धप्प! एक आवाज आला. बाजूला बसलेली शरयू, तिच्या मागे बसलेला आदित्य एकदम दचकले. बघते तर काय शालिनी आई खुर्चीवरून खाली कोसळली होती.
शरयू पटकन उठली, आदित्य धावला, प्रीती "काय झालं?" म्हणत मोठ्याने ओरडली तसे लोक उठून त्यांच्या भोवती गोळा झाले.
कार्यक्रम नुकताच सुरू झालेला. मोठे सर आले होते, हातात माईक घेऊन ते बोलायला लागले तेव्हढ्यात असे झालेले...पूर्ण कार्यक्रमाचा विचका नको म्हणून शरयू तिला धरून चालवत बाहेर घेऊन आली. पाठोपाठ सीमा आई, आत्या,अदिती, प्रीती सगळेच आले.
प्रीती ने पाणी पुढे केले पण शालिनी आई प्रचंड धापा टाकत होती.
तिला तसे बघून खरं तर सगळे घाबरले. शरयू तिला "आई" म्हणून हाक मारत होती पण शब्द तिच्या कानापर्यंत पोचतच नव्हते. तिला दरदरून घाम सुटला होता, एसीच्या इतक्या गारव्यात सुद्धा तिची वाईट अवस्था झाली होती.
तिला तसे बघून खरं तर सगळे घाबरले. शरयू तिला "आई" म्हणून हाक मारत होती पण शब्द तिच्या कानापर्यंत पोचतच नव्हते. तिला दरदरून घाम सुटला होता, एसीच्या इतक्या गारव्यात सुद्धा तिची वाईट अवस्था झाली होती.
शरयू , टिशू पेपर ने तिचा घाम पुसत होती. सीमा आई काळजीने तिच्या खांद्यावर हात ठेऊन होती पण या कशाचीच जाणीव तिच्यापर्यंत पोहचतच नव्हती.
"मला वाटते ह्यांना डॉक्टर कडे न्यावे" आत्या बोलली.
आदित्य आला, त्याने पाण्याचे काही शिंतोडे त्यांच्या चेहऱ्यावर शिंपडले तसे त्यांनी डोळ्याची उघडझाप केली.
तुला बरं नाही वाटतंय का आई? चल डॉक्टर कडे जाऊयात"
तसे मान हलवत त्या नाही म्हणाल्या.
तुला ह्या वातावरणाने त्रास झालेला दिसतोय..तुला ह्याची कल्पना नाही?"
तसे परत मान हलवत त्या नाही म्हणाल्या.
"आई, फाईव्ह स्टारला असेच असते. तुल हे नविन आहे पण या जगाची ओळख तुला व्हायलाच हवी ना" शरयू बोलत होती.
"आदित्य तू जा. प्रीती, सीमा आई आणि आत्याला तू ने, मी इथे थांबते. आईला नॉर्मल येऊदेत मग मी जॉईन होते. तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा"
"नको आपण डॉक्टरकडे जाऊयात.! " तो बोलला.
तर जोरजोराने मान हलवत त्या नको म्हणाल्या.
तर जोरजोराने मान हलवत त्या नको म्हणाल्या.
तिचा हा रिस्पॉन्स सगळ्यांना बुचकळ्यात पडत होता.
शरयू आता मात्र काळजीत पडली.
शरयू आता मात्र काळजीत पडली.
"शरयू चल, आपण सगळे घरी जाऊ आधी" सीमा आई म्हणाली.
"नाही नको! माझं ऐका तुम्ही आत जा.मी बघते काय करायचे ते."
"मी काय म्हणतो शरयू......" आदित्य बोलला.
"प्लीज ऐक ना रे आदित्य, मी या दोघींना तुझ्या विश्वासावर पाठवते आहे "
तसे आदित्य चा नाईलाज झाला. मनात नसतानाही तो आत जायला वळला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती.
काय ठरवले आणि काय होतेय असे शरयू ला झाले होते.
प्रिती म्हणाली "एकटी जाऊ नकोस,काही वाटले तर कॉल कर"
प्रिती म्हणाली "एकटी जाऊ नकोस,काही वाटले तर कॉल कर"
"हो, करते"
एकंदरीत काहीतरी नक्कीच प्रचंड त्रास हिला झालाय हे शरयू ने जाणले.
सगळे जाताच शालिनी आई शरयूला मिठी मारून मोठ्याने रडायला लागली. तिचा आक्रोश बघून शरयू मनात थरारली.
"काय होतंय आई? बोल ना!"
पण आई काहीच बोलत नव्हती फक्त रडत होती. तिचा भरही ओसरत नव्हता.
"आई बोल ना ग..."
"शालिनी आईने एकवार तिच्याकडे बघितले आणि पुन्हा तिचा डोळ्यांना झरझर लागली.
शरयूला हिला कसे थांबवावे हे कळत नव्हते.
"आई , आपण डॉक्टर कडे जातोय" उभी राहत शरयू बोलली. निग्रहाने तिने आईला उठवायचा प्रयत्न केला पण व्यर्थ!
"नाही" इतकेच आई बोलली.
"अगं आई, आता मला वेड लागेल ग्, प्लीज बोल ना काय होतंय तुला"
आता शरयू रडवेली झाली होती.
"शरयू" इतकेच ती बोलली तसे शरयू ने तिच्या खांद्यावर आश्वासक दाब दिला.
"बोल ना.."
"शरयू काय बोलू..कसे बोलू कळत नाहीये बघ!"
"शरयू काय बोलू..कसे बोलू कळत नाहीये बघ!"
"आणि तुझे हे वागणे मला कळत नाही आहे आई"
"शरू, इतक्या वर्षांनी समोर आला तर काय करायचं मी...?"
इतकेच ती बोलली तसे शरयू ने डोळे मोठे करत "काय..???" असे विचारले.
इतकेच ती बोलली तसे शरयू ने डोळे मोठे करत "काय..???" असे विचारले.
"हो तुझा बाप..!"
शरयूला काहीच सुचत नव्हते. काय करावं कळतच नव्हते.
"कुठे.?" अडखळत ती बोलली.
"कुठे.?" अडखळत ती बोलली.
"त्या तिथे हॉल मध्ये! जिथे आपण बसलेलो.."
"कोण?"
"तोच... जो बोलत होता" आईच्या चेहऱ्यावर प्रचंड वेदना आणि संताप होता.
शरयू ला आता मात्र गरगरायला लागले. तिचा आता स्थिर पुतळा झाला होता. आता तिची पापणी लवत नव्हती.
ज्या व्यक्तीबद्दल आई बोलत होती त्याची सगळ्यात जास्त रिस्पेक्ट अख्ख्या स्टाफ करत होता.
सगळेजण त्यांच्या चांगुलपणाचे कायमच गोडवे गायचे. ज्याला पाहून भीतीयुक्त आदर वाटायचा. ज्या व्यक्तीसाठी काम करण्याची इच्छा व्हायची. ज्या व्यक्तीला पाहून सगळे लोक कंपनीला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत होते. ज्या व्यक्तीने आज एवढी भली मोठी पार्टी ताजला आयोजित केली होती.

ती व्यक्ती म्हणजे "मोठे साहेब" होते आणि शालिनी आई म्हणत होती की ते तुझे वडील आहेत.
शरयू अक्षरशः भोवळ येऊन खाली कोसळली.
शरयू अक्षरशः भोवळ येऊन खाली कोसळली.
आता मदतीला कोणाला तरी हाका मारण्याची वेळ शालिनी आईची होती.
क्रमशः
©® अमित मेढेकर
©® अमित मेढेकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा