Login

पौष्टिक डिंकाचे लाडू.. रेसिपीज इन मराठी

पौष्टिक डिंकाचे लाडू थंडीत खाल्ल्याने खूप फायदा होतो

थंडी म्हटली की आपल्याला आठवतात ते डिंकाचे लाडू, आईच्या हातचे लाडू म्हणजे पर्वणीच. थंडीत खूप फायदा होतो हे लाडू खाल्ल्याने, तसचे आपल्या शरीराला गरजेचे असतात यातले घटक. सकाळी सकाळी एक ग्लास दूध आणि हा एक लाडू खाल्ला की भूकच लागत नाही लवकर. 



डिंकाचे पौष्टिक लाडू


साहित्य : पावकिलो खारीक , पावकिलो सुके खोबरे , पावकिलो गुळ , खसखस १०० ग्रॅम , डिंक १५० ग्रॅम किंवा त्यापेक्षा जास्त ही घेऊ शकता , काजू बदाम पिस्ता प्रत्येकी १०० ग्रॅम , मनूके आवडत असतील तर घाला , गोडंबी १०० ग्रॅम , आळीव १०० ग्रॅम , वेलदोडा अर्धा , तुप पावकिलो ...

कृती : प्रथम खारीक बारीक कुटुन त्याची जाडसर पावडर करायची , खोबरे किसून भाजून घेणे , खसखस ही भाजून घेणे , काजू बदाम पिस्ता गोडंबी मिक्सरमध्ये जाडसर बारीक करणे , आळीव पण मिक्सरमध्ये चांगले बारीक करणे , वेलदोड्याची बारीक पुड करणे , डिंक तुपात खरपूस तळुन घेणे आणि तो ही मिक्सरमध्ये जाडसर बारीक करणे  ... हे सर्व पदार्थ एका ताटात एक एक करून घालणे ...  आता पॅनमध्ये तुप घालून त्यात गुळ वितळून घेणे आणि ताटामधल्या मिश्रणात ओतून घेणे ... सर्व पदार्थ व्यवस्थित एकत्र एकजीव करून घ्यायचे ... गरम गरम आहे तोवरच लाडू बांधून घेणे ... नंतर मिश्रण थंड झाल्यास लाडू बांधून होत नाही ... मध्यम आकाराचे लाडू बांधावे ... उपवासाला देखील हे लाडू खाऊ शकता ... हे लाडू थंडीत खुप पौष्टिक असतात .

     तुम्ही नक्की करून बघा हे पौष्टिक डिंकाचे लाडू. 

किचन तुमचे आणि रेसिपी माझी. 

अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला वाचत रहा आणि 

रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका 


धन्यवाद


🎭 Series Post

View all