Login

DINK भाग 16

पिहूला मिळेल का तिची विचारसरणी स्वीकारणारा लाईफ पार्टनर? कि एकांतच तिचा माझीं राहणार शेवटपर्यंत
दीर्घकथा लेखन स्पर्धा

DINK भाग 16

पण स्त्री असो वा पुरुष एक वय पार केले कि आपल्याकडे सर्वांना लग्नाचे वेध लागतात. त्यात एखादी अविवाहित स्त्री असेल तर इतर स्त्रियांना ती त्यांच्यासाठी धोका वाटू लागते जणू ती त्यांच्या नवऱ्यांना किंवा बॉयफ्रेंडला रिझवण्यासाठीच या धरतीवर अवतरलेली. सत्य परिस्थितीत मात्र ती स्वतःवर कष्ट घेऊन आपले साम्राज्य निर्माण करण्यावर भर देण्यात गुंतलेली असते. अशीच काही पिहूची गाथा. त्यामुळे ऑफिसातही ती थोडी अलिप्त राहायची. ऑफिस पार्टीत जास्त रमत नसे. सर्वांना हाय हॅल्लो करून झालं कि थोडं फार खाऊन घरी परत यायची. असं नाही कि तिला दंगा, मस्ती, मौज, डान्स आवडत नव्हते. ती सगळं काही एंजॉय करायची पण तिच्या ठरलेल्या शाळा कॉलेजच्या दोन चार मित्र मैत्रिणी सोबत. इतरवेळी ती तिच्या कामात.

पिहू पुण्यात आल्यावर तिच्या मैत्रिणींनी सर्वांनी एकत्र येऊन तिच्यावर लागलेल्या आरोपातून ती निर्दोष मुक्त झाल्याबद्दल पार्टी करून तिच्या प्रसिद्धीला सेलिब्रेट करायचे ठरवले. पिहूला रेस्टॉरंटचे जेवण करून करून कंटाळा आला होता तिने हाऊस पार्टी करू असे सांगितले. तिच्या शाळेतील मैत्रिण अनिताचा नवरा अजित यांच्या हाऊस पार्टीचा उत्साही शेफ असायचा. त्यामुळे जास्तीत जास्त हाऊस पार्टी अनिताच्या घरीच होत असत. मात्र यावेळी अनिताचे सासू सासरे अचानक त्यांच्याकडे आलेले म्हणून ऐनवेळी पार्टीचे स्थळ बदलवण्याची पाळी त्यांच्यावर आली. पिहूच्या फ्लॅटवर तिचे सामान असताव्यस्त, तिची कामं करणारी ताई सुट्टीवर आणि तिला पसारा आवरायला वेळ नाही तेव्हा तिने आधीच नकार दिलेला. जीजाच्या घरीही तिच्या नवऱ्याचा लहान भाऊ गेट्सचा पेपर द्यायला आल्यामुळे तेही कॅन्सल. कुणालच्या फ्लॅट सिस्टीममध्ये नॉनव्हेज खाण्यावर बंदी होती. म्हणून मग मागील सहा सात वर्षाच्या कालावधीत पहिल्यांदा त्यांच्या कॉलेज मित्र ललितचे घर पक्के झाले. पिहूच्या मित्र परिवारात ललित आर्थिक रूपाने सर्वात स्ट्रॉंग. पण तसा आव त्याने कधीच आणला नाही. बीबीए झाल्यावर त्याने ऑस्ट्रेलियात एमबीए फायनान्स पूर्ण केले. मायदेशी परतून घरच्या फायनान्स कंपनीला आणखी मोठे स्वरूप देण्यावर काम करू लागला. पिहू अँड मंडळीत त्याला खूप कम्फर्टेबल वाटायचे. नाहीतर इतरत्र पार्टी म्हणजे ब्रँडेड कपडे, लक्झरी हॉटेल आणि नागड्या मुलीच त्याला दिसायच्या. त्यामुळे पिहू, जीजा, अनिता अजित व कुणाल सोबतची हाऊस पार्टी तो कधीच चुकवत नसे.

पाषाण स्थित ललित राहत असलेल्या आलिशान सोसायटीत गेल्यावर तिथल्या सुख सुविधा पाहून आपला स्वतःचा फ्लॅटही अशाच सोसायटीत असावा हे पिहू व तिच्या मित्र परिवाराच्या मनात आल्यावाचून आल्या वाचून राहिले नाही. पिहूने काही पैसेही जमवले होते फ्लॅट घ्यायला. पण तिला हवा तसा फ्लॅट अजूनही तिच्या अवाक्या बाहेरच वाटत होता तिला. म्हणून ती कंपनीच्या फ्लॅटमध्ये राहून आणखी पैसे जमा करू लागली.

जितकी सुंदर ती फ्लॅट सोसायटी होती त्याच्या कैक पटीने सुंदर ललितच्या टू बीएचके फ्लॅटच्या आतील इंटिरियर होते.

"तु एकटा राहतोस इथे?" अनिताने त्याला विचारलं.

"हो, आई बाबाला कोथरूडच आवडतं." ललित उत्तरला.

"मज्जा आहे." जीजा म्हणाली.

"मला तर किचन पाहायचे आहे. चल किचन दाखव. मस्त मसाला चिकन तंदुरी बनवतो किंवा आणखी काही दुसरं बनवायचं असेल तर तसे सांगा." अजित म्हणाला.

पिहू मात्र गॅलरीत जाऊन त्या पंधराव्या मजल्यावरून दिसणाऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला न्याहाळू लागली. कोणी घराचे इंटिरियर पाहण्यात दंग, कोणी होम थियेटरवर गाणी लावण्यात, कोणी किचन सेटअप किती छान, बेडरूमच्या स्पेसची प्रशंसा आणि कोणी सामान्य बेडरूम इतकी जागा असलेल्या बाथरूममध्ये झकुजी, शॉवर घेण्यासाठी काचाची ट्यूब पाहून दंग. त्यांना त्यांच्यावर सोडून ललित पिहूकडे गेला.

"ही माझीही आवडती जागा." ललितने तिला सांगितले.

"हो ना, इकडे या दिशेला ही संपूर्ण हिरवळ लॅपटॉप, मोबाईल स्क्रीन पाहून दमलेल्या डोळ्यांना गारवा देत आहे." पिहू बोलली, "छान जागा निवडलीस राहायला. "

"हो, एकांतप्रिय व्यक्तीसाठी स्वर्ग आहे ही सोसायटी." ललित म्हणाला.

क्रमश :

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

धन्यवाद.
0

🎭 Series Post

View all