Login

दिपा भाग _तीन

बहीण_ मानले तर नाते रक्ताचे नाहीतर धन परक्याचे
जलद कथा लेखन.
पडाद्यामागाची ती _- दिपा.
भाग _तीन.


अप्पा आणि माईचा खरतर त्यांच्या दोन्ही मुलांवर सारखाच जीव होता.तरीपण दिपा एकतर सासुरवाशीण आणि त्यात मुलगी असल्याने साहजिकच त्यांच्या मनात इतर सगळ्या आईवडिलांच्या मनात असते तशीच काळजी ही होती.


त्यांनी अगदी लहानपणा पासून दोघा भावा बहिणींमध्ये कधी मतभेद होऊ नयेत याचाच प्रयत्न केला होता.दोघांनी त्यांच्या नंतरही एकत्रित पने राहावे .आयुष्यात कधी एकमेकांना अंतर देऊ नये कारणे कोणतेही असावे पण नाते आयुष्यभर विसरू नये.असेच त्यांना वाटायचे.


प्रकाशचे लग्न झाल्यापासून तो बहीण दिपा सोबत जरासा दुरूनच वागतो .पहिल्या सारखे आपुलकी दाखवत नाही.तेवढ्यात तेवढे ठेवतो . बायको च्या म्हणजे त्यांच्या सुनेच्या इच्छेखातर अशी वागणूक ठेवतो. ही त्यांच्या साठी चिंतेची बाब होती.
पण जीवात जीव असे पर्यंत तरी दोन्ही मुला मध्ये अंतर येऊ दयायचे नाही .यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करायचेच.

आणि म्हणूनच त्यांच्या इतर पैशासंबधीच्या व्यवहारातही त्यांनी ही खबरदारी घेतली होती.त्यांचे नावे असलेले बँकांतील रक्कम यासाठी अप्पांनी जाणीव पूर्वक फक्त माईंनाच वारस म्हणून ठेवले होते.


अप्पांच्या दृष्टिकोनातून त्यांनी असे करणे म्हणजे एकतर हे त्यांची माईंबद्दल काळजी ,आणि दोन्ही मुलांमध्ये मनात कोणताही भेदभाव नसणे हे दाखवणे होते.

अप्पांचा अपघात हा प्रकाश आणि त्याची बायको यांच्या साठी एक चांगली संधी चालून आल्या सारखे झाले होते.अप्पांच्या सुनेचा मनसुबा असा होता की ,मुलगा म्हणून अप्पांचे
सर्व काही असेल नसेल ते त्यांनाच मिळावे.

योग्य वेळची संधी साधून अनेक वेळा घरामधे त्यांनी या विषयावर अप्पांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न ही केला होता.पण त्यातून ही अप्पा माई एकसाथीने त्यांना त्या विषयाला हुलकावणी देत असे.." एवढी काय घाई आहे.आम्ही नीट आहोत ना अजून बघू पुढे." असे बोलून टाळत असत.


हॉस्पिटल मधून घरी नेल्या नंतर ' ' 'दिपाही ' जमेल तसे अप्पांना भेटायला जात असे .आणि तेवढ्यात ही अप्पा माईंची ख्यालखुशाली विचारत असे.

सर्व साधारण परिस्थिती काय चालू आहे.याचा तिला पूर्ण अंदाज येत होता.पण कितीही समजले तरी त्याचा काही फायदा नसतो.
जेव्हा खाणारे आणि दाखवणारे दात ' दोन्ही आपलेच असतात .


अप्पा माईला काही विचाराव आणि त्यांनी काही विपरीत सांगावे .तरी प्रकाश हा दिपाचा सख्खा मोठा भाऊ होता.

निसर्गानेच त्याचेवर ही जबाबदारी दिली असेल तर अशा वेळी त्याला काहीही विचारणे म्हणजे तिच्या साठी
इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती होती.आणि तसेही तिच्यातला समंजसपणाने तिची आयुष्यभर परीक्षा घेतलेलीच होती.


अप्पांच्या देखरेखी मध्ये काही कमी जास्त दिसले तरी काही बोलण्याची मुभा तिला नव्हतीच.

" आम्ही एवढं करतोय तरी तुम्हाला विश्वास नसेल तर जा तुमच्याकडे घेऊन ." असे प्रकाशच्या बायकोने तिला ओघाओघाने सूनवलेही होते.


दिपाचा संसार म्हणजे तिची दोन लहान मुले आणि विक्षिप्त स्वभावाचा नवरा.जरी समजा तिने ..." अप्पाना मी माझ्या कडे घेऊन जाते ." असा विचार मांडला असता तर ते शक्य होऊ शकले असते का ?

अप्पांसाठी , माईंसाठी , प्रकाश साठी ही गोष्ट इभ्रतीची आणि पेचाची नव्हती का..?

आणि शिवाय ' कसेल त्याची जमीन ' आणि ' ज्याच्या हातात
ससा ' तोच पारधी..' अशीच सत्य परिस्थिती असते.

कितीही मनाला पटले नाही तरी हे कटू सत्य स्वीकारावे लागतेच.
त्यापेक्षा प्रकाश आणि बायकोच्या मर्जी प्रमाणे अप्पांना जसे ठेवेल तसे त्यांनी आयुष्याचे उरलेले दिवस काढायचे हेच सर्वांच्या हातात होते.

(पुढे वाचू अंतिम भाग _ चार .)
©® Sush.

🎭 Series Post

View all