दीर्घकथा लेखन स्पर्धा
DINK भाग 22
फोटो काढून झाल्यावर तेजसने सर्वांना कॉफी दिली.
"मी मोबाईल पकडतो. तुम्ही सर्व छान रिल बनवा." तेजस कॉफी मग टेबलवर ठेवून म्हणाला.
"हो हो नक्कीच." कुणाल बोलला.
"तुम्ही त्रास कशाला घेता. आम्ही..." अनिताचे वाक्य पूर्ण होण्याआधीच जिजाने तिचा हात दाबला. तिचा इशारा समजून अनिता गप्प झाली.
"पिहू उभी नाही होऊ शकत आपण बसूनच रील बनवू." ललित म्हणाला.
" काय ना लहान लेकरासारखे चाळे करतोय आपण. " पिहू हसून त्यांना म्हणाली.
" मित्र मैत्रिणींमध्येच असे चाळे चालतात. पुढील भेट कोणास ठाऊक आणखी किती महिन्यांनी होईल. " अजित बोलला.
"चला ठरवा लवकर काय करायचे ते. पहाट व्हायला आली आहे एक एक तास तरी झोप झाली पाहिजे आपली." अनिता म्हणाली. एकसारखे हावभाव व हात वारे असलेली खंडेरायाच्या लग्नाला व दोन तशाच प्रकारच्या रिल बनवायचे ठरले.
रिल बनवून झाल्यावर एक एक करून सगळे आत झोपायला जाऊ लागले. ललितने सर्वांना त्याच्या फ्लॅटवर झोपायला यायचे सांगून सर्वात आधी तिथून काढता पाय घेतला. अनिता, पिहूला विचारनार तोच जीजाने तिचा हात पकडून अजितच्या हातात दिला,
" तुझं झालं कल्याण आता तिचं होऊ दे. "
" तुझं झालं कल्याण आता तिचं होऊ दे. "
कुणालने इशारा समजून डोळे मोठे करत तोही ललितच्या शेजारी बेडवर पडला.
"तु जागीच राहणार आहेस का?" पिहूने तेजसला विचारले.
" झोप तर खूप आली आहे पण एका मुलीला एकटं सोडून जाणे बरे नाही वाटत. " तेजस उत्तरला.
"हो का?" पिहू स्वतःशीच हसली.
" काय झालं हसायला? " तेजसने विचारलं.
" एरवी मला बाथरूम मध्ये जाण्यासाठीही एकटे न सोडणारे माझे मित्र मंडळ आज मला चक्क एका अनोळखी व्यक्ती बरोबर माझ्या पायाला लागले असतानाही एकटे सोडून गेले आहे. " पिहू त्याला म्हणाली.
" याचा अर्थ माहित आहे? " तेजस तिच्या शेजारी सरकून तिला म्हणाला, " त्यांना माझ्यावर फार विश्वास आहे. त्यांना विश्वास आहे की तो मीच आहे ज्याची त्यांची मैत्रीण आतापर्यंत वाट पाहत होती. "
" हे जरा जास्त नाही झालं का? म्हणजे स्वतःवर इतका विश्वास कुठून येतो? " पिहू मिश्किलपणे त्याच्या डोळ्यात बघत त्याला म्हणाली.
"पिहू, कारण तुझी नजरही तेच सांगत आहे." तेजस तिला म्हणाला.
" आहेस तू हँडसम, मिळकतही चांगली आहे. कॅरेक्टरही बरे आहे. असा मुलगा भेटल्यावर थोडेफार डामाडोल होतं मन. त्यात काय?" पिहू त्याच्या गालावर बोट ठेऊन म्हणाली. ते दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ आले होते. तेजसला राहावलं नाही. त्याने मागचा पुढचा कशाचाही विचार न करता तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवून तिच्या ओठांचे अलगद चुंबन घेऊन तो तिच्या डोळ्यात पाहू लागला. तिने त्याचा चेहरा हातात घेऊन त्याच्याच पद्धतीने त्याच्या ओठांवर ओठ टेकवले. अलगद चुंबन घेऊन ती बाजूला झाली व स्वतःशीच हसू लागली. कारण ती हे सगळं कधीतरी कोणासोबत करेल असे तिला कधीच वाटले नव्हते. काही वेळ दोघेही इकडे तिकडे पहात शांत बसले. मग तेजसच बोलता झाला,
"पिहू मला आपल्या पहिल्या भेटीपासूनच तू फार वेगळी वाटलीस. तुझी काम करण्याची पद्धत, तुझी जीवनशैली, तुझं आत्मसन्मानाने वागणं, सगळंच मला खूप आवडले आहे. मला वाटतं आपण एकमेकांसोबत, एकमेकांना जाणून घेण्यासाठी वेळ घालवायला हवा."
"पण माझी विचारसरणी इतर मुलींसारखी राजकुमाराची वाट पाहत बसणारी नाही आहे हा. मी खूप जास्त स्वातंत्र्य प्रिय आहे. काही लोकं याला स्वैराचारही म्हणतात." पिहूने त्याला तिचे मत स्पष्टपने सांगितले.
" स्वतःच्या चाळीशीत गेल्यावर इतकी समज तर आलीच आहे मला. कुछ तो लोग कहेंगे लोगो का क्या है करना. मीही इतर मुलांसारखा नाही आणि म्हणूनच अजूनही मी गर्लफ्रेंड वगैरेच्या फंदात पडलो नाही. " तेजसने त्याच्याविषयी, तिला सांगितले, "एकटं कोणाचीही रोखटोक नको म्हणून दोन वर्ष आधी मी हे पेंत हाऊस घेतले आहे. मला आवडतो माझा एकांत. पण आज तु त्यात शिरली आणि एक वेगळाच अनुभव आला. आता एकटं राहण्याची मुळीच इच्छा नाही."
"अच्छा, बघू कुठवर जाऊ शकतो आपण." पिहू बोलली.
" सध्या तरी बेडरूम पर्यंत जायला हवे. " तेजस तिला उचलत म्हणाला.
"हे काय आहे?" पिहूने आश्चर्याने त्याच्याकडे बघितले.
क्रमश :
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
धन्यवाद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा