जलद कथा लेखन.
पडद्यामागची ती _- दिपा.
भाग _ दोन.
पडद्यामागची ती _- दिपा.
भाग _ दोन.
अप्पांची ट्रीटमेंट हॉस्पिटलमध्ये चालू झाली.आज हे उद्या ते,आणि मग ऑपरेशन .आणि नंतर ऑपरेशनचे विपरीत परिणाम म्हणजे ,' कोमात जाणे.'
चालता बोलता , हसता खेळता ,निरोगी माणूस अचानकपणे असा अतिनिद्रेच्या अधीन होऊन जातो.आणि मग मेडिकल सांगते की आता सगळी आशा देवावरच .
या दरम्यान दिपा तिला जमेल तसे .
अप्पांना भेटायला जात असे.ते अतीनिद्रेच्या स्वाधीन झालेले बघून तिचा आत्मा ही व्याकूळ होत होता.
या दरम्यान दिपा तिला जमेल तसे .
अप्पांना भेटायला जात असे.ते अतीनिद्रेच्या स्वाधीन झालेले बघून तिचा आत्मा ही व्याकूळ होत होता.
कोणीतरी असे म्हंटलेले तिला आठवले की,माणूस कोमात जरी गेला असला तरी त्याचे आंतरिक मन आतूनच साद प्रतिसाद देत घेत असते.
दिपा त्यांच्याशी तशाही अवस्थेत संवाद साधण्याचा प्रयत्न करायची.आणि दिपाची प्रार्थना खरोखर परमेश्वराने ऐकली .आणि आठ दहा दिवसांनी अप्पा कोमातून शुद्धीवर आले होते.
पण ह्या अचानकपने आलेल्या अघटीत अनुभवाने मात्र प्रकाश खुप भांबावून गेला होता.
त्यांच्या संसारातला सर्वात मुख्य आधार म्हणजे त्याच्या कुटुंबाची सर्व जबाबदारी घेणारी व्यक्तीच आता निरोपायोगी होणार होती.
आणि दुसरे सगळ्यात महत्वाचे म्हणजे
अप्पांकडे असलेला त्यांचा ' त्यांच्या स्वतःच्या कष्टाचा. त्यांनी आयुष्यभर कष्ट करून जोडलेला ." पैसा."
अप्पांकडे असलेला त्यांचा ' त्यांच्या स्वतःच्या कष्टाचा. त्यांनी आयुष्यभर कष्ट करून जोडलेला ." पैसा."
आता अप्पाना पूर्वी सारखे हालचाल करता येणार नव्हती.आणि उलट त्यांचे
खर्चही वाढणार होते.
खर्चही वाढणार होते.
त्यांच्याकडे असलेला त्यांचाच पैसा त्यांना सुद्धा दुसऱ्याच्या मदती शिवाय वापरता येणार नव्हता.
चारही बाजूने विचार करून प्रकाशने शेवटी निर्णय घेतलाच. अप्पांना जर कोमात असताना देव आज्ञा झाली असती तर.पुढचा किती व्याप वाढला असता. असाही विचार त्याच्या डोक्यात येऊन गेला.
इकडे दिपा तर तिची छोटी दोन शाळेत जाणारी मुले आणि संसार .त्यातच नवऱ्याचा विक्षिप्त स्वभावाला तोंड देत देत एक एक दिवस पुढे ढकलत होती.
अप्पा माई आणि भाऊ प्रकाश हेच तिचे जीवाभावाचे ,हक्काचे माहेर होते.
अप्पा माईला काही होऊ नये म्हणून देवा जवळ प्रार्थना करण्यावाचून दुसरे ती काय करू शकणार होती.
अप्पा माईला काही होऊ नये म्हणून देवा जवळ प्रार्थना करण्यावाचून दुसरे ती काय करू शकणार होती.
.स्वतःचा संसार ,छोट्या मुलांना एकटे सोडून तिकडे हॉस्पिटल मध्ये त्यांच्या सेवेसाठी ,देखरेखीसाठी मुक्कामी राहू शकत नव्हती.
स्वतःच्या घरातील जबाबदाऱ्या सांभाळून वेळात वेळ काढून अप्पांना भेटण्यासाठी हॉस्पिटल मध्ये जाणे त्यांची विचारपूस करणे,तेवढ्या कालावधी मध्ये जेवढे सुख दुःखाचे बोलता येईल ते बोलणे आणि त्या नाजुक प्रसंगी जन्मदात्याना मायेचे दोन शब्द बोलणे एवढेच काय तर तिच्या हातात होते...
असेच एके दिवशी बोलता बोलता अप्पा तिला म्हणाले होते की, ....
" दिपा काय ग चुकले असेल माझ्या कडून आयुष्यात म्हणून परमेश्वराने मला हे असे दिवस दाखवले असतील."
" दिपा काय ग चुकले असेल माझ्या कडून आयुष्यात म्हणून परमेश्वराने मला हे असे दिवस दाखवले असतील."
" होईल सगळे ठीक अप्पा ..." अशा आशेच्या शब्दांचा दिलासा दिपा तिच्या परीने देत होती...
आणि त्या नंतर आठवडा भरात अप्पांना हॉस्पिटल मधून घरी नेले होते...
( बहीण _ मानले नाते रक्ताचे ..
नाहीतर धन परक्याचे ..
वाचूया पुढील भाग _ तीन .मध्ये )
©® Sush.
नाहीतर धन परक्याचे ..
वाचूया पुढील भाग _ तीन .मध्ये )
©® Sush.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा