दीर्घकथा लेखन स्पर्धा
DINK भाग 18
"कोणाला सांगतोय तू?" जीजा त्यांच्याजवळ येऊन बसली.
"का, काय झालं?" ललितने विचारलं. पिहूला माहित होतं जीजाला कितीही नको सांगू म्हटलं तरीही ती ऐकणार नाही म्हणून ती शांतच बसली.
"काय झालं? मॅडमला चाळीशी पार करण्याआधीच नंतरचे रोग लागलेत." जीजाने माहिती पुरवली, "एक महिन्या पूर्वी दवाखान्यात भरती सलाईन लावावी लागली होती इतकं फूड पोईझन झालं होतं."
"अरे मला का नाही कळवलं कोणी?" ललितने विचारलं.
"त्याने काय झालं असतं. हे पोटाचं दुखणं जन्माला पुरलं माझ्या." पिहू हसून बोलली.
"ठीक आहे पण तु काळजी घ्यायला हवी." ललित तिला काळजीच्या स्वरात म्हणाला.
"हो रे म्हणूनच मी घरी बनवलेलं खायचा हट्ट धरते ना. पण बाहेर दौऱ्यावर गेले कि नाही होत सगळी पथ्य पाळायला." पिहू त्याला म्हणाली, "असो, आपण इथे बसलेलो आरामात. आपलं कुकिंग कपल म्हणेल आम्हाला स्वयंपाकी बनवून ठेवलं आहे."
"हो ते आहेच. चला या हातभार लावायला." अनिता भटक्या रागात त्यांना बोलली, " टेबलवर सर्व पदार्थ आणून ठेवा. मी आणि नवरा बसून फक्त खाणार आहोत आता."
"हो हो नक्कीच. शरयू झाल्यावर तुम्ही दोघं पहिल्यांदा शांततेत बसून खाणार आहात." जीजा तिला म्हणाली.
"हो, एक प्रकारे बरेच झालं माझे सासू-सासरे आले. आपल्याला ललितचं नवीन घर पाहायला मिळालं आणि आम्हा दोघांना थोडासा मी टाईम." अनिताच्या चेहऱ्यावर तिच्या मनातील प्रसन्न भाव उठून दिसू लागले.
"म्हणूनच मी यांना सांगितलं थोडे दिवस माझं मला जगू द्या मग फॅमिली प्लॅनिंग करू." जीजा म्हणाली.
"ते ठीक पण चौथीसची झालीस तू यावर्षी. आता बाळ होऊ दे. पुढे आपल्यालाच त्रास होतो गं." अनिता तिला समजावून सांगू लागली, " एक बाळ हवेच आहे ना मग होऊ दे लवकर. "
ललितने पिहू कडे बघितले. पिहू हसली जणू नजरेनेच त्याला म्हणाली छान चाललंय यांचं. चालू द्या. जेवण करून झाल्यावर सर्व गप्पा मारत गॅलरीत बसली. एप्रिल महिन्याची सुरवात असल्यामुळे वातावरण सामान्य होते.
"खूप झालं जेवण. खाली बगीच्यात फिरायचे का?" कुणालने ललितला विचारलं.
" खाली नको वर जाऊ. चला स्टारगेझिंग करू. " ललित उठून उभा झाला.
"ए हो खूप दिवस झाले निरभ्र आकाशाखाली बसून ताऱ्यांना वेचलं नाही." जीजा म्हणाली.
"हिच्यातला कवि जागी झाला रे बॉ. आता आपल्या कानांचे काही खरं नाही." कुणाल कानात बोटं घालून बोलला.
"कुणाल तु मार खाणार हा तुझ्या बायकोचा." जीजा चिडली.
"मी तिला सांगितले आहे की माझ्या काही मैत्रिणीही आहेत पार्टीत आणि पिहूला ती चांगली ओळखते." कुणाल निष्काळजीपणे बोलला.
"हा मी तिला सांगणार की तू चिकन खाल्लं. अजितने पूर्ण चिकन ठेवले ना ओव्हनच्या आत तेव्हा तिथेच होतास तु. फोटो घेतला आहे मी तुझा." जिजा त्याला वेकोल्या दाखवत म्हणाली.
"ए बाई सॉरी. असं काही करू नकोस ती घरातून काढून देईल मला." कुणालने तिच्यापुढे हात जोडले.
" किती पांचटपणा लावला आहे तुम्ही दोघांनी." अनिता त्यांना म्हणाली, "चला आता गच्चीवर."
सर्व गप गुमान ललितच्या मागे मागे गच्चीवर जाण्यासाठी लिफ्ट मध्ये शिरले. लिफ्ट मधून बाहेर पडून समोरील नजारा पाहून थक्क झाले. वर एक थ्री बीएचके घर, त्या समोर गुलाब फुलांनी सजलेली छोटीशी बाग, बाजूला तारे निरीक्षनासाठी लावलेली दुर्बीण आणि स्विमिंगपूल.
"हे तर एक पेंत हाऊस आहे." पिहूच्या तोंडून उद्गार बाहेर पडले.
"ललित हेही तुझेच आहे?" कुणालने त्याला विचारलं.
"ललित हेही तुझेच आहे?" कुणालने त्याला विचारलं.
"नाही." ललित उत्तरला.
"मग आपण इथे नको जायला." पिहू त्याला म्हणाली.
"अगं तसं नाही माझा मोठा भाऊ राहतो इथे." ललित बोलला.
" मग काहीच हरकत नाही. भावाचे ते आपलेच असते. " इतकं बोलून कुणाल आत जायला सज्ज झाला.
"याचे काय करावे बरं जराही शरम नाही याला." जीजा म्हणाली.
" जिसने कि शरम उसके फुटे करम. " कुणाल तिच्याकडे न पाहताच बोलला.
"बरं झालं या दोघांनी एकमेकांशी लग्न नाही केलं. नाहीतर आपल्या पार्टीज आणि गाठीभेटी यांची भांडणं सोडवण्यातच गेल्या असत्या." अनिता म्हणाली तसे ललित आणि पिहू दोघेही एकमेकांकडे पाहून हसले अन अनिताच्या तोंडून बाहेर पडले,
" तुमच्या दोघांचा एकमेकांविषयी काय विचार आहे? "
" तुमच्या दोघांचा एकमेकांविषयी काय विचार आहे? "
क्रमश :
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
धन्यवाद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा