Login

DINK भाग 17

पिहूच्या आयुष्यात प्रेमाची झुळूक येत आहे. पण किती काळ टिकणार ही झुळूक तिच्या आयुष्यात
दीर्घकथा लेखन स्पर्धा

DINK भाग 17

त्या दोघांना पाहून जीजा किचनमध्ये अजितला मदत करणाऱ्या अनिताला हात धरून हॉलच्या गॅलरी जवळ घेऊन आली.

"का काय?" अनिता विचारणार तोच ची गाणी तिच्या ओठांवर बोट ठेवून गॅलरी कडे इशारा केला.

"अच्छा, बोलत असता आहेत ते. काय विशेष करत आहेत?" अनिताने अगदी हळू आवाजात जिजाला विचारले.

" कशी मैत्रीण आहेस तू? तुला नाही वाटत का यांचं काही व्हावं म्हणून? " जीजाने तिला विचारलं.

" वाटतं तर खूप पण आपल्या वाटल्याने काय होणार आहे? दहा-बारा वर्षांपासून ओळखतात ते एकमेकांना. पण बिझनेस, इन्वेस्टमेंट या गोष्टींशिवाय पुढे जातच नाही त्यांची गाडी कधी? " अनिता कंटाळलेल्या चेहऱ्याने अनिताला म्हणाली.

"हो ते आहेच. पण मग आपण मित्र-मैत्रिणी कशासाठी आहोत? आपण त्यांच्या मनातील भावना बाहेर आणायला हव्या." जिजा तिला म्हणाली.

"अनु अगं काय करत आहेस? ओव्हन अजून सुरू नाही केलेस तू?" अजितने अनिताला आवाज दिला.

" मला वाटतं सध्या तरी आपण त्यांना एकांत द्यायला हवा. तेव्हा चल किचनमध्ये नाहीतर अजितच्या आवाजाने ते दोघं डिस्टर्ब व्हायची. " अनिता तिचा हात पकडून तिला आत घेऊन गेली.

" तुझी इन्व्हेस्टमेंट कशी सुरु आहे? " ललितने पिहू ला विचारले.

" बऱ्यापैकी शेअर जमा झाले आहेत. आता स्वतःचे घर घ्यायचे आहे. पण एका चांगल्या सोसायटीत घर घेणे म्हणजे सगळी जमापुंजी त्यातच टाकने. त्यामुळे कन्फ्युज आहे मी. " पिहू उत्तरली.

" माझ्याकडून तू मदत घेत नाहीस. नाहीतर आतापर्यंत छान फ्लॅट झाला असता तुझा. " ललित तिला मिश्किलपने म्हणाला.

"नको, आपल्या मैत्रीत पैसा यायला नको. फ्लॅट काय आज ना उद्या होऊन जाईल." पिहू बोलली.

" अगं पण बँकेतही तुला व्याज द्यावेच लागेल ना. तेवढेच मला दे वाटलंच तर. माझा बिझनेसच आहे फायनान्सचा. एक एक पैसा वसूल करून घेणार मी. " ललित गमतीने म्हणाला.

" माहिती मला म्हणूनच नको आहे तुझी मदत. " पिहू हसू लागली.

" पहा कसे हसत आहेत दोघं. " जिजा परत सुरु झाली, " आपण ना जेवायला बसले की यांना विचारूच. "

अजित, अनिता आणि कुणालने नकारार्थी मान हलवली.

" यात त्यांना त्यांचे आयुष्य हवे तसे जगू दे. " अनिता म्हणाली.

"हो, मी काहीच बोलणार नाही. लग्नाचे नाव काढताच पिहू अगदी झाशी झाशीच्या राणीचा अवतार धारण करते. मला आपला पार्टीचा मूड खराब करायचा नाही." कुणालने स्ट्रॉबेरी कॉकटेल तीन ग्लासमधे ओतून, ते ग्लास व ललितने त्याच्या कुक कडून बनवून ठेवलेले चिली पनीर, मटर कबाब, दाल पकवान, फुलगोबी पकोडे घेऊन तो ललितकडे गेला.

"भाऊ तुम्हा दोघांनाच भेटायचे होते तर आम्हाला इथे का बोलावले? " त्याने ललितला गोड टोमणा मारला.

" तुझी सवय जाणार नाही हा वाकड्यात बोलण्याची. " ललित हसून कुणालला म्हणाला.

"नाही जाणार, चल हे फ्रेश स्ट्रॉबेरीचे कॉकटेल घे. आणि मला होम थिएटर सुरू करून दे. आज मी एकटाच मला वाटेल तो सिनेमा पाहणार." कुणाल त्याच्या अंदाजात  म्हणाला.

" तू इथे आमच्या सोबत पार्टी करायला आलास की सिनेमा पाहायला? " ललितने त्याला विचारले.

" फॅमिली मॅन का दर्द तुम क्या जानो ललित बाबू." कुणाल चेहऱ्यावर न आलेले त्याचे केस मागे करत राजेश खन्नाच्या टोन मध्ये त्याला म्हणाला.

"ए पुरे तुझी ओव्हर ॲक्टिंग." पिहू त्याला म्हणाली, " तू तर ऑफिसमध्ये असतो दिवसभर. तुझी फॅमिली तुझी बायको पाहते आणि दर्द याला होतो म्हणे. "

"हमको तुमसे वादावादी नहीं करना है. होम थिएटर शुरू कर दो ललित बाबू." कुणाल ललित ला म्हणाला.

" जा बाबा बेडरूमला लागूनच आहे होम थिएटर टेबलवर तीन प्रकारची रिमोट आहेत. ती वाच आणि तुला हवा तो सिनेमा पहा. " ललित त्याचे हसू आवरत बोलला.

कुणालने पिहू कडे पाहून तोंड वाकडे केले. पिहूनेही तसेच केले. दोघांनी एकमेकांना जीभ दाखवली. मग दोघांनीही हूं हूं करत एकमेकांच्या विरोधी दिशेला बघितले. कुणाल गेला तसा ललित हसायला लागला,

"काय नग आहे तुम्ही दोघेही. कोणी बघेल तर म्हणणारच नाही की तुमचे वय पस्तीस वर्षाच्या वर आहे."

"हा ते आहेच पण तुही स्वतःला कमाल फिट ठेवले आहेस. अजूनही वयाच्या पंचविशीतच असल्यासारखा वाटतो." पिहू त्याला म्हणाली.

"थँक्यू. आजच्या काळात आपले निरोगी शरीर आपली सर्वात मोठी संपत्ती. त्याला आपण जपायलाच हवे." ललित कॉकटेलचा घोट घेऊन हॉलच्या खुर्चीत बसला.

क्रमश :

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

धन्यवाद.
0

🎭 Series Post

View all