दीर्घकथा लेखन स्पर्धा
DINK भाग 10
मुंबई ऑफिसमध्ये पिहूचा आज शेवटचा दिवस. ऑफिस मधील काम आवरून संध्याकाळच्या फ्लाईटने ती पुणे ला जाणार म्हणून हॉटेल मधून चेक आउट करूनच ती ऑफिसला गेली. सर्वांनी तिचे अभिनंदन केले. जनरल मॅनेजरने तिला केबिनमध्ये बोलवून शाबासकी दिली. फक्त रिद्धी तेवढी तिच्या नजरेस पडली नाही. ती तिच्या केबिनमध्ये तिचे कागदपत्र नीट ठेवत असतानाच थकलेल्या चेहऱ्याची रिद्धी तिच्या दृष्टीस पडली. पियू तिच्याकडे पाहते हे लक्षात येताच तिला मदत करत असलेली गार्गी तिला सांगू लागली,
" तुम्हाला माहित आहे काल रात्री काय झालं? "
" तुम्हाला माहित आहे काल रात्री काय झालं? "
पिहूने नकारार्थी मान हलवली.
" या महिन्याचे टार्गेट पूर्ण झाले म्हणून काल रात्री जनरल मॅनेजरने आम्हाला पार्टी दिली. तुम्हालाही त्यांनी बरेच फोन केले पण तुम्ही आल्या नाही. तिथे या रिद्धी मॅडमने वाईनचा एकच घोट घेतला आणि सर्वांसमोर भळभळ उलटी केली. शी आमचा तर मूडच गेला होता."
"मग डॉक्टरकडे घेऊन गेले का तुम्ही तिला?" पिहूने काळजीने विचारले.
"आम्ही म्हटलं तिला चल डॉक्टरला दाखवायला मात्र तिने ऐकले नाही. फूड पॉयझन झाले म्हणाली. पण आपल्याला माहित असताना की आपली तब्येत बरोबर नाही मी म्हणते कशालाच वाइन घ्यावी? इतके छान छान ज्यूस होते ना तिथे, मॉकटेल, कॉकटेल. नाहीतर एक दिवस पार्टी चुकवून घरी बसलं तर काय होतं? पण नाही मॅडमला ऑफिसमध्ये काय सुरू आहे काय नाही सगळ्यांचीच खबर हवी असते. तिच्या हाताखाली काम करणारी मंडळी तर म्हणते हिला हिच्या पुढे कोणी गेलेलं चालत नाही म्हणूनही सर्वांच्या हालचालींवर नजर ठेवून असते. तिकडे हिचा नवरा मागील दोन तीन वर्षांपासून फॅमिली प्लॅनिंगच्या मागे लागला आहे आणि ही बाई एकही पार्टी चुकवत नाही. कशी प्रेग्नेंट होईल ही? आणि प्रेग्नेंट झाली तरीही गर्भ किती दिवस टिकणार काय माहित?" गार्गी बोलण्याच्या ओघात बरंच काही बोलून गेली. पिहूने तिच्यावर डोळे वटारले.
"सॉरी मी जरा जास्तच बोलली. मी माझ्या फाईल्स व्यवस्थित ठेवून येते." गार्गीने लगेच तिथून काढता पाय घेतला. तिला माहीत होतं की पिहूला असल्या प्रकारच्या गॉसिप्स तिच्या समोर केलेल्या अजिबात आवडत नव्हत्या.
तिने परत एकदा रिद्धीच्या केबिनकडे बघितले. रिद्धी तिथे दिसली नाही. कारण ती तिच्यासमोर उभी होती,
"अभिनंदन." रिद्धी शेकहॅन्ड करायला पिहू समोर हात करून बोलली.
"धन्यवाद ." पिहू तिचा हात हातात घेऊन तिला म्हणाली.
" शेवटी मिशन पूर्णत्वाला नेलेस तू तुझे. मानले पाहिजे तुला. पण एक लक्षात ठेव मुंबईची जनरल मॅनेजरची पोस्ट फक्त माझी आहे. " रिद्धी तिला म्हणाली.
"ते वेळ ठरवेल." पिहू बोलली. तिला पुढे बोला वाटले की आधी तू तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे. मात्र याने रिद्धी आणखीन चिडणार, गार्गीवर राग धरणार म्हणून ती फक्त इतकंच म्हणाली, "डू युवर बेस्ट."
"यु टू." दोघींचे हात सुटले आणि त्या विरुद्ध दिशेने चालू लागल्या. सहा वर्ष आधी कस्तुरीमध्ये दोघीही सोबतच असिस्टंट मार्केटिंग मॅनेजर या पदावर रुजू झाल्या होत्या. त्यांचे खूप छान जमायचे. पार्टी, शॉपिंग, पिकनिक कुठेही जायचे असो त्या दोघी सोबतच दिसायच्या. दोघीही त्यांच्या तिशीत तरीही अविवाहित आणि बॉयफ्रेंडचा पत्ता नाही म्हणून काही कलिग (सहकर्मचारी ) त्या दोघींना लेस्बियनचा टॅग लावून मोकळे झालेले. मात्र एके दिवशी रिद्धीने तिचे प्लॅटिनमची कपल रिंग घातलेले बोट दाखवून ती तिच्या बेस्ट फ्रेंड सोबत एंगेज झाल्याचा गौप्यस्फोट केला. लवकरच तिचे लग्न झाले. तिचा नवरा शशी, पिहूला खूप मानायचा. रिद्धीला काहिही गिफ्ट म्हणा किंवा एखादे सरप्राईज द्यायचे असल्यास तो पिहूचा सल्ला घेतल्या शिवाय राहत नसे. बघता बघता लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आणि गूड न्यूज कधी? हा प्रश्न जो तो रिद्धीला विचारू लागला. शशीही आता बाळ ठेवायचंच असं बोलला. रिद्धीने त्याला खूप समजावले कि ती तिच्या करिअरच्या पीकवर आहे. अशात मॅटर्निटी लिव्हचा धोका ती पत्करू शकत नाही. मात्र तो काहीच ऐकायला तयार नव्हता. अशात दोघांशी भांडण विकोपाला जाऊन ते वेगवेगळे राहू लागले. त्यावेळी पिहूने तिच्या आयुष्याचा तो कोपरा त्याला दाखवला जो तिने आतापर्यंत कोणासमोरच उघड केला नव्हता.
क्रमश :
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
धन्यवाद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा