Login

दिपा भाग चार अंतिम

बहीण _ मानले तर नाते रक्ताचे नाहीतर धन परक्याचे
जलद कथालेखन.
पडद्यामागची ती_- दिपा.
भाग अंतिम _ चार.


गणेश उत्त्सवाचे दहा दिवस होते ते...बाहेर पाऊस थांबायला तयार नव्हता...आणि दिपाचा छोटा चार वर्षांचा मुलगाही तापाने फणफणला होता...आता दिपाची मनस्थिती अतिशय केविलवाणी झाली होती...तिकडे अप्पांना भेटायला जाणे जमले नाही तर लगेच अप्पा तिची आठवण काढून धोसरा धरायचे....हे तिला माहीत होते....पण ती वेळच अशी साधून येत होती की तिच्या पुढे असेल त्या परिस्थितीला साथ देण्याशिवाय पर्यायच नव्हता....
दिपाच्या मुलाला चार दिवस औषध पाण्याची गरज होती.बाहेर पावसाची धार थांबायला तयार नव्हती.तिचे मन अप्पा माई कडे धाव घेत होते.आणि व्हायचे तेच झाले...


त्या सकाळी सकाळीच फोन वाजला, तिने फोनवर माईंचे नाव बघितले.आणि छातीत एकदम धस्स झाले तिच्या ..'.एवढ्या सकाळी फोन...?'

दिपा __" हॅलो माई..."
एवढंच बोलल्यावर तिकडून माईंचा आवाज आला.

" ये ग लवकर , कुठं आहेस तू...?"
माई रडत होत्या.

जे व्हायचे ते झाले होते.अप्पा निमूटपणे हे जग सोडून देवाघरी गेले होते.


अप्पांचा अंत्यविधी सोयीस्करपने पार पडला होता. दिपाच्या मनात कसलेतरी अस्वस्थतेचे विचार सतावत होते.तिचा मुख्य आधार तिला कायमचा सोडून गेला होता.


दिपा तिच्या मुलाला नवऱ्याकडे सोपवून दोन दिवस माई सोबत प्रकाशच्या घरी राहिली होती.आणि तिसऱ्या दिवशी प्रकाश आणि त्याच्या बायकोने ..' सर्व काही सुरळीत पार पडले आहे.'आता तिकडे कोणीही नातेवाईकांनी थांबू नये.अशी वर्तणूक चालू केली होती . दिपाही मग तिसऱ्या दिवशीच घरी परत गेली होती.


एकदा परिस्थितीचे भय संपले की समाज तो कसला? कुठलं नातं? कसले नियम? कसले कायदे? आणि कसली ती औपचारिक परंपरा..??

आता जनजीवन पूर्ववत येत होते.दुःखातून सावरू लागली होती दिपा.आणि इतर काही हितचिंतक नातेवाईक चौकशी करत होते तिच्या कडे.

राहून राहून तिलाही तो दिवस आठवत होता...
.... ज्या दिवशी दिपा अप्पांना भेटायला हॉस्पिटल मध्ये गेली होती. प्रकाशची बायको त्यांच्या रूमच्य बाहेरच्या बेंचवर फोन घेऊन बसली होती.

अप्पानी दिपाकडे बघीतले अन् अगदी खोल स्वरात म्हणाले होते की , " मला एकच मुलगा आहे."

दिपाला जे समजायचे ते समजले होते.

" काय झाले अप्पा.कोणी आले होते का तुमच्या ऑफिसमधून,..?"

परत परत तेच ,' मला एकच मुलगा आहे.असे पुट पुटत होते अप्पा.

" नका त्रास करून घेऊ. नंतर बघू काय ते. हि वेळ योग्य नाही.आताच कोमातून बाहेर आला आहे तुम्ही. माझे टेन्शन घेऊ नका."

दिपाचे ते बोलणे ऐकून स्थिरावले होते ते.आणि प्रकाशचा कट कारस्थान करण्याचा मार्गही आपसूकच मोकळा झाला होता.

किंवा दिपानेच तो करून दिला होता.स्वखुशीने.चांगुलपणावर विश्वास ठेवून .

आणि प्रकाशने जन्मदात्या चा विश्वास घातकी डाव करण्याचा.

बायकोला सोबत घेऊन चार आठ दिवसात अप्पांच्या ऑफिसची सगळे डॉकुमेंटेशन पूर्ण करून घेतले त्याने आणि आता तो एकटाच मुलगा दिसणार होता .कागदोपत्री.अगदी आपसुकपने स्वतःचे एकट्याचे नाव पैशाच्या नॉमिनेशनला लावून घेतले होते त्याने.

त्याची स्वतःची दोन मुले लहानची मोठी करून घेतली होती ,त्याने अप्पाकडून ...

त्याच्या संसाराची जबाबदारी पार पाडताना जीव घालवला होता अप्पांनी..

अन् एकुलत्या एक बहिणीचा विश्वास घात करवून घेतला ,त्यांचाच कडून...

हॉस्पिटल मधून घरी जायचे होते ना त्यांना,उर्वरित परावलंबी जीवन जगण्यासाठी ...

परिस्थिती पुढे हतबल झाले होते .

पैसा हेच सर्वस्व .हे सिद्ध केले होते प्रकाशने.


गेलेले दिवस आणि वाईट आठवणींनी आजही दिपाचे डोळे पाणावतात.आणि तिचे निरपेक्ष मन मात्र अभिमानाने ऊंचावते.


पैसा काय कितीही मिळवला,कसाही मिळवला ,कोणत्याही मार्गाने मिळवला.तरी कमीच पडतो. नीतिमत्तेची साथही आवश्यक असते.

नाहीतर शेवट कोणाला टळलाय का.?दिवस कोणासाठी थांबतात का.?
परमेश्वराचा हिशोब कधी चुकतो का.?
मनुष्याच्या हतबलतेला काही पर्याय आहे का.?

मनुष्य एकटा या जगात येतो.
आणि जाताना एकटाच जातो.
इथले सर्व इथेच राहणार.जगाच्या अंतापर्यंत.
असेच चालणार.

दिपा सारख्या कितीतरी संमजसपणाचा बळी देणाऱ्या बहिणी आजही आपल्या बहुताली दिसून येतात.ज्या कधी ही व्यक्त होत नाहीत.कारण त्यांनी त्यागाच्या नितीमत्तेच्या पडाद्या मागे राहण्याचा मार्ग स्वीकारलेलाअसतो. आनंदाने, परमात्यावर
विश्वास ठेवून.
©® Sush.

( बहीण _ मानले तर नाते रक्ताचे.
.नाहीतर धन परक्याचे.)

🎭 Series Post

View all