जलद कथा लेखन.
पडद्यामागची ती._- दिपा
' अप्पा ' साधारण वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेले.
अगदी प्रामाणिकपणे नोकरी करणारे.
रिटायर्ड झाल्या नंतरचे आयुष्य असेल त्या परिस्थितीतही समाधानाने जगायचे अशी त्यांची साधी सरळ विचारसरणी असलेले .
अगदी प्रामाणिकपणे नोकरी करणारे.
रिटायर्ड झाल्या नंतरचे आयुष्य असेल त्या परिस्थितीतही समाधानाने जगायचे अशी त्यांची साधी सरळ विचारसरणी असलेले .
आयुष्याने जे काही दिले ,आयुष्यात जे काही केले,ते सर्व ' असावे सादर ' या मताचे.
कुणाला कधी दुखवायचं नाही,आणि दुखवणाऱ्यांच्या नादी लागायचे नाही.हे त्यांचे आयुष्या बद्दलचे साधे सोपे गणित होते.
स्वार्थीपणाचे डावपेच त्यांना कधी जमले नाहीत ,आणि त्याबद्दल ते कधी खंत व्यक्त करत नव्हते.
समोरचा व्यक्ती जे बोलत आहे किंवा सांगत आहे त्याला हो ला हो केले.म्हणजे विनाकारणच वाद निर्माण होत नाहीत .असे ते नेहमी सांगायचे.
' माई ' सुद्धा सत्तरिला आलेल्या.त्याही नोकरदार होत्या. त्यामुळे दिवसाची सुरवात सूर्योदयाच्या आधीच करून चंद्रदर्शनाने दिवसाची सांगता करायची .कामाची आणि संसाराची जबाबदारी मनोभावे आणि हौसेने
स्वीकारलेली .
' ये जीवन हैं, इस जीवन का यहीं हैं यहीं हैं रंग रूप .' याप्रमाणे आयुष्याला स्वीकारले की मग का आणि कशासाठी ,कसला अट्टाहास करायचा..? त्या पेक्षा कसलीही परत फेडीची अपेक्षा मनात ना धरता स्वतःला करता येईल तेवढे करायचे .
स्वीकारलेली .
' ये जीवन हैं, इस जीवन का यहीं हैं यहीं हैं रंग रूप .' याप्रमाणे आयुष्याला स्वीकारले की मग का आणि कशासाठी ,कसला अट्टाहास करायचा..? त्या पेक्षा कसलीही परत फेडीची अपेक्षा मनात ना धरता स्वतःला करता येईल तेवढे करायचे .
माई सुद्धा रिटायर्ड नंतरचे आयुष्य अप्पांच्या सोबतीने जसे आहे तसे समाधानात राहत होत्या.
अप्पा माईंचा मोठा मुलगा प्रकाश त्याच्या बायको आणि दोन छोट्या मुलांसोबत अप्पा माईंच्याच सोबत एकत्रच रहात होते.
प्रकाश आणि त्याची बायकोही नोकरी करणारी असल्याने त्यांच्या छोट्या मुलांची पूर्ण जबाबदारी दिवसभरासाठी अप्पा माईंवरच असायची.
जगरहाटी प्रमाणे म्हणा हवं तर ,अप्पा माईंची नातवंडे म्हणजे त्यांचे पूर्णत्वास नेऊ घातलेले त्यांच्या आयुष्यातले शेवटचे कर्तव्यच.
अप्पा माई ने रिटायर्ड नंतरही कामाची आणि कष्टाची सवय तशीच पुढेही चालू ठेवली होती.
स्वतःची काळजी स्वतः घेणे.आणि स्वतःच्या कर्तव्यांना आनंदाने स्वीकारणे हे त्यांच्या स्वभावातच होते.
दिवसभराचे रूटीन सांभाळून वेळेवर आहार विहार ,उतार वयातील रोजची सवयीची औषधे , पथ्यपाणी ,देवधर्म ,समाजाशी बांधिलकी ,यामुळे पंच्याहत्तरीतही अप्पा सर्व जबाबदाऱ्या हसत खेळत निभावत होते.
प्रकाशच्या मुलांना अगदी नर्सरी पासून ते हायस्कूल पर्यंत शाळेत पोचवणे ,आणणे,त्यांच्या शाळेच्या मीटिंग्ज.सर्व प्रोग्राम ,शाळेचे रिपोर्ट्स ...सगळचं.अगदी काटेकोर पणे अप्पाच बघायचे.
आणि नातवंडांचे दिवसभराचे खाणे पिणे,खेळणे पडणे,वाढत्या वयातील आजारपणे माई सांभाळयच्या.
अप्पा माईंचे दुसरी मुलगी म्हणजे त्यांची लाडकी ' दिपा ' लाडकी यासाठी की ,एकतर त्यांची कुटुंबातील धाकटी आणि मुलगी असल्याने सासुरवाशीण.
पण म्हणतात ना,रेसचा घोडा जो पर्यंत भरधाव पाळतो तो पर्यंतच त्याचे महत्व .नाहीतर...
माणसांचे ही काही वेगळे नसतेच...
माणसाचे जीवन रेसच्या घोड्या सारखेच असते.
दम असेल तो पर्यंत जीव घेऊन पळत राहायचे.
आणि नेमके तसेच झाले.
थोडीशी गफलत झाली .
.आणि अप्पा त्यांच्या टुव्हीलर गाडीवरून पडले.
आणि पायाला फ्रॅक्चर झाले.
आता त्यांचे औषधपचार आणि देखरेखीची जबाबदारी प्रकाश वर पडली.
अप्पा माई खरतर खूप धीराचे .
आयुष्यभर सगळ्या प्रकारचे अनुभव पचवून स्थिरावलेले.
अशा नाजूक प्रसंगी धीर खचू द्यायचा नाही,असा त्यांचा स्वभाव.
पण म्हातारपण म्हणजे तसेपण परावलंबी जीवन.
अशावेळी कुणाचेच मनोधर्य कामास येत नाही.
आणि तुमच्या कडे असलेला पैसाच जो तुमच्या उर्वरित आयुष्याचा खरा आधार असतो.
तोच पैसा तुम्हाला हतबलही करून टाकू शकतो.
( _ * दीपा .*पुढे वाचूया भाग _२ मध्ये .)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा