दीर्घकथा लेखन स्पर्धा
DINK भाग 19
" माझं घर आहे हे. पण तु इथे कशी?" तेजस तिला उलट प्रश्न विचारला.
"अशीच भटकत आली." पिहू त्याच्यावर चिडली, "आता प्रश्नच विचारणार की मला बोटाला लावायला काही मलम वगैरे देणार."
"अरे सॉरी. मी आलोच." तो बाथरूम मधून प्रथमोपचार पेटी घेऊन आला.
"आयुष्यात इतकी दचकली नाही मी जितकी तुझ्या या रुपाला पाहून दचकली." पिहू त्याला बोलली. तो आपल्या पिळदार छातीला पाहून स्वतःशीच हसला.
"आता माझ्या घरात, माझ्या बेडरूम मध्ये मी कशाला संकोचाने वावरणार?" तो डेटॉलच्या पाण्याने तिच्या अंगठ्याला पुसत म्हणाला.
"हो तेही आहेच. पण तुझ्या भावाने कुठे आम्हाला सांगितले होते की माझा भाऊ आत मध्ये अंघोळ करत असेल तेव्हा सावध राहावे." पिहू बोलली.
"अच्छा. ललितची मैत्रीण आहेस तु." जरा नाराजीनेच त्याने टिंचर आयोडीनचा बोळा तिच्या अंगठ्यावर दाबला.
"आई गं, काय करतोय तु? आताच्या काळात कोण आयोडीन वापरतं?" पिहूला चांगलीच आग झाली.
"इन्फेकशन होत नाही टिंचर आयोडीनने." तो फुंकर घालत बोलला.
"किती काळजी." कुणाल बोलून बसला. तसे त्याचा आवाज ऐकून आतापर्यंत आपल्या जगात मश्गुल असलेल्या पिहू व तेजसचे लक्ष बेडरूमच्या दारातुन त्यांना लपून पाहत असलेल्या ललित, अनिता, अजित, कुणाल व जीजावर गेली.
"ब्रो हे माझे मित्र मैत्रिणी, ललित, अनिता, अजित, कुणाल व जीजा आणि ती पिहू." बेडवर बसलेल्या पिहूकडे बोट दाखवून ललितने त्याचे वाक्य पूर्ण केले, "तु कधी आलास? म्हणजे तू उद्या सकाळी येणार होतास ना?"
" हो पण ती मीटिंग कॅन्सल झाली म्हणून मग रात्रीच परतलो. " तेजस उत्तरला.
"पिहू ठीक आहेस ना?" ललितने पिहूला विचारले.
"हो मी ठीक आहे फक्त अंगठा ठेचला गेला. सांगायचे तरी ना घरात कोणी आहे असे." पिहू तिच्या पायाच्या अंगठ्याला पाहत उत्तरली. ललित काही स्पष्टीकरण देणार त्या आधीच जीजा तेजसच्या ऍब्सकडे एकटक पाहून म्हणाली,
"ओएमजी, अंग मेहनत छान घेता तुम्ही. काश माझ्या नवऱ्यालाही अशी अक्कल असती." तसे तेजसला जाणवले की त्याच्या अंगावर फक्त एक टॉवेल गुंडाळला आहे. तो लगेच छातीसमोर हात घेऊन बेडरूमचे दार लोटत बोलला,
"दोन मिनिट हं, मी चेंज करून येतो."
" ती आता आमची मैत्रीण ..." जिजाचे वाक्य पूर्ण होण्याआधीच कुणाल तिचा हात पकडून तिला बाहेर घेऊन गेला.
"अरे काय झालं? पिहूला असे एकटे सोडून कसे यायचे?" जीजाने त्याला विचारलं.
" तिला यायचे असते तर ती कधीच आली असती उठून." कुणाल तिला बोलला.
"म्हणजे पिहूला त्याच्यात इंटरेस्ट आहे असे म्हणायचे आहे का तुला?" जीजाने त्याला विचारलं.
" अर्थातच आणखी काय? तिला कधी बघितले आहे इतक्या शांततेत एखाद्या माणसाबरोबर बसलेली असतांना? " अनिता त्यांच्या मधात बोलली.
" अगदीच." अजितने अनिताच्या बोलण्याला दुजोरा दिला, "त्यांना बघितले तेव्हा ते एकमेकांसोबत खूप कम्फर्टेबल वाटले. जणू ते आधीपासून एकमेकांना चांगल्याने ओळखतात."
" हो हो मलाही असेच वाटले. " कुणाल म्हणाला.
" होऊ शकतं, कारण तेजस दादा एक नावाजलेला वकील आहे. मोठमोठ्या व्यक्तींच्या केस तो लढतो तसेच मोठमोठ्या कंपनींसाठी लीगल ॲडव्हायझर चे काम त्याची कंपनी करते आणि आपली पिहू सुद्धा कस्तुरी सारख्या नावाजलेल्या मीडिया कंपनीमध्ये मोठ्या पदावर आहे. तेव्हा त्यांचे एकमेकांना ओळखणे स्वाभाविक आहे.
सर्व स्विमिंग पूल मध्ये पाय ठेवून पिहू व तेजस बद्दल विचार विनिमय करत बसले.
तिकडे तेजसने कपडे घालण्यासाठी त्याच्या बेडरूमचे दार लावताच पिहू त्याला म्हणाली,
" आता बाहेर जोरदार गॉसिपिंग चालणार आहे."
" आता बाहेर जोरदार गॉसिपिंग चालणार आहे."
"मी तुला बाहेर बसवून देऊ का मग?" तेजसने टी-शर्ट अंगात चढवत तिला विचारले.
"आधी पायजामा चढवून घे मग. त्या टॉवेलवर किती भरोसा आहे तुझा." पिहू डोक्याला हात लावून म्हणाली आणि बरं झालं जिजा समोर तर टॉवेल सुटला नाही नाहीतर काय झालं असतं या विचाराने ती स्वतःशीच हसली.
"काय झालं? तू हसत का आहेस?" तेजसने शंकेने तिला विचारले. ती नकारार्थी मान हलवून उत्तरली, " नाही काही नाही. तू लवकर तुझे उरलेले कपडे चढव. आपल्याला जास्त काळ इथे आत राहायला नको. "
" तू अशी माझ्याकडे पाहत असतांना मी ते कसे चढवणार? " त्याने त्याच्या हातातील अंडर वियरकडे इशारा केला. तसा तिने डोक्यावर हात मारून मुंडी खाली केली,
"घाल बाबा लवकर आता."
क्रमश :
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
धन्यवाद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा