जास्त प्रेम करण्याचा दावा करतात, पुढे त्यांच्यावरच सगळा राग काढतात. तेव्हा आतापासूनच बोलायला शिकलेलं बरं तेव्हा कुठे ती तिच्या मुलीला तिच्यापेक्षा चांगले आयुष्य देऊ शकेल. "
"हो मी बोलते तिच्याशी." हर्षाने आश्वासन दिले मग जराशा संकोचानेच तिने पिहूला विचारले, "हे पोस्ट पार्टम डिप्रेशन नेमकं काय असतं? म्हणजे मी गुगल केलं. पण त्यात खूप भयानक लिहिले आहे. ते सर्व खरंच असतं का? आणि असेल तर माझ्या बाबतित असं काहीच का घडलं नाही?"
"कारण तुझे हार्मोन्स नियमित असतील. खूप वेगवेगळी कारणं असतात यामागे. मलाही फक्त इतकंच माहित आहे कि कित्येकदा हे अदृश्य पोस्ट पार्टम डिप्रेशन स्त्रियांना त्यांच्याच मुलांचे शत्रू बनवते, अशात स्त्रिया फक्त आपल्या लहानग्या मुलांना अदवा तद्वा बोलतच नाहीत तर त्यांना मारहाणही करतात किंवा स्वतः आत्महत्या करायचा टोकाचा निर्णय घेतात. वेळेवर उपचार मिळाले नाहीत घरच्यांनी बाळंतीणकडे लक्ष दिले नाही तर स्त्री ची मानसिक कुचंबना होऊन परिणाम फार वाईट घडतात. तुझी बहीण स्वाती त्यातूनच जाते आहे असा माझा अंदाज आहे. तिला चांगल्या गायनाकॉलॉजिस्टला दाखव बस इतकंच सांगू शकते मी." पिहूने माहिती पुरवली.
"ओके ओके, तुम्ही सांगितले तसे डॉक्टरकडे घेऊन जाईल मी स्वातीला." हर्षा हात जोडून परत एकदा पिहूला धन्यवाद बोलून निघून गेली.
स्वातीची व्हिडीओ क्लिप लवकरच सोशल मीडिया पासून ते इतर सर्व माध्यमांमध्ये वायरल झाली. पिहू वरिल डाग पुसला गेला त्याचबरोबर स्वाती बद्दलही लोकांमध्ये सहानुभूती निर्माण झाली. बाळंतपणानंतर बहुतांश स्त्रियांना सामोरे जावे लागणाऱ्या पोस्ट पार्टम डिप्रेशन बद्दल चर्चा उधाणाला आल्या. दोन दिवसांनी हर्षाने परत एक क्लिप पोस्ट केली. त्यात तिने सांगितले की,
"पिहू मॅम मी तुमची खूप खूप आभारी आहे. तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी स्वातीला डॉक्टरला दाखवले. घरी आल्यावर माझी बहीण ढसाढसा रडली. तिच्या नवऱ्याला, सासूबाई सासरे सर्वांना तिने तिला काय काय त्रास होतो ते सांगितले. कमीतकमी ती मंडळी आता थोडी व्यवस्थित राहणार, तिला पाठिंबा देणार अशी आम्हाला आशा आहे. फक्त एक विनंती तुम्हाला आहे या पोस्ट पार्टम डिप्रेशन बद्दल आणखी काही उपाय योजना करता येईल तर पाहा."
पिहू आणखी प्रसिद्ध झाली. एका रात्रीत इंस्टाग्राम, लिंकडेन, ट्विटर सारख्या सोशल मीडिया साइटवर तिचे वन मिलियन पेक्षा जास्त फॉलोवर्स वाढले. मिस्टर परांजपेने एक सोडून मुंबईतील त्यांच्या सर्व प्रोजेक्ट ची मार्केटिंग कस्तुरी जाहिरात कंपनी करणार अशी पोस्ट त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर टाकली. पिहूला तिचे यश सेलिब्रेट करण्यासाठी फोनवर फोन येऊ लागले. मात्र मोबाईल सायलेंट मोडवर टाकून, ती हॉटेल ताजच्या तिच्या खोलीच्या गॅलरीत बसून, एक एक घोट फ्रुट वाईनचा गळ्याखाली रिचवत, अरबी समुद्राच्या लाटांना पाहत गाणं गुणगुनु लागली,
" घनरानी घनरानी साजना
मी कशी तुझ्यासवे चुकली वाट रे
सांग ना....
घनरानी घनरानी साजना. "
मी कशी तुझ्यासवे चुकली वाट रे
सांग ना....
घनरानी घनरानी साजना. "
क्रमश :
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
धन्यवाद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा