Login

दिशा भाग 32

Sharyu And Aditya Reaches To Her Aai's Place
दिशा:- भाग 32

सात वाजता बरोबर आदित्यचा फोन आला. तो तेव्हा चाकण वरून निघाला होता आणि पुढच्या काही वेळात तिथे पोहोचणार होता.
आईशी बोलायचे ते बोलून ती तिथून बाहेर पडली आणि त्याची वाट पाहात बाहेर रोडवर उभी राहिली.
तो आला तसे तिने विचारले "आपण कुठे जाणार आहोत राहायला आज?"
आदित्य ने काही ठरवले नव्हते त्याच्यामुळे त्याने लगेच मोबाइल वर ॲप उघडले आणि जवळच्या एका हॉटेलमध्ये बुकिंग केले.
ते दोघं तिथे पोहोचले तर त्या हॉटेलला पाहून शरयू म्हणाली" काल तर आपण किती मस्त हॉटेल राहिलो होतो आणि आज इथे...?"
तसे आदित्य हसत म्हणाला "प्रत्येक गोष्टीची सवय असली पाहिजे! कायमच फाईव स्टार मिळेल असं काही नाही" तसे तिने पण हसून मान डोलावली.

आदित्यने रजिस्ट्रेशन फॉर्मलिटी केली आणि ते दोघे आत शिरले.
तो बराच दमलेला वाटत होता त्याच्यामुळे तो फ्रेश व्हायला गेला तोपर्यंत शरयू समोर ठेवलेलं मेनू कार्ड बघत राहिली. आदित्य आवरून आल्यावर ती ते दोघजण लगेच रेस्टॉरंट ला गेले. तिलाच खूप बोलायचे होते आणि नेमका तो आज दमला होता तरीही जेवता जेवता तिने बऱ्याच गोष्टी सांगितल्या. फक्त तिने आदित्यला हे सांगितले नाही की, आई मुंबईला येण्यासाठी त्याने प्रपोज केले आहे असे तिने आईला खोटेच सांगितले आहे.

तो जेवताना फक्त मान डोलावत होता आणि ऐकत होता.
त्याच्या दृष्टीने बिझनेसचे प्रपोजल योग्य व्हावे हे ही मनात चालले होते.
आज पूर्णवेळ शरयू बोलत होती.

जेवण झाले तसे शरयू म्हणाली "आपण आईस्क्रीम खायला जायचं का ?"
तिचा आग्रह त्याला मोडवेना पण जाण्याची अजिबात इच्छा खरंच त्याला नव्हती.
त्याला शांत झोपावे आणि डायरेक्ट सकाळी उठावे असे वाटत होते. तरी तिच्या उत्साहावरती पाणी नको म्हणून तो तिच्याबरोबर आईस्क्रीम खायला गेला.

शरयू ला आता खूप मोठा प्रश्न पडला होता की आपण आईला जे सांगितले आहे ते आदित्यला कसं सांगायचं? ते सांगण्याकरता तिची काही जीभ धजावत नव्हती आणि त्याला तर याची काहीच कल्पना नव्हती त्यामुळे तो तसा शांत होता.

आईस्क्रीम खाऊन हे दोघे परत येत असताना शरयू बऱ्याच वेळेला काही बोलायचा प्रयत्न करत होती पण तिला जमत नव्हते. ती आणि तो तसेच शेवटी हॉटेलला आले आणि एकमेकांना गुड नाईट करून झोपून गेले.
शरयू ला उशिरा पर्यंत झोप लागेना...
तिच्या मनात सारखं हेच सुरु होते की आदित्य ला कसे सांगायचे?
पहाटे पहाटे तिचा डोळा लागला.

सकाळी आदित्यला नेहमीप्रमाणे लवकर जाग आली. आणि त्याला तेव्हा बरंच फ्रेश वाटत होते. शरयु अजूनही शांत झोपले होती.
तिला डिस्टर्ब न करता तो तसाच खालती रेस्टॉरंटला कॉफी घ्यायला गेला. खालती सकाळी पेपर वाचत कॉफी घेत होता. त्याच्या मते रविवार सकाळ ही अशीच असली पाहिजे..हातात पेपर आणि सोबत गरम कॉफीचा कप. निवांत पणाची त्याची जणू अशीच कल्पना होती.

कॉफी घेत असताना एकदम त्याचा फोन वाजला .बघितलं तर शरयू फोन करत होती.
" कुठे आहेस तू?" तिचा आवाज त्याच्या कानात आदळला.
"मी खालती रेस्टॉरंटला आहे" तो शांतपणे म्हणाला.

" मला सोडून गेलास तू?" लटक्या रागाने ती म्हणाली.
"तू छान झोपली होतीस ना, म्हणून तुला उठवले नाही " प्रेमळपणे आदित्य बोलला तसे ती हलकेच हसली.

"मी आलेच.." म्हणत तिने फोन ठेवला.
ती येईस्तोवर त्याने चीझ ऑमलेट, स्कॅम्बल्ड एग्ज, टोस्ट बटर, ऑरेंज ज्यूस, कट फ्रुटस् आणि ब्लॅक कॉफी असा ब्रेकफास्ट ऑर्डर केला होता.

ब्रेकफास्ट पाहून ती खुश झाली आणि लगेच त्यावर तुटून पडली.
" आज आईला घेऊन मुंबईला जायचे आहे" ती खात खात म्हणाली.
तसा तो हसला आणि म्हणाला "आईचे सामान बांधून झालंय का?"

" तिला सांगितलं तर आहे, नसेल झालं तर आपण जाऊन ते पॅक करूया"
"इथून लवकर निघून तिकडे जाऊ" तसे तिने ब्रेकफास्ट आटोपता घेतला.

हॉटेलच्या रूमला चेक आउट करून दोघेही आईकडे पोचले.
बघते तर आईचं कुठलं सामान अजून बांधून झाले नव्हते.
शरयू म्हणाली "आई तू विसरली का आपल्याला जायचं आहे ते?"
आई हसली आणि म्हणाली "खरंच जायचे असेल हा विश्वासच बसत नाहीये"

" तुला मुंबईला पोहोचल्यावर विश्वास बसेल तोपर्यंत मी तुला चिमटे काढत राहील विश्वास बसण्यासाठी" शरयू चिडवत तिला म्हणाली.

आदित्य ते ऐकून हसला.

"तुला काय झालं हसायला?" शरयू त्याच्याकडे पाहत म्हणाली.
" चिमटे काढणार काय शरयू..तू पण ना?"
" का आई येण्यासाठी मी काही पण करू शकते.."
"हो पण हट्ट कर ...चिमटे काय काढणार?" तो तिला चिडवत म्हणाला.
" आता तू चिमट्यावरून जर मला चिडवलं तर मी तुला चिमटे काढेन "
हे ऐकल्यावर त्याने कपाळाला हात लावला.
ते पाहून सोबत उभी असलेल्या आई आणि छोटी दोघी जोरात हसायला लागल्या.
त्यांच्या हसण्याकडे पहात शरयू भुवया वक्र करून तिथेच उभी होती.

क्रमशः
©® अमित मेढेकर

🎭 Series Post

View all