दीर्घकथा लेखन स्पर्धा
DINK भाग 25
पिहू आणि तेजस च्या गाठीभेटी वाढल्या. हळू हळू त्यांना एकमेकांचे गुण दोष समजून येऊ लागले. तरीही त्यांनी गुणांसारखे दोषासोबतच एकमेकांचा स्वीकार करणे सुरू केले. दरम्यान रिद्धीची डिलिव्हरी जवळ आली. ऑफिसमध्ये आपल्या एका स्थानावर पोहोचलेल्या रिद्धीलाटीची पत प्रतिष्ठा सोडून जाणे फार कठीण होते. ती बाळाचा जन्म होईपर्यंत काम करू इच्छित होती मात्र मॅनेजमेंटने असल्या प्रकारची कोणतीही रिस्क घ्यायची नाही असे स्पष्ट सांगून, पंधरा दिवसाची गॅप ठेवून रिद्धीला सुट्टीवर पाठवले. अर्थातच रिद्धीची जागा खाली होताच त्यांनी मार्केटिंग क्षेत्रात अनुभवी असलेल्या त्यांच्या एम्प्लॉयी पिहूला मुंबईला बोलवले. रिद्धी पाहत असलेल्या एका मोठ्या ब्रँडच्या जाहिरात बनवायचे कामही पिहूला सोपवण्यात आले जे रिद्धीला मुळीच रुचले नाही. तिच्या सोबत काम करणाऱ्या व पिहूला नापसंत करणारे तिचे सहकारी वेळोवेळी तिला फोन करून ऑफिसमधील घडामोडी तिच्या कानावर टाकायचे काम करत चोखपने पूर्ण करत होते. त्या सर्वांना पिहूचे जबाबदारी मुक्त, आत्मनिर्भर आयुष्य कुठेतरी खुपत होते म्हणून ते सतत तिला तोडण्याचा प्रयत्न करत. ती मात्र मन लावून तिचे काम करण्यात व करवून घेण्यात गुंतलेली.
तिकडे रिद्धीची प्रसूती झाली. तिने गोंडस मुलाला जन्म दिला. शशीची मंशा पूर्ण झाली. बाळाला पाहून रिद्धीलाही आनंद झाला. मात्र तिच्या सासूबाईने तो जास्त काळ टिकू दिला नाही. रिद्धीचे सिजर झाल्यामुळे तिला दुध आले नाही. रिद्धीला एकदम बसले करता येत नव्हते म्हणून बाळाला डॉक्टरने दिलेल्या पावडरचे दुध बनवून पाजण्याचे काम सासूबाईला देण्यात आले. ते करतांना त्यांच्या नाकी तोंडी वया पडू लागल्या.
"असं कसं दूध नाही आलं हिला?" विचारत त्या रिद्धीला तपासायला आलेल्या डॉक्टर मागे लागल्या.
"काकू नाही येत एखाद्याला ऑपरेशन झाल्यावर. उद्या येईल." डॉक्टरने कसेतरी सासूबाईला सलटवण्याचा प्रयत्न केला. मात्र सासूबाई काही शांत बसायला तयार नाही. तिने डॉक्टरला उलट प्रश्न केला,
"आणि नाही आलं तर असंच पावडर पाजायचं बाळाला?"
"तुम्हाला सकारात्मक विचार ठेवायला काय होतं आई?" रिद्धीला चिडचिड झाली.
"मी तुझ्यासाठीच विचारत आहे. बाळाला दुध नाही पाजलं की छातीत गाठी होऊन पुढे ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका असतो."सासूबाई बोलली.
"शशी, तुझ्या आईला येथून घेऊन जा. यांना मी स्वस्थ बसलेली चांगली दिसत नाही." पिहू बाळाला घेऊन असलेल्या शशीवर संतापली.
"आई, तू तिकडे चल बरं. डॉक्टर तिला चेक करत आहेत ना." शशी त्याच्या आईला घेऊन रिद्धीच्या खोलीतून बाहेर गेला. तरीही त्याची आई बोलतच होती,
"अरे मी तुमच्याच काळजीपोटी बोलत आहे. ही तुझी बायको काही ऐकूनच घेत नाही. तरी मी म्हणत होती बाळ लवकर होऊ द्या, दिवस राहल्यावर सांगत होते तिला दूध येण्यासाठी काय काय खायचे आहे. पण ऐकणार माझी कधी? तिला तर फक्त तिच्या कामाचीच पडली होती. कशी सांभाळेल बाळाला देव जाणे?"
"तु आहेस ना सोबतीला, झालं मग." शशी त्याच्या आईला म्हणाला.
" मला नाही वाटत तिचा हा असा टेम्पर पाहून मी इथे तुमच्या सोबत जास्त दिवस थांबणार. " त्याच्या आईने स्पष्ट सांगितले.
तिकडे आत मध्ये रिद्धी तिचे डोकं पकडून बसली. तिला घरी गेल्यावर बाळ कसं सांभाळायचं यापेक्षा जास्त चोवीस तास सासूबाई सोबत कसे घालवायचे याचे टेन्शन आले होते. बाळंतीण मुलीला मदतीचा हात देण्यासाठी रिद्धीकडे तिची आई सुद्धा आली. आईला पाहून, तिच्याशी बोलून रिद्धीला छान वाटलं. बऱ्याच दिवसांनी तिने निवांत वेळ तिच्या खोलीत घालवला. मात्र ही जणू येणाऱ्या वादळापूर्वीची शांतता म्हणावी असे झाले. रिद्धीच्या आई वर सासूबाईत जेवण काय बनवायचे, बाळाच्या मालीशला कोणते तेल वापरायचे? मोलकरणीला काय काम सांगायचे? अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांच्यात वाद होऊ लागले.
ज्याने रिद्धी त्रस्त झाली. आधीच बाळाची रडारड, त्यात तिला प्रसूती नंतर होणारा पोस्ट पार्टमचा त्रास. ती तासनतास खोलीतच पडून राहू लागली.
अशातच पिहूला रिद्धीच्या सोपवलेल्या ब्रँड जाहिरातीच्या प्रोजेक्टची ओरिजिनल फाईल घेण्यासाठी जावे लागले.
क्रमश :
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
धन्यवाद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा