दीर्घकथा लेखन स्पर्धा
DINK भाग 24
"मी ब्लॅक बेल्ट आहे बरं." पिहू त्याला म्हणाली.
"मी तुझी संपूर्ण माहिती काढली आहे." तेजस तिला बेडवर ठेऊन म्हणाला, "उगीच मला भिती दाखवू नकोस."
"बापरे, मला वाटलं नव्हतं कोणी अशाप्रकारे माझ्या मागे लागणार असं." पिहू तिच्या छातीवर हात मारून नाटकी अंदाजात बोलली.
"बस बस. माझं मत परिवर्तन होईल नाहीतर तुझ्याबद्दल." तेजसने तिचा मोबाईल तिच्या बाजूला ठेवला.
"असं असेल तर मग गूड नाईट. जा झोप." पिहूने त्याला गम्मतच धक्का दिला.
"अच्छा!" तो तिचा हात पकडून तिच्यावर वाकला तसे तिने डोळे मिटून घेतले. तो मात्र तिच्या माथ्यावर ओठ टेकवून गोड पप्पी घेऊन बाजूला झाला. तिच्या अंगावर पांघरून देत तिला म्हणाला, "तसं मनात खूप काही आहे पण आजसाठी इतकं पूरे."
पिहू स्वतःशीच लाजली. त्या काही क्षणात तिच्या छोट्याशा डोक्यात काय काय येऊन गेलं. तिला स्वतःच्या विचारांवर हसू आलं. तिने आपल्या डोकयावर हात मारला व पांघरून स्वतः भोवती घट्ट करून तिने डोळे मिटले. मात्र तेजसच्या विचारांनी तिला बराच वेळ झोपू दिले नाही. एक दिड तास मोबाईलवर वेब सिरीज पाहता पाहता पहाटे सहाच्या जवळपास तिचा डोळा लागला.
रविवार असल्यामुळे तशी काही घाई नव्हती. पण अनिता, जिजा व कुणाल यांना कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे सकाळी लवकर उठून घरी जाणे भाग पडले. पिहू ला जाग आली तेव्हा नऊ वाजून गेले होते. ती उठून हळू हळू पाय उचलत बाहेर आली. घरकाम करणारी ताई झाडझुड करतांना तिला दिसली.
" मॅडम उठलात तुम्ही. काही हवे तुम्हाला? " घरकाम करणाऱ्या ताईने पिहूला बघताच विचारले.
" कोणी दिसत नाही आहे साहेब वगैरे? " पिहुने तिला उलट प्रश्न केला.
" साहेब सकाळीच कुठेतरी गेले. तुम्ही नाश्त्यात काय खाणार आहात? मी बनवून देते." कामवाली ताई तिला म्हणाली.
" मला फक्त गरम गरम चहा बनवून दे. बाकी काही नको." पिहू बोलली.
" पण साहेब म्हणाले तुम्हाला रिकाम्या पोटी पाठवायचे नाही. साहेबांसाठी सँडविचेस बनवले होते तुम्ही खाऊन पाहणार? " कामवाल्या ताईने विचारले.
" ठीक आहे. चहा सोबत घेऊन ये. मी फ्रेश होऊन बाहेर येते . " पिहू उत्तरली.
पिहू परत बेडरूम मध्ये गेली. तेव्हा तिची नजर बेडच्या साईट टेबलवर पडली. टेबलवर एक नोटपॅड ठेवून होते. पिहूला, डिजिटल युगातही तेजसचे फिजिकल डायरी वापरण्याची आठवण झाली. काय लिहिले असावे या नोट पॅड वर या कुतूहलापोटी तिने ते नोटपॅड वाचायला घेतले.
पिहू परत बेडरूम मध्ये गेली. तेव्हा तिची नजर बेडच्या साईट टेबलवर पडली. टेबलवर एक नोटपॅड ठेवून होते. पिहूला, डिजिटल युगातही तेजसचे फिजिकल डायरी वापरण्याची आठवण झाली. काय लिहिले असावे या नोट पॅड वर या कुतूहलापोटी तिने ते नोटपॅड वाचायला घेतले.
"प्रिय, पिहू. "
सुरुवातीचे दोन शब्द वाचताच तो मजकूर तिच्यासाठीच लिहिलेला असल्याचे तिच्या लक्षात आले. ती पुढे वाचू लागली,
सुरुवातीचे दोन शब्द वाचताच तो मजकूर तिच्यासाठीच लिहिलेला असल्याचे तिच्या लक्षात आले. ती पुढे वाचू लागली,
"तुझ्याशी बोलून, तुझा हात हातात घेऊन तुझा निरोप घ्यायची इच्छा तर खूप होती. मात्र तुला साखर झोपेत निवांत झोपलेलं पाहून विचार बदलावा लागला. स्वतःची काळजी घे. ललित सांगत होता तुला हा पेंत हाउस खूप आवडला आहे आणि मीही आतापासूनच तुला या घराची मालकीण मानत आहे. तरीही पुढे आपल्या रिलेशनशिपचे काय होईल ते होऊ दे. खाली या पेंत हाऊसच्या लॉकचा पासवर्ड देत आहे. तुला हवं तेव्हा निसंकोचपने येत जा आणि राहत जा. तुझाच, तेजस."
पिहू पुन्हा स्वतःशीच लाजली. तिच्यासाठी हे सर्व अगदी स्वप्नवत होते. तिला विश्वासच बसत नव्हता की तिच्याही आयुष्यात कोणीतरी तिच्यावर जीव ओवाळून टाकणारं आलं आहे. तेही इतकं परफेक्ट कसं? म्हणजे पैसा, बँक बॅलन्स, गाडी बंगला, नौकर चाकर, दिसण्यातही उजवा, चांगल्या कुटुंबातला. असं कसं सगळं तिला मिळत आहे? ती दात घासायला ब्रश हातात घेऊन आरशासमोर उभी झाली. तिचे मन तिला म्हणाले,
"बाई पिहू, तो सगळ्या गोष्टीत उजवा आहे तर तुही कुठे कमी आहेस? जे त्याच्याजवळ आहे ते सगळं कमावण्याची अक्कल तुझ्याकडे आहे. तु सेल्फमेड आहेस, आज स्वतःच्या बळावर तू उभी आहेस. इतर मुलींसारखे आधाराला खांदे नको आहेत तुला. म्हणूनच तू ही त्याच्या नजरेत भरली आहेस. तेव्हा स्वतःला त्याच्यासमोर कधीही कमी लेखायचे नाही. अहंकार नको, पण स्वाभिमान असू दे. त्याची भुरळ पाडून स्वतःचे अस्तित्व संपवू नकोस. अजून दिल्ली खूप दूर आहे. आताच स्वप्न रंगवू नकोस."
क्रमश :
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
धन्यवाद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा