दीर्घकथा लेखन स्पर्धा
DINK भाग 21
कपडे घालून झाल्यावर तेजस येऊ चा हात पकडून तिला बाहेर घेऊन आला. त्यांना पाहताच कुणाल च्या तोंडून उद्गार बाहेर पडले,
"हाय."
त्याच्या जोडीला जिजा होतीच तीही बोलली,
"हाय हाय."
त्यांचा उद्देश समजताच लिहू त्यांना बळे बळेच रागवली,
"झालं असेल तुमचं तर निघायचं आता घरी?"
" काय इतक्या लवकर? " कुणालने तिला विचारले.
ललितनेही प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघितले, " रात्रभर इथेच माझ्याकडे राहायचा प्लॅन होता ना तुमचा?"
" हो ना आता इतक्या रात्री घरी गेल्यावर सर्वांना उठवणे म्हणजे नवरा डोकं खाणार माझं. " जीजा म्हणाली.
"गाईज तुम्ही तिला असं चिडवणार मग ती घरी जातो म्हणणारच ना." अनिता देहू कडे बघत त्यांना बोलली, "पिहू कसा आहे तुझा पाय आता?"
" ठीक आहे ग थोडा ठणकतोय बस. " पिहू उत्तरली.
" सॉरी मी अचानक समोर आल्यामुळे ती धडपडली आणि तिला लागलं. तिला सकाळी घेऊन जातो मी डॉक्टर कडे." तेजस बोलला.
"त्याची काहीच गरज नाही. " देहू त्याच्यावर डोळे वटारून म्हणाली.
" बरं तुमची पार्टी चालू द्या काही हवं असेल तर सांगा. मी कॉफी घेणार आहे तुम्हाला हवी? " तेजसने विचारताच कुणाल व जिजा सोडून सगळ्यांनी नकारार्थी मान हलवल्या.
" गरम गरम मॅगी मिळाली तर आणखी चांगलं. " कुणाल म्हणाला. सर्वांनी त्याच्याकडे रागात बघितलं.
" मी बनवलेले चिकन आवडले नाही तुला? " अजितने त्याला विचारले.
" अरे ते केव्हाचे पचले आता रात्रीचा एक वाजत आहे. " कुणाल म्हणाला.
" अरे पण मॅगी खाने चांगले नाही. खाली छान रेस्टॉरंट आहे तिथून हेल्थी सॅन्डविच मागवून देतो. आणखी कोणाला काही हवे आहे का? " तेजसने त्यांना विचारलं.
" रेस्टॉरंट मध्येच खायचे असेल तर आम्ही जातो खाली खायला. " पिहू बोलली.
" हो तेवढीच ही सोसायटी एक्सप्लोर करणे होईल. " अजित म्हणाला.
"अजित डार्लिंग तिला म्हणायचे आहे की रेस्टॉरंट फूड तिला नको आहे. तिला होममेड घरी बनवलेले हवे आहे." अनिताने अजितला समजावून सांगितले.
"ओह, पण अनु आता मला जीवावर आले आहे. मला चिल मारायचं आहे." अजित तिच्या कानात फुसफुसला.
" ती तुला कर असं म्हणतही नाही आहे. " अनिताही त्याच्या कानात फुसफुसली.
" तुम्ही दोघं काय कानाफुसी करत आहात? " जिजाने त्यांना विचारले.
" असंच ग घरच एक मॅटर आठवलं होतं. " अनिता उत्तरली.
"ठीक आहे तुम्ही सर्व बसा मी बघतो काही बनवता येईल ते." तेजस आत गेला. त्याच्या मागोमाग ललितही येतोच कॉफी व स्नॅक्स घेऊन असं बोलून निघून गेला.
"गॅस सुरु करता येतो का?" ललितने तेजसला विचारलं.
तेजसने नकारार्थी मान हलवली.
"वा मग माझ्या मित्रांसमोर मी बनवून आणतो असं का म्हणालास?" ललितने पुन्हा प्रश्न केला.
"कारण मला माहित होतं की तु मला एकटं सोडणार नाहीस. सांग आता काय बनवायचे आणि कुठून सुरवात करायची?" तेजस चाकू व चॉपिंग बोर्ड वट्यावर ठेऊन म्हणाला.
"बापरे तु चाकूला हात लावणार?" ललित त्याची मस्करी घेऊ लागला.
"मस्ती नंतर ललित, तुझेच मित्र मैत्रीण म्हणतील वेळेत खायला दिलं नाही." तेजस त्याला म्हणाला.
"टामटुम झाले आहेत ते खाऊन. आता फक्त हलकं फुलकं काहीतरी हवं आहे त्यांना." ललित डब्यात काही मिळतं का ते तपासत करत बोलला, "आई मागे आली तेव्हा मुरमुरे घेऊन आली होती ना?"
"ते ठेवले असतील एखाद्या डब्यात. तुला माहित आहे ना मी किती कमी असतो इथे." तेजस उत्तरला.
"मिळाले, चल भेळ बनवू, तु मखाना रोस्ट करून घे. म्हणजे हलवत राहा फक्त. मी टमाटर, कोथिंबीर आणि कांदा कापून घेतो." ललित म्हणाला.
"तु माझ्यापेक्षा चार वर्षांनी लहान असून किती समजदार आहेस. आई बाबा असेच नाही तुला मिस करत." तेजस त्याला म्हणाला.
"हेहे ते तुझीही खूप आठवण काढतात. फक्त आईला माझ्यावेळी मुलगी हवी होती आणि मुलगा होऊनही तिने एखाद्या मुली सारखंच मला फक्त जपलंच नाही तर सगळं शिकवलंही. म्हणून थोडं जास्त अटॅचमेंट आहे आमच्यात." ललितने बारीक कापलेला कांदा, कोथिंबीर व टमाटर एका पातेल्यात टाकून त्यावर तिखट, हळद, चॅट मसाला आणि मीठ टाकून छान मिक्स केलं.
"हो ते दिसतच आहे. पण तु आईचा इतका छान बाळ असूनही लग्नाला का नकार देतोय. आईने किती सुंदर, हुशार मुली बघितल्या तुझ्यासाठी." तेजसने त्याला विचारलं.
क्रमश :
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
धन्यवाद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा