दीर्घकथा लेखन स्पर्धा
DINK भाग 22
"सेम पिंच." ललितने तेजसला विचारलं, "तु मोठा आहेस. तु का नाही लग्न केलं? माझ्या आधी नक्कीच तुझ्यासाठीही आईने एकाहुन एक मुली बघितल्या असतीलच."
"खरं सांगू, आजोबाचे माझ्याबद्दलचे भाकीत चुकीचे ठरवण्याची एक धुंदी सवार झाली होती माझ्यावर. फक्त एक उत्तम, नामवंत वकील म्हणून उदयाला यायचे आहे, खूप प्रसिद्धी मिळवायची आहे आणि पैसा कमवायचा आहे. इतकेच माझ्या डोक्यात चालायचे. त्यातून वेळच नाही मिळाला. मग एकट्याने राहायची अशी सवय झाली की पुढे कोणासोबत आपले आयुष्य आपले घर, आपली स्पेस शेयर करण्याची इच्छाही झाली नाही." तेजस मखाने हलवत म्हणाला.
"तु आजोबांना अजूनही माफ नाही केलेस ठीक आहे पण बाबासोबत बोलत जा. त्यांना वाईट वाटतं." ललित त्याला म्हणाला.
"जेव्हा मला त्यांची गरज होती तेव्हा त्यांनी तोंडातून शब्द काढला नाही. आता काय फायदा." तेजस हातांची घडी मारून उभा झाला, "सोड ते आता तु उत्तर दे. तु का नकार दिला लग्नाला? कोणी आहे असं ज्याची वाट तु पाहतोय?"
"हॊ आहे ना. एक आहे. पण ती फार वेगळी आहे. आई बाबा नकारच देतील." ललित उत्तरला.
"हम्म, थोडी फार वेगळी आहे ती." तेजस स्वतःशीच पुटपुटला.
"काय म्हणालास तु?" ललितने त्याला विचारलं.
"हेच की तुम्ही दोघेही एकमेकांविषयी गंभीर असणार तर मी समजावून सांगतो आईला." तेजस त्याला म्हणाला.
"नाही रे कोणाच्याही समजावण्याने नाही ऐकणार आई. म्हणून वेळ जाऊ देत आहे." ललित.
"अरे पण इतका वेळ जाने बरोबर नाही. तिला आणखी कोणी आवडले तर?" तेजसचा प्रश्न.
"शक्यच नाही, दिवसातील चौदा ते सोळा सतरा आणि कधी कधी चोवीस तास सोबतच असतो आम्ही." ललित उत्तरला.
"हे कसं शक्य आहे. पिहूचे ऑफिस तुझ्या ऑफिस पासून फार अंतरावर आहे आणि ती आता पंधरा दिवस आधी तीन दिवस मुंबईला होती. त्या आधी गोवा....." आपण काय काय बोलतोय हे लक्षात येताच तेजस बोलायचं थांबला.
"असं होय. आता पकडल्या गेला चोर." ललित तेजसच्या गळ्यात हात टाकून म्हणाला, "तेव्हाची भाऊरायांना आपल्या लहान भावाच्या लग्नाची काळजी नव्हती तर त्याच्या मैत्रिणी बद्दल माहित करून घ्यायचे होते."
"अरे मखाने, मखाने जळत आहेत." तेजस मखाने हलवत बोलला, "चल मुरमुरे टाक पातेल्यात लवकर नाहीतर तुझं मित्र मंडळ आत येईल."
"अच्छा, छान आहे. पिहू खूप छान आहे. वाटलंच मला तरी ही सदानकदा फायरिंग मोड मध्ये असलेली आमची पिहू तुझ्या सोबत इतकी शांत कशी." ललित भेळचे मिश्रण कालवून प्लेटमध्ये काढू लागला.
तिकडे बाहेर जीजा व कुणाल काही केल्या गप्प बसायला तयार नव्हते. त्यांनी त्यांचा प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम सुरु केला,
"बालिका पिहू, कधीपासून ओळखतेस मिस्टर तेजसला?"
"मागील पंधरा वीस दिवसांपासून." पिहू उत्तरली.
"आपला व्हाट्सअप ग्रुप डिलीट करून टाकलेला बरा. त्यावर आपण काहीच सांगितले नाही याबाबत." गिरीजा तिला म्हणाली.
"कारण, त्यात काही सांगण्यासारखे नव्हतेच. त्याला मिसेस कस्तुरीने माझी केस हॅन्डल करायला मुंबईला पाठवले होते आणि सध्या तो आमच्या कंपनीचा लीगल ऍडवायझर आहे. बस!" पिहूने माहिती पुरवली.
"ओह, म्हणजे तुम्ही सोबत काम करता. म्हणूनच तो फक्त टॉवेल गुंडाळून असूनही तुझ्या उपस्थितीत इतका कम्फर्टेबल दिसत होता." कुणाल बोलला.
"नाही, तो त्याच्या ऑफिसमध्ये आणि मी माझ्या. काही काम पडलं असता पेपर त्याला पाठवण्यात येतात. तो वाचून त्यावर आपला सल्ला देतो त्यामुळे क्वचितच आमची भेट होते." पिहू उत्तरली, "आता या उपर माझं डोकं खायचं नाही. मी स्पष्टीकरण देणार नाही."
"हो चला आपण रिल बनवू." अनिता पिहूचा हात हातात घेऊन तिला म्हणाली.
"तुम्ही बनवा. मी इथेच बरी. उद्या ऑफिसला जायचे आहे मला." पिहू तिच्या पायाकडे पाहत बोलली.
"हो गं. विसरलेच मी." अनिता तिला म्हणाली, "बसल्या बसल्या करू काहीतरी."
"हॊ हो, जीजा, अजित आणि मी तिघांनीच रिल बनवली फोटो काढले आहेत. आता सर्वांनी मिळून एक रिल बनवू." कुणाल म्हणाला.
"हो हो नक्कीच." ललित ट्रे मध्ये भेळच्या प्लेट्स घेऊन आला, "ही भेळ घ्या. मी मोबाईल सेट करतो. सर्वांचे फोटो निघतील आणि रिलही बनवू."
क्रमश :
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
धन्यवाद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा