दीर्घकथा लेखन स्पर्धा
DINK भाग 13
"फार आनंद झाला असेल ना ऐकून ही गूड न्यूज?" रिद्धीने पिहूला टोमना मारला, "आता तर तुला पुण्यात परत जाण्याची गरजच नाही. इथली मार्केटिंग हेड मॅटरनिटी लिव्हवर जाईल, वर्तमान कालीन जनरल मॅनेजर काही दिवसातच रिटायर होईल. मग इथल्या मार्केटिंग टीमला तुझ्या मजबूत बाजूचाच आधार आणि मुंबई ऑफिसची तूच नवीन जनरल मॅनेजर."
"झालं तुझं टोमणे मारून." पिहू आपल्या मनगटावरील घड्याळात पाहून तिला म्हणाली, " पहिली गोष्ट माझी फ्लाईट रात्री सात वाजता आहे. माझे काम झाल्यावर मला ऑफिसमध्ये थांबायचे नव्हते म्हणून मी एअरपोर्टवर लवकर जाणार होती. राहिली गोष्ट तुझ्या गुड न्यूज ची तर मी इतकच म्हणेल की हे तुझं आयुष्य आहे, तुझी निवड आहे, जे तु तुझ्यासाठी निवडलेस ते मनापासून जग. एक कलिग म्हणून मी तुझी मदत केली. बाकी मला तुझ्याशी काहीच घेणे देणे नाही. तू शुद्धीवर आली आहेस, हे तुझं सामान. बाय बाय." रिद्धीची पर्स तिच्यासमोर ठेवून पिहू हॉस्पिटल मधून बाहेर पडली. एअरपोर्टवर जाण्यासाठी गार्गी तिचे सामान घेऊन गाडीत तिची वाट पाहत बसलेली तिला दिसली.
"मॅम गूड न्यूज आहे ना?" गार्गीनी पिहूला बसण्यासाठी दार उघडताच प्रश्न केला.
" गार्गी आपल्या कामाशी काम ठेवायला शिक. चांगलं होईल तुझ्यासाठी, तुझ्या करियरसाठी." पिहूने डोळ्यांवर आपला गॉगल चढवत तिला बोलली, " इथे काय झाले काय नाही ते काहीच पुण्याच्या ऑफिसमध्ये मला ऐकू येता कामा नये."
गार्गीने होकारार्थी मान हलवली. पिहूचे आयुष्य परत रुळावर आले. सकाळी पंधरा मिनिट प्राणायाम, अर्धा तास रनिंग मग ज्यूस पिऊन किंवा फळ खाऊन ऑफिसची तयारी करून साडे नऊला ऑफिसमध्ये हजर. तिथेच कामांची यादी बघता बघता नाश्ता करणे कॉफी घेणे, गार्गी सोबत बसून काय कसे करायचे ती योजना आखणे व त्यावर अंमल बजावणी करणे. हातात घेतलेला प्रोजेक्ट पूर्ण करून मगच दम घेणे. पेहूची ही प्रवृत्ती मॅनेजिंग डायरेक्टर मिस्टर आणि मिसेस कस्तुरीला फार आवडायची. त्यामुळे ते दोघेही तिची थोडीफार मनमानी चालवून घ्यायचे. कधी काही चुकलेच तर ते काना मागे टाकायचे. तसेही कार्पोरेट जगात हे चालतच, जो कामाचा असतो त्याच्या मोठमोठ्या चुकाही अनदेख्या केल्या जातात. पिहूने तर तिचे आयुष्यच जणू कस्तुरी ला बहाल केले होते. अशी ती हातात आलेले सर्व काम स्वतःला पूर्णपणे त्यात झोकून पार पाडायची. अन सहा महिन्यातून एकदा आठ दिवस सुट्टीवर जायची ती त्या आठ दिवस कुठे आहे काय करते याचा कोणालाच पत्ता नसे.
पुण्याला जाऊन चार दिवस झाले असतील. एका रात्री फ्लॅटवर गेली असता तिची आई तिला दारातच उभी दिसली.
"पिहू, किती सोकलीस बाळ?" आई तिचा चेहरा हातात घेऊन तिला म्हणाली, " मागील काही दिवसापासून खूप ताप सहन करावा लागला ना त्या मूर्ख मुलीमुळे तुला. असंच नव्हतं सोडायचं तिला तू. "
"आई, आत चल. बसून बोलू." पिहूने पिनकोड टाकून फ्लॅटचे दार उघडलं.
"नाही गं तुला डोळ्यांनी पाहायचं होतं. मोबाईलवर कॉल केलेला. पण तु उचलला नाहीस. कामात असशील ना. मग तुझ्या बाबाला म्हटलं डॉक्टरकडे जायचंच आहे आजोबाला घेऊन तर उभ्या उभ्या तुझी भेट घेते." आईने नेहमीप्रमाणे स्पष्टीकरण दिले.
"अच्छा! आता ठीक आहे ना त्यांची तब्येत. मी येईल एक दोन दिवसांनी त्यांना पाहायला." पिहू बळेच बोलली.
"चालेल, तुझ्या सोयीने ये. काही घाई नाही. दुपारचे जेवायला आलीस तरीही चालेल." पिहूच्या मनात आजी आजोबां विषयी असलेली सल तिच्या आईला माहित होती. पिहूची बीबीए ची पदवी पूर्ण होताच घरात तिच्या लग्नाचे वारे वाहू लागले. तेव्हाच तिने ती आजन्म अविवाहित राहणार असे स्पष्ट शब्दात सर्वांना सांगितलेही. पण कोणीही ते मनावर घेतले नाही. त्यांना तो तिच्यातील तरुणपणाचा जोश वाटला. हाहा म्हणता तिचे दोन वर्षाचे एमबीए ही पूर्ण झाले. दुसऱ्या वर्षीचा निकाल येण्याआधी ती एका कुटुंबातील मुलाच्या मनात भरली. पाहण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. पिहूने मुलाशी एकांतात बोलायची मागणी केली.
दोन्हीही कुटुंब सुशिक्षित असल्यामुळे व आताच्या विसाव्या शतकातील मुलं अगदीच आपले ऐकणार नाहीत त्यांना त्यांची मतं मांडायची संधी द्यायलाच हवी असे बोलून मुलाच्या मामाने त्यांना मुला-मुलीने एकांतात बोलण्यावर काही हरकत नाही असे सांगितले.
क्रमश :
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
धन्यवाद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा